मासिक पाळी पर्व दुसरे (भाग 2)
(माघील भागात आपण पाहिले प्रॉब्लेम आला म्हणून अदिती खुश होती व जय दुःखी)
आता पुढे ....
अरे उठ , 
लवकर जा व सगळ्यांना सांग म्हणजे ते त्यांचे बघतील ना काय करायचं,अदिती
तुला कळतंय का तू काय बोलतेस, अग देवदर्शनासाठी आपल्या मुळे जायचे होते, ते जातात च नेहमी, व इकडे प्रथा असते नवीन जोडप्याला कुलदेवता, स्थान देवता, यांच्या दर्शनासाठी पाठवतात, जय 
ये हे सगळं मला काही माहीत नाही 
ते तू तुझे सांभाळून घे ok 
व काय करायचे ते बग अदिती 
ईला खुप सोपं वाटतंय सगळं उद्या जेव्हा कळेल ना सगळ्यांना मग कळेल ईला, 
जाऊ दे 
असे मनात बोलून तो निघून जातो, 
जय आई कडे जातो व आई ला सांगतो , त्याचे व आई चे बोलणे आजी ऐकते व लगेच ओरडायला चालू करते,
काय म्हणालास, 
तिला करायचं नाही, 
अरे तिला कळतं नाही का  ती काय लहान आहे का आता व त्या गोळ्या का नाही घेतल्या तिने पुढे जायच्या, आता देवदर्शनाचे वाजले ना 12, आजी रागात म्हणाल्या 
अहो, 
सासूबाई जाऊ द्या ना 
लहान आहे ती व तिला कुठे माहीत आहे असे काही असते, आणि ते काय तिच्या हातात आहे का??
जय ची आई घाबरत च म्हणाली 
तिची हिम्मत नव्हती होत बोलायची पण बोलल्या जास्त गोधळ वाढू नये म्हणून, 
हो घे तिला डोक्यावर 
नाही तुझ्या डोक्यावर मिरे वाटले ना मग बग, आजी पुन्हा गर्जना करत म्हणाल्या, 
बर ये भावड्या जे झालं ते जाऊ दे, पण तिला आता नीट राहायला सांग 
म्हणजे तिला नियम सांगून दे , 
तुझ्या भाषेत, 
नियम कसले नियम, 
जय 
तुझी आय, आत्या, काकू जे पाळतात कावळा शिवल्यावर ते, 
आजी 
हो, सांगतो जय
आधी सांग , नाहीतर फिरेल घरभर, आजी 
हो सांगतो, तू अगोदर शांत हो बघू, जय
जय आजी ला कसेतरी समजावून
अदिती कडे गेला, 
ये अरे यार तू कॉटवर कुठे झोपली, लवकर खाली उतर कुणी पाहिले तर गोधळ होईल,
म्हणजे , अदिती
हे बग इथे प्रॉब्लेम आल्यावर काही नियम पाळावे लागतात, 
ते अगोदर समजून घे जय 
आता काय आहे बोल, अदिती 
तुला आता 4 दिवस स्वयंपाक रूम मध्ये प्रवेश मिळणार नाही, जय 
वा किती छान, मस्त चालेल की तसेही मला काही इंटरेस्ट नाही त्या स्वयंपाकात, 
चालते की, अदिती खुश होऊन म्हणाली, 
अरे पूर्ण ऐकून तर घे माझे , जय 
ओ........
सॉरी सॉरी 
बोल अदिती 
अदिती मस्त कानात हेडफोन टाकून गाणे ऐकत कॉट वर पडलेली असते,
तुला हे असे कॉट वर झोपता नाही येणार, 
तुला झोपण्यासाठी व किंवा तुला जे काही पाहिजे असेल ते दुसऱ्या कुणाकडुन घ्यावे लागेल,
 त्या व्यक्ती ला स्पर्श न करता, थोडक्यात काय तुला कुठल्याही वस्तू ला स्पर्श करता येणार नाही, कुठे बाहेर जायचे नाही, 
मला देखील या रूम मध्ये थांबता येणार नाही, 
या दिवसात काकू, आत्या, आई यांच्याकडून आजी कपडे धुणे, भांडी घासणे, दळण करून घेणे असे जास्तीचे काम करून घ्यायची पण तू नवीन आहेस म्हणून तुला सूट देतील बहुतेक, 
तुला जेवण वैगरे जे पाहिजे ते इथे च दिले जाईल, 
एक लक्षात ठेव तू हे 4 days ज्या ज्या कपड्याना स्पर्श करशील ते ते तुला चार दिवस पूर्ण झाले की धुवून काढावे लागेल, 
चौथ्या व पाचव्या दिवशी केस धुऊन काढायचे, 
रोज घरातील सगळ्यांनी अंघोळ केली की मग अंघोळ करायची, आई तर सांगते पहिले आई तिला  चार दिवस अंघोळ देखील करू देत नव्हती, 
चार दिवस तू अलिप्त राहायचं एकटीने, समजलं
जय चे बोलणे ऐकून अदिती निःशब्द झाली, 
ती फक्त बघत होती जय कडे, 
आधुनिक जगातील आधुनिक स्त्री ती करेल का स्वीकार या अटीचा,
कधीही न बघितलेल्या 
न ऐकलेल्या गोष्टी आज तिला अनुभवायचा होत्या, 
चूक नेमकी कुणाची जय च्या घरातील लोकांची ??
जे काळासोबत अजूनही बदलले नाहीत, 
की जय ची ??? 
जो इतके शिक्षण घेऊनही 
या सगळ्या गोष्टी ला मुख मान्यता देतो, 
की अदिती ची जी आपल्या आधुनिकतेच्या बुरक्या खाली 
स्त्रीत्व विसरली, 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
खुप लाईक व कमेंट्स करा,
व मला फॉलो करा,
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा