Login

मासिक पाळी पर्व दुसरे(भाग 6)

Social

मासिक पाळी (भाग 6) 
( माघील भागात आपण पाहिले जय व अदिती सर्वांचा निरोप घेऊन निघाले पुण्याकडे ) 

आता पुढे ............

घरातून निघाल्या पासूनच अदिती चा चेहरा खुलला होता, 
सर्वाना छान निरोप देऊन ते आता पुण्याला निघाले, 
बसल्या जागेवरून ती पाळणारी झाडे बघत होती, 
माघील चार दिवस तिला सारखे आठवत होते पण आता सुटलो यातून हेही जाणवत होतं, 

ते पुण्याला पोहोचले 
अदिती चे मामा पुण्यात राहत असल्यामुळे त्यांनी या दोघांना पाहिजे ती मदत केली 
दोघांचाही सुखाचा संसार चालू झाला, 
अदिती हेकेखोर पटकन चिडणारी, विचार न करता बोलणारी, स्वतः च्याच विस्वात व्यस्त राहणारी, स्वतः ला हवं तेच करणारी 
तर जय पुर्णपणे वेगळा 
विचार करून बोलणारा
शांत, हुशार, समजदार, 
स्वतः अगोदर समोरच्याचा विचार करणारा, 
तो अदिती ला नेहमी सांभाळून घ्यायचा, 

सासरी एकदाही कॉल वर न बोलणारी अदिती आई सोबत खुप बोलायची, 

तिची आई शी खुप छान मैत्री होती, ती लग्नापूर्वी छोट्या छोट्या गोष्टी देखील आई ला सांगायची, 

त्यामुळे अगोदर पुण्याला पोहोचल्यावर तिने आई ला कॉल केला, 

हॅलो आई, 
आम्ही पोहोचलो ग 
बाबा ना देखील सांग 
व मस्त पोहोचलो 
काही त्रास झाला नाही, 
घर पण खुप छान आहे 
मामा आला होता आताच गेला 
तुझी आठवण काढत होता, 
तू पण ये बाबा ना घेऊन घर बघायला, 
अदिती एका दमात सगळं सांगून मोकळी झाली तिचा आनंद तिच्या बोलण्यातून जाणवत होता, 

अग हो हो 
किती बोलशील, 
येऊ आम्ही लवकरच 
जवाईबापू कसे आहेत, आई 

काय ग आई 
तू त्याला जय म्हणत जा बर ते जवाईबापू वैगरे नको, अदिती 

चल आली मोठी 
शहाणी, आणि काय ग तुम्हांला पुण्याला जायची इतकी काय घाई  झाली होती थोडे दिवस थांबायचे ना घरी व गेलात तर आजी ला सोबत न्यायचे असते 
नवीन लोक 
नवीन वातावरण
तुला जुळवून घ्यायला वेळ लागेल 
त्याचा धाक राहिला असता तुमच्यावर, 
तुमचा संसार त्यांनी सुरळीत करून दिला असता, 
त्यात तुझी स्वयंपाकाची अशी बोंब 
त्यांनी तुला चार गोष्टी सांगितल्या असत्या शिकवल्या असत्या, 
मग आल्या का नाही नंतर त्या गावी तू रुळल्यावर, 
आई 

अग आई चार वरून आठवलं खुप मोठे रामायण सांगायचे आहे तुला पण आता वेळ नाही नंतर सांगेल, अदिती 

हो हो चालेल 
तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा सांग 
पण माझे ऐकून घे, 
तिथे दोघेच आहात 
उगाच जवाईबापू च्या मागे लागू नको 
तुझा स्वभाव थोडा बदल
आता तू सासरी आहेस याचे भान ठेव, 
चिडचिड करणे ओरडणे, हेकेखोर पणा रुसून बसने बंद कर, 
आता तीच तुझी माणसे आहेत त्यांना जप 
कुणी काही बोलले तरी उलटून बोलायचे नाही , 
मोठे आहेत ते वयाने व अनुभवाने, 
जरा शहण्यासारखे वाग , 
जवाईबापू ऐकतात म्हणून त्यांच्या डोक्यावर बसू नको 
त्यांचा मान ठेवत जा, 
आणि हो तू नवीन आहेस घरातील काम व जॉब दोनी सांभाळताना खुप धावपळ होईल म्हणून तू संसारात नीट रुळेपर्यंत जॉब जॉईन करू नको निदान 3 महिने तरी अजून 
समजलं , आई 

हो ग माझी आई समजलं, 
कधी कधी मला वाटत तू माझी आई च नाहीये, अदिती 

हो ना वाटेल ना 
तुझ्या बाबा नि डोक्यावर बसवून ठेवलय तुला, 
पण आता खाली उतरा व जबाबदाऱ्या स्वीकारा, 
चल बोलू नंतर, 

अदिती ने कॉल ठेऊन दिला, 

काय म्हणत होत्या ग आई 
जय 

काय म्हणेल 
लग्न जमल्यापासून फक्त उपदेशाचे डोस पाजत असते, हे करू नको ते करू नको 
मी काय लहान आहे का , अदिती 


अग तू लहान नाहीस 
आई वेड्या आहेत तुझ्या नादी लागतात, 
असे म्हणून जय हसत निघून गेला , 

आता अदिती देखील निर्णय घेते की अगोदर घर नीट सांभाळू सगळं शिकून घेऊ मग जॉब जॉईन करू 
कारण शिक्षणामुळे तिला स्वयंपाक शिकायला वेळ च कुठे मिळाला होता, 
चहा व वरणभात सोडून तिला दुसरे काही येतही नव्हते,

जय चा जॉब चालू झाला होता 
पण अदिती घरीच थांबली,
 ती हळूहळू का होत नाही पण घरातील सर्व कामे करायची, 
जय ची काळजी घ्यायची, 
जय ऑफिस ला गेला की सगळे काम आवरून युट्यूब चा आधार घेत रोज एक रेसिपी शिकण्याचा प्रयत्न करायची, 
कधी जमायची 
कधी बीघडायची 
कधी कधी तर कोणता पदार्थ बनवलाय तोच ओळखू न आल्यामुळे त्याला कचरा कुंडी दाखवयाची , 

लग्न होऊन महिना झाला होता त्यातच तिला प्रॉब्लेम आला, 
रोज जय येण्यापूर्वी सगळं आवरून ठेवणारी ती
 आज काहीच न करता तशीच झोपून राहिली, 
लग्नापूर्वी याच दिवसात आई तिची खुप काळजी घ्यायची हे आठवून तिच्या डोळ्यात पाणी आले, 
सगळी कामे तशीच पडलीत 
आता जय देखील येईल तो काय म्हणेल, 
हा विचार करूनच ती उदास होत होती, 

तितक्यात जय येतो 
सगळीकडे पसारा व अदिती झोपलीये ये बघून त्याला वाटते ती आजारी आहे, 

काय ग काय झालं, जय 

काही नाही रे बर वाटत नाहीये, 
पोट पण दुखतंय, 
थकल्यासारखे झाले खुप 
प्रॉब्लेम आलाय ना , अदिती 


हो का 
बर तू आराम कर, मी आवरतो, जय 

नाही नको अरे 
थोडा वेळ झोपते मी करेल मग ,अदिती 

तू नको विचार करू 
तू झोप व तसेही लहानपणापासून 
आई ला या चार दिवसात वेगळं बसावं लागायचं,
 म्हणून आई ने आम्हाला उपाशी राहू नये इतका स्वयंपाक शिकवला आहे, 
त्यामुळे
 u don't worry madam 

आपका सेवक सेवा मे हाजीर है!

असे बोलून जय निघून गेला,
अदिती विचार करू लागली, 
किती कमाल आहे ना 
हा चिडला नाही काही नाही 
उलट माझ्यात झालेला त्याने किती पटकन स्वीकारला, 

मॅडम काय विचार करताय, 
मी असा कसा वागू शकतो हाच विचार करताय ना, 
पण आई वेगळं बसायची म्हणून मला या गोष्टी ची जाणीव आहे 
हे कधी विसरू नको, 
असतील माझे घरचे गावरान, अडाणी ,
 त्याच्या त्या अडाणी वागण्याला   साइंटिफिक  रिजन नसेलही पण तेच एका स्त्री साठी गरजेचं असतं, 
अदितीला नकळत त्या गावकडील चार दिवसाची आठवण करून जय निघून गेला, 

अदिती मात्र अडकून पडली शिक्षण आणि अडाणीपणा, 
धर्म आणि विज्ञान , 
शहर आणि खेडे 
गावरान व मॉर्डन 
या विचारात, 


जय चे वागणे करेल का अदिती च्या विचारात बदल 

 विज्ञानाने प्रभावित अदिती करेल का मान्य त्या वेगळं बसण्याचे अस्तित्व
जाणून घेण्यासाठी सोबत राहा, 
आवडल्यास लाईक करा, 
धन्यवाद

🎭 Series Post

View all