सागरने पुण्यातील कृषी महाविद्यालयातुन पदवी संपादन केली होती. त्याची पिढीजात चिकूची खुप मोठी बाग, ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात होती. त्याच्या आईवडीलांचे आता वय झाले तरी ते त्यांच्या चिकूच्या बागेत काम करत असत. सागरच्या बागेतील चिकू खुप गोड व चविष्ट होते त्यामुळे त्यांच्या बागेतल्या चिकूला देश, परदेशात खुप मोठी मागणी होती. सागर त्याच्या चिकूच्या बागेची काळजी आपल्या मुलाप्रमाणे घ्यायचा. तो त्याच्या चिकूच्या बागेत नेहमी चिकूची चांगली वाढ व्हावी ह्यासाठी नविन नविन प्रयोग करत असे.
सागर पुण्यात शिकत असताना त्याची ओळख विणाशी झाली; तेव्हा विणा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होती. सागर आणि विणाच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत व मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्या दोघांनाही कळले नाही.
सागर आणि विणाने त्या दोघांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांच्या प्रेमाविषयी व लग्नाविषयी आपापल्या घरी सांगायचे असे ठरवले होते. विणाचे हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर तिला लगेच पुण्यातच एका हॉटेलमध्ये जॉब मिळाला.
विणाने जॉब मिळाल्यावर आपल्या आईवडीलांची सागरशी ओळख करून दिली आणि आईवडीलांना सांगितले की मी व सागर दोघे एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्ही दोघे लग्न करणार आहोत.
ह्यावर विणाचे आईवडील विणाला म्हणतात, आम्हाला सागर जावई म्हणुन पसंत आहे; पण तु शहरात वाढलेली. तुला गावात रहायला जमेल का ?
तेव्हा विणा आईवडीलांना म्हणते, मला गावात रहायला आवडेल.
सागरचे शिक्षण झाल्यानंतर त्याने गावी जाऊन आपल्या आईवडीलांना विणा आणि त्याच्या प्रेमाविषयी व ते ऐकमेकांशी लग्न करणार आहेत हे सांगितले. तेव्हा सागरच्या आईने त्यांच्या लग्नाला विरोध केला. तिच्या मते शहरातल्या मुलींना शिक्षणाचा अभिमान असतो. त्यांना स्वयंपाकपाणी काही येत नाही. त्यांना फक्त नटणेमुरडणे व भटकणे एवढेच येते. त्यांना गावात रहायला आवडत नाही.
त्यावेळी सागरने आईला समजावले की विणाला माहीत आहे की मी गावात राहुन शेती करणार आहे आणि विणा माझ्याबरोबर गावात राह्यला तयार आहे. विणाला सगळा स्वयंपाक करता येतो. तिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. तु आणि बाबा तिला व तिच्या आईवडिलांना आधी एकदा भेटातरी. मग तुमचा निर्णय सांगा. मला खात्री आहे. तुला विणा आवडेल आणि तु आमच्या दोघांच्या लग्नाला परवानगी देशील.
©️®️सौ. ज्योती प्रशांत सिनफळ

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा