मासिक पाळी (भाग 4)
(माघील भागात आपण पाहिले
अदिती चे जेवण झाले होते )
आता पुढे .......
आजी ने अदिती ला ताट तिथेच ठेवायला सांगितले ,
हे ऐकताच अदिती पुन्हा चिडली,
चिडू नको
मी बोलतो घरात,
जय
अदिती ने फक्त रागाने जय कडे पाहिले व शांत बसली,
घरातील सगळे जिथे बसले होते
अजय तिथे गेला
व म्हणाला,
आजी, बोलायचं होत,
हमम बोल ना, आजी
आम्ही उद्या पुण्याला जाऊ का?
सुट्या पण जास्त नाहीत ,
आणखी सामान पण लावायचे आहे,
आणि अदिती ला इथे खुप वेगळं वाटतंय, जय भीत भीत म्हणाला,
काय पुण्याला आणि उद्या,
जमणार नाय ,
तुला माहीत नाही का तिला करायचं नाय,
इथं उंबरा पण ओलांडू देत नाहीत आणि तू पुण्याला जायचं म्हणतो,
ते काही नाही
चार दिस झाले की जा
कुठे जायच तर
पण उद्या नाही,
आजी ठामपणे म्हणाली,
आई तू तरी सांग ना ग आजी ला ,
जय
ती काय बोलेल,
माझ्यापुढे कुणी बोलते का घरातील,
ते काही नाही
मी सांगितले ना
नाही म्हणजे नाही ,आजी
जय चा नाईलाज होता त्याला काय करावे कळेना शेवटी त्याने अदितीला समजावण्याचा ठरवले व तो रूम कडे निघाला,
तिकडे कुठे निघालास आज बाहेर झोप तू तुझ्या काका सोबत ती झोपेल एकटी,
आजी
बाप रे मेलो
आता अदिती आणखी ओरडेल, जय
खुप हिम्मत करून जय आदीतीकडे जातो,
तिच्या समोर जाऊन फक्त बसतो,
तो काही बोलणार तोच अदिती म्हणते जा झोप बाहेर,
आणि जाऊयात चार दिवसांनी पुण्याला,
तुझे व आजी चे बोलणे ऐकले आहे मी ,
जय ला आता खुप वाईट वाटते,
तो सॉरी म्हणून जायला निघतो
तोच अदिती म्हणते,
ऐक ना, अदिती
बोल, जय
अरे मासिक पाळी येन म्हणजे काही गुन्हा नाही,
या दिवसात स्त्री च्या शरीरात खुप बदल होतात,
तिला खुप शारीरिक वेदना देखील होतात,
या दिवसात तिला आधाराची, प्रेमाची, मायेची, काळजीची खुप गरज असते,
ती थकून जाते या दिवसात,
आणि हो हा रोग वैगरे नाही बर ते चक्र असते 28/29 दिवसाचे ज्यामुळे नवनिर्मितीची क्षमता मिळाली स्त्री ला,
वंशवेल वाढवण्यासाठी या मासिकपाळीचा खुप मोठा वाटा आहे,
जर आपल्याला एखाद्या स्त्री ला शारीरिक पाठबळ नसेल देता येत तर तिचे मानसिक खच्चीकरण तरी करू नये,
जा तू, अदिती
जय च्या लक्षात अदिती चे कोड्यात बोलणे आले होते पण त्याचाही नाईलाज होता,
तो अंथरुणात जाऊन तर पडला पण त्याला झोप येत नव्हती,
सारख सारख लक्ष अदिती कडे जात होते,
झोपली असेल का??
जास्त त्रास तर नसेल होत ना ??
व अचानक रात्री त्रास झाला तर
तिला राग आला असेल खुप माझा,
तिची तरी काय चूक आहे ,
तिने कधी असे वातावरण बघितलेले च नाही,
मग तिला कसे सहन होईल,
मी तरी कशी अपेक्षा करू तिच्याकडून घरच्यांच्या मानाजोगे वागण्याचे,
तिच्यासाठी घर, वातावरण , माणसे सगळंच नवीन आहे,
ती तयार झाली चार दिवस राहायला हेच खुप झाले, तसे माझेही चुकलेच मी हे तिला अगोदरच सांगायला हवे होते, कमीतकमी तिला कल्पना तरी आली असती गावाकडे लोक कसे राहतात, कसे वागतात, कसे कपडे घालतात,
काहीच पूर्वकल्पना न देता मी तिला अनुभव दिला, मग ती चिडणे स्वाभाविक आहे ना,
जीचे पूर्ण आयुष्य शहरात गेले तिला कसा कळेल गावाकडच्या मातीचा ओलावा,
अदिती च्या विचारातच जय झोपी गेला,
जय चे अदिती बद्दलचे विचार आणतील का घरातील लोकांत परिवर्तन घडवून,
जाणून घेण्यासाठी
सोबत राहा,
लाईक करा,
कमेंट्स करा
व फॉलो करा,
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा