Login

मासिक पाळी पर्व दुसरे(भाग 7)

Social

मासिक पाळी (भाग 7) 

(माघील भागात आपण पाहिले अदिती ची त्या दिवसांमध्ये जय खुप काळजी घेतो ) 


आता पुढे .......................

जय ऑफिस सांभाळून घरातील कामे करत होता, 
त्याला घरातील कामे करताना थोडाही संकोच वाटत नव्हता, 
तो सर्व कामे सराईत पने करत होता, 

अदिती ला या गोष्टी चे खुप नवल वाटायचे, 
कधी कधी तर तिला जय चा खुप हेवा वाटायचा की हा खरच किती करतो आपल्यासाठी, 
आणि ती मनातच ठरवते 
मी देखील माझा स्वभाव बदलेल आता, 

तिचे चार दिवस कसे निघून जातात तिचे तिलाच कळत 
नाही व त्याचे आयुष्य पुन्हा पूर्वपदावर येते, 

त्यांचे नेहमीचे रूटीन चालू होते, 
अदिती चे घर सांभाळणे 
जय ची काळजी घेणे, 
त्याला नवनवीन खाऊ घालणे, 
तिचे जगच जय च्या भवती फिरत होते, 

एक दिवस ती निवांत बसलेली असताना 
तिच्या मैत्रिणी चा निमंत्रणासाठी कॉल येतो , 

हॅलो, अदिती का ???

हो बोलतेय कोण?? 
अदिती 

मी प्रिया , 

प्रिया तू,
कशी आहेस 
व किती दिवसांनी कॉल केलास, 
घरचे कसे आहेत, 
अदिती 

सगळे मस्त आहेत, 
तुला लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी कॉल केलाय, प्रिया 

वा छान 
मुलगा काय करतो 
अदिती 

ते तू आल्यावर च बग 
तुझ्यासाठी सरप्राईज आहे, 
प्रिया 

Ok ok 
कधी आहे लग्न ते तरी सांग 
येत्या 25 तारखेला, प्रिया 

इतक्या लवकर , अदिती 

हो , थोडी घाईच झाली, 
पण तू व जीजू नक्की या बर मी वाट बघतेय, प्रिया 

हो , नक्की येऊ, 
अदिती 


प्रियाला लग्नाला येणाचे प्रॉमिस करून अदिती कॉल ठेऊन देते, 

लग्नाला जायचं म्हणल की तयारी आली , 

काय घालू, 
काय नको त्यात तिचे दोन दिवस गेले, शेवटी तिने आशु ची हेल्प घेण्याचे ठरवले, 

चल आशु लाच कॉल करते, अदिती 


हॅलो आशु, अदिती 

बोल , आशु 

लग्नाचे निमंत्रण मिळाले का ??
अदिती 

हो , आशु 


मग काय ठरले, काही ड्रेसिंग कोड वैगरे, अदिती 

हो ठरलाय ना, तुला कॉल करणारच होते आज 
अग सगळ्या जणी घागरा घालणार आहेत, 
आणि तू तुझ्या लग्नातील घागरा घाल, छान दिसेल, तुला, 


हो , पण यार माझी डेट आहे तेव्हा, मग नवीन  घागरा कसा घालू, येत तर तो खुप हेवी आहे त्यात पुन्हा प्रॉब्लेम नाही नको 
तुम्ही घाला , 
मी करेल काहीतरी मॅनेज, अदिती 


ये काही नको 
तू पण घागरा घालणार आहेस, 
उगाच काही कारण सांगू नको, आणि कुठल्या युगात वावतेस यार, 
टॅब्लेटस घे 
प्रॉब्लेम 
पुढे ढकलण्यासाठी, आशु 


जमेल का पण त्याने, 
म्हणजे मी कधी घेतल्या नाहीत या पूर्वी, अदिती 

अग काही होत नाही, तू घे तर 
मी सांगते ना, आशु 


ठीक आहे तू म्हणती तर घेते, 
बोलू नंतर ok, 
पण कुठे मिळतील डॉक्टर कडे जाऊ का?? 
नाही नको 
मेडिकल मधून घे, 
त्यात काय इतके, आशु 


चालेल 
मी आजच सांगते जय ला, अदिती 

आज जय ऑफिस मधून आल्यापासून अदिती कुठल्यातरी विचारात आहे, हे त्याच्या लक्षात आहे, 

तिचे आज कुठेच लक्ष नव्हते, हे त्याने हेरले होते, 

काय ग 
काही झालाय का,???
जय 

नाही रे अदिती 

तू खुप उदास वाटतेस म्हणून विचारलं , जय नाही रे 

खर सांग तुझे डोळे बोलतात , सांग पटकन, जय 


आता अदिती बोलू लागली, 
अरे प्रिया चे लग्न आहे 
आमचे सगळे फ्रेंड्स येणार आहेत, 
मला पण बोलावले आहे, 
अदिती 


बस इतकच ना मग जा की 
तुला कुणी अडवले, 
तू पण ना ......
जय 


अरे त्यांनी ड्रेस कोड ठरवला आहे घागरा, 
अदिती 

मग काय झालं, आपल्या लग्नातील घाल ना , 
तसेही तू त्यात एक नंबर दिसत होतीस, जय 


हो , पण माझी डेट आहे तेव्हा मग कसे जाऊ, 
एक तर बाहेर जावे लागेल त्या दिवसात, त्यात तो मेकअप, तो हेवी घागरा, आणि तो वॉश पण करता येणार नाही व तसा ठेवता ही येणार नाही मग काय करू मी, 


बरोबर आहे तुझं 
पण जायचे असेल तर काहीतरी पर्याय तर शोधावा लागेल ना, व तुला माहीत आहे 
आजी आई व काकू ला या दिवसात कधीच नवीन साडी घालू देत नव्हती कारण नाही माहीत 
पण नव्हती देत, 
आज दुसऱ्यांदा जय ने अदिती ला त्या चार दिवसाची आठवण करून दिली, 

एक पर्याय आहे अरे माझ्याकडे, 
अदिती 

काय, जय 


मी गोळ्या घेऊ का पाळी पुढे जाण्यासाठी, 
अदिती 

बग तुला काय वाटते ते, जय 


जय अदिती वर निर्णय सोडून मोकळा होतो तसेही त्याने सांगितलेले तिला पटले नसते म्हणून,

काय करू, आई चा सल्ला घेऊ का ??
नाही नको पुन्हा उपदेशाचे डोस पाजेल,
 त्यापेक्षा आशु  ला कॉल करते, 

असा विचार करून अदिती आशु ला कॉल लावते, 

हॅलो बोल, आशु 

काय करावं कळेना ग 
घेऊ का गोळ्या 
काही साईड इफेक्ट तर नाही ना होणार ???अदिती 

नाही होत ग 
तू पण ना 
काकू बाई झालीस लग्नानंतर 
त्याला काय होत, 
प्रॉब्लेम येन म्हणजे काय खुप मोठी गोस्ट आहे का?
एक नैसर्गिक चक्र आहे ते

किती विचार करते ग 
बिधास्त घे, 

आशु च्या मार्गदर्शनामुळे , 
अदिती ला  मैत्रिणी च्या लग्नात एन्जॉय करता यावे, 
मनाजोगे वावरता यावे ,
काही अडचण नको ,
म्हणून तिने गोळ्या घेतल्या, 

अदिती चे ठीक आहे ती पुढील बाबीशी अनभिज्ञ होती , 
पण आपल्यातील खुप जणी या नैसर्गिक चक्राला भेदण्याचा प्रयत्न करतात, 
त्याला कारणे वेगवेगळी असतात 
पण या चक्राला डीवचने पडेल का अदिती ला महागात????
 की मॉर्डन च्या नावाखाली झाकले जाईल तेही ???

जाणून घेण्यासाठी कथेसोबत जोडलेले राहा, 
लाईक करा, 
फॉलो करा, 
आणि त्यासोबत स्वतः ची काळजी घ्या,

🎭 Series Post

View all