मासिक पाळी (भाग 8)
( माघील भागात आपण पाहिले अदिती लग्नात एन्जॉय करता यावे म्हणून मासिक पाळी पुढे ढकलण्या च्या गोळ्या घेते)
आता पुढे ..…........
अदिती गोळ्या घेते, व आता कुठलेच टेन्शन नाही म्हणून जोमाने तयारीला लागते,
आता ती तिच्या मानाजोगा पोशाख परिधान करू शकत असते, ती तिचा लग्नातील सुंदर घागरा काढून ठेवते,
अदिती ची तयारी बघून जय तिची मजा घेण्याच्या मूड मध्ये असतो,
काय मॅडम एकदम खुश काय जादू झाली म्हणायची, जय
अरे माझं सगळं टेन्शन गेलं,
आता मी गोळ्या घेतल्यात
सो आता मी हाच घागरा घालणार , अदिती
हो घाल ,
पण शेवटी तुला काहीतरी तडजोड करावीच लागली ना नवीन घागरा घालण्यासाठी
पण असो जाऊ दे,
तू खुश आहेस ना मग बस ,
असे बोलून तो निघून गेला,
जय च नेहमीच असत असा विचार करून अदिती देखील
तिच्या कामाला लागते,
आज अदिती च्या मैत्रिणी चे लग्न असते, अदिती तिची सगळी तयारी करून लग्नात पोहोचते ,
अदिती ला तिचे सगळे जुने मित्र-मैत्रिणी भेटतात, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मध्ये कसा वेळ निघून गेला तिला कळलेच नाही,
हाय, कितवा महिना,
आरती म्हणाली,
ये काही पण काय बोलतेस,
अदिती,
ओहहहहहहज
सॉरी
सॉरी
अग तुझं थोडं पोट दिसतंय
म्हणून मला वाटलं,
सॉरी बर, आरती सावरून घेत म्हणाली,
आरती सहज बोलून गेली,
पण सर्वांमध्ये छान दिसण्याच्या अदिती च्या हट्टाला हे कुठेतरी सहन झाले नाही,
आतापर्यंत हसतमुख असलेली अदिती आता मात्र हिरमुसली होती, तिचा चेहरा आरती च्या त्या दोन शब्दांनी पडला होता,
आरती सहज बोलून गेली,
पण अदिती ने खुप मनाला लावून घेतले, ती पुन्हा पुन्हा स्वतः ला आरशात बघत होती,
तिने स्वतः चे बारकाईने निरीक्षण केले,
अरे यार हो
आपले खरच किंचित पोट दिसतंय ,
कसे काय पण
तब्बेत सुधारली म्हणावं तर फक्त पोट वाटतय वजन कुठे वाढले,
अदिती मनाला च म्हणाली,
अदिती च्या मनातून तो विचार काही जात नव्हता,
तिचा स्वभाव देखील एकाच गोष्टीला पकडून ठेवायचा असल्यामुळे याचे उत्तर मिळेपर्यंत तिला चैन पडणार नव्हते,
सगळे फ्रेंड्स आले होते व त्यात आशु देखील होती,
अदिती च्या पटकन लक्षात आले,
आशु लाच विचारू,
ये आशू, अदिती आवाज देते,
हो आले, बोल, काय म्हणते,
काय म्हणतो तुझा जय व नवीन संसार, आशु तिची खेचत म्हणाली,
ते जाऊ दे बाकी सगळं ठीक आहे,
पण माझं या घागऱ्यात खरच पोट दिसतंय का ग व का?
अदिती काळजीने म्हणाली,
अग वेडा बाई,
तुजी डेट जवळ आली ना म्हणून
व त्यात तू ती आणखी पोस्टपौंड केली,
आशु समजावून सांगत म्हणाली,
हो का , मग हे अगोदर नाही का सांगायचे,
तुला माहीत आहे ना मला नेहमी मी स्पेशल दिसावी असे वाटते, अदिती
हो हो माहीत आहे,
बरी तरी सुंदर आहेस,
नाहीतर प्लास्टिक सर्जरी केली असती की काय माहीत,
दोघीही असतात,
अदिती ला त्या किचिंत श्या वाढलेल्या पोटाची चिंता वाटली,
पण त्या गोळ्यांनी तिच्या अंतर्गत शरीरात केलेल्या बदलाची जाणीव देखील नव्हती,
कारण तिचे शरीर म्हणजे तिला खेळणे वाटायचे ती पाहिजे तेव्हा व पाहिजे तसे तिच्या शरीरात बदल करू शकते असे तिला वाटायचे,
अर्थात ती अजून अनभिज्ञ होती परिणामापासून
सगळ्यांचा निरोप घेऊन अदिती घरी आली ,
घरी आल्यानंतर तिने सर्व घडलेला प्रकार जय ला सांगितली ,
जय ने नेहमीप्रमाणे तिचे फक्त ऐकून घेतले व काहीच प्रतिवाद न करता तो त्याच्या त्याच्या कामाला निघून गेला, हाच त्याचा स्वभाव होता,
हळूहळू अदिती व जय चा सासर फुलत होता, अदिती देखील व्यवस्थित घर सांभाळत होती,
आता सगळं सुरळीत झालय तर जॉब चा विचार करायला काय हरकत आहे हा विचार तिच्या मनात येतो,
जय ऑफिस वरून आल्यावर ती तिची इच्छा जयकडे व्यक्त करते,
तिच्या चुकीच्या गोष्टी ला देखील विरोध न करणारा जय
आज तिच्या बरोबर गोष्टीला कसा विरोध करणार होता, तो तिची साथ देत होता,
तिने जॉब शोधायला चालू केले
मुळात हुशार व छान मार्क्स असल्यामुळे, चांगल्या मोठ्या कंपनी मध्ये तिला चांगल्या पदावर जॉब देखील मिळाला,
ही आनंदाची बातमी तिने आई ला , कळवली
सगळे खुश होते
पण अदिती जरा जास्तच होती
कारण आता तिची खरी परीक्षा होती,
तिला स्वतः ला एक कर्तबगार स्त्री म्हणून सिद्ध करायचे होते,
मी घर व नोकरी दोन्ही सांभाळू शकते हे तिला दाखवून दयायचे होते,
पाडेल का अदिती दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार,
की स्त्री म्हणून पडतील तिच्या यशाला मर्यादा ,
जाणून घेण्यासाठी सोबत राहा, लाईक करा,
या कथेबद्दल दोन शब्द
काहींना कथा आवडेल किंवा काहींना निव्वळ टाईमपास देखील वाटेल, पण एक स्त्री म्हणून तिच्या शारीरिक मर्यादा, तिचे कर्तव्य, तिच्या भावना, व तिच्या जबाबदाऱ्या या कथेतून मांडण्याचा प्रयत्न करतेय,
बघू जमते का ????
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा