Login

मासिक पाळी पर्व दुसरे(भाग 5)

Social

मासिक पाळी (भाग 5) 

(माघील भागात आपण पाहिले 
जय अदिती च्या विचारताच झोपी गेला) 

आता पुढे .....

गावाकडे सगळे सकाळी लवकरच उठतात, 
त्यामुळे काका सोबत जय देखील लवकर उठला,
उठल्या उठल्या 
पहिला विचार त्याच्या मनात अदिती चा आला, 
झोप लागली असेल ना तिला नीट, 
की बसली असले sad songs ऐकत, 
त्याला अदिती ची सवय माहीत होती 
तिला जेव्हा कधी खुप वाईट वाटायचे किंवा तिचे मन दुखावले जायचे ती कुणाला काहीच बोलत नव्हती फक्त sad songs ऐकायची, 

जय काहीतरी शोधण्याचे निम्मित करून तिच्या रूम मध्ये आला, 

नेहमी मऊमऊ गादीवर झोपणारी अदिती आज फक्त त्याच्यासाठी जमिनीवर झोपली होती, 

एका बाजूला रिकामा कॉट, 
व दुसरीकडे खाली एका कोपऱ्यात केस मोकळे (तिला केस मोकळे सोडल्याशिवाय झोपच येत नव्हती) सोडून झोपलेली अदिती डोळ्यांना देखील विदारक च वाटत होते, 

तिचा तो निरागस चेहरा 
व काल चिडचिड करणाऱ्या अदिती चा चेहरा यातील फरक जय शोधत होता, 

तिच्या चेहऱ्यावर आलेली ती केसांची बट हळुवार पणे सारात जय मनातल्या  मनात च सॉरी म्हणाला, 

कुणीतरी आलेय याची जाणीव होऊन अदिती ला जाग आली 
समोर जय दिसताच ती पटकन उठली, 

तू.....
इथे काय करतोय 

 उठले का सगळे , 
अरे यार 
मला खुप लेट झालेय का उठायला, 
आता आजी ओरडतील मला, 
तू तरी उठवायचे ना मला, 
मी अलार्म लावला होता पण कशी काय झोप लागली पुन्हा काय माहीत, 
अदिती सांगत होती, 

अग हो हो ..........
जरा थांब 
स्वास घे, 
उठलेत सगळे व त्यांच्या त्यांच्या कामाला देखील लागलेत, 
तुला आराम आहे सध्या म्हणून तुला कुणी उठवले नाही व कुणी काही बोलणार देखील नाही, 
तू निवांत राहा, 
तुझे आवरून घे , 


अदिती ची समजूत काढून जय
जय निघून गेला, 


असेच अलिप्तपणे अदिती ने तीन दिवस काढले, 
तिला खुप कंटाळा आला होता फक्त जेवण करून बसायचा, 
पण तिच्यासमोर दुसरा मार्ग च नव्हता, 
तिच्या फक्त एकच डोक्यात होते 
की कसेतरी हे चार दिवस काढायचे व पुणे गाठायचे, 

तेवढ्यात तिची बालमैत्रीन आशु चा कॉल येतो, 

Hi 
अदिती काय करतेस, आशु 

काही नाही ग बसलेय, अदिती 

बसली, 
नव्या नवरीला कुणी बसू दिले इतके रिकामे, आशु 

काम नाहीये मला सध्या, जाऊ दे बोल तू, अदिती 

काम नाहीये म्हणजे, आशु 

अग प्रॉब्लेम आलाय आणि आमच्याकडे प्रॉब्लेम ला अनेकप्रकारे सजवले जाते, कधी नावांनी तर कधी नियमांनी, 
त्यामुळे त्यावर न बोललेलं च बर, 
मला फक्त हे 
चार दिवस काढायचे व पुण्याला जायचे आहे, 
मग मी काळजी घेईल घरी येतानाच , 
अदिती 


ओहहहहह......
अग पण तू किती वेडी आहेस, 
तू सांगितले म्हणून त्यांना कळाले ना, 
तू नसते सांगितले तर त्यांना कुठे कळणार होते, आशू 

असे कसे 
कधी तरी कळले असते मग अदिती 

कसे कळेल 
तू तिथे थोडीच थांबणार आहेस, 
सध्या ची वेळ मारून न्यायची फक्त मग तर तू पुण्याला च जाणार आहे ना, 

ये .....
काही पण काय बोलतेस 
हे लोक खुप प्रेमळ व भावनिक आहेत, 
ते प्रॉब्लेम चा व देवाचा संबंध जोडतात त्यामुळे 
माझ्याकडून नाही होणार त्यांच्या भावनांशी खेळणे, 

जा मग 
बस रडत ....
पुन्हा खुप त्रास द्यायला लागले की मला सांगू नको, 
हे बग समोरच्या आपल्यावर तोपर्यंत अन्याय करतो जो पर्यंत आपण सहन करतो, 
एकदा का आपण प्रतिउत्तर द्यायला सुरुवात केली की समोरच्याचे प्रश्न आपोआपच कमी होतात, 
आणि हे बग 
 First impression is the last impression, 

 तू आता नवीन आहेस 
तू जसे आता वागशील तसेच ते तुझ्याशी वागतील 
त्यामुळे सुरवाती पासूनच कडक व आपले आपले बग , 
उगाच वाहवत जाऊ नको या नात्यांच्या सागरात 
एकदा का 
माणूस गुंतला या जबाबदाऱ्या मध्ये मग त्याला बाहेर पडणे
खुप अवघड होऊन बसते, 
उगाच अडकू नकोस या लोकांमध्ये नाहीतर पुणे तर दूर तुला घराबाहेर पण पडू देणार नाहीत, 
मग बस घरी चूल व मुलं सांभाळत, 
मी खुप ठिकाणी असे बघितलेले आहे की सून शिकलेली असूनही तिला नोकरी करू देत नाहीत, 
तिला फक्त घरातील सगळ्यांची काळजी घेण्यासाठी घरात ठेवले जाते, 
किंवा फक्त मुलाला शहरात निकरीसाठी पाठवून सुनेला आपली सेवा करण्यासाठी ठेऊन घेतात नवीन आहे अजून म्हणून, 

आता तुझे तू बग तुला काय करायचे शेवटी आयुष्य व निर्णय
दोन्ही  तुझे आहेत, 
आशु बोलत होती 
व अदिती फक्त ऐकत होती, 

ठेऊ का बोलते नंतर असे म्हणून अदिती ने कॉल ठेवला, 

तिने फोन तर ठेवला होता पण तिचे विचारचक्र चालूच होते, 
माझ्यासोबत जर असे काही झाले तर, 
मला पण नाहीच जाऊ दिले मग....
प्रत्येक महिन्याला हा असा त्रास मी कसा सहन करू, 
हा त्रास तर सोडा पण मी राहूच कशी, 
इतक्या लवकर उठणे, 
अंघोळ करणे, 
दारात सडा मारणे, मग स्वयंपाक, दिवसभर उरलेली कामे करणे, 
त्यात ती साडी, 
नाही नाही 
मला शक्यच नाही 
काही झाले तरी परवा जायचेच
 पुण्याला, 

असेच रडत पडत अदिती कसे तरी चार दिवस गावी काढते,

तिला चार दिवस झाल्यानंतर, 
आजी च्या परवानगी ने अखेर पुण्याला जायचे ठरते, 

या अगोदर जय एकटा तिथे राहत होता पण आता अदिती त्याच्या सोबत जाणार होती त्यामुळे त्यांना संसारातील प्रत्येक गोस्ट नवीन घ्यावी लागली, 
गावाकडून जाताना देखील त्यांना खुप सामान आजी ने बरोबर दिले, 

सर्वांचा निरोप घेऊन अखेर जोडी निघाली पुण्याकडे, 

अदिती खुप खुश होती की आशु ने सांगितलेलं काही तिच्या बाबतीत झाले नाही म्हणून , 

चला काही का असेना पण एकदाचे आम्ही निघालो पुण्याला, 

आता काहीही झालं तरी डेट असताना मी गावी कधीच जाणार नाही, 
अदिती ने मनाशीच ठरवले, 

नको रे बाबा 
ते वेगळं बसणं, 
वेगळं ताट, 
त्या नजरा 
आणि ते वातावरण, 

काहीच नको पुन्हा 
असे म्हणून ती मनाशीच ठामपणे निर्धार करते, 

क्रमशः ...............

अदिती ने ठरवलेले जाईल का तडीस, 
की करेल ती सतत टाळाटाळ गावी जाण्यासाठी फक्त या मासिक  पाळीमुळे 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा, 
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, 
कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका, 
धन्यवाद

🎭 Series Post

View all