Login

भाग दुसरा मत परिवर्तन

मत बदलणे
सागरच्या हट्टापुढे सागरचे आईवडील विणाला व तिच्या आईवडिलांना भेटायला तयार होतात. ते सागरला सांगतात, विणा आणि तिच्या आईवडिलांना आपल्या घरी भेटायला बोलव.
‌‌विणा आणि तिचे आईवडील सागरच्या घरी सागरच्या आईवडीलांना भेटायला आणि सागरचे घर पाह्यला येतात. विणा सागरच्या घरी साडी नेसुन येते. विणा घरात आल्यानंतर सागरच्या आईवडीलांच्या पाया पडते. सागरची आई विणाला म्हणते, विणा तु शहरात वाढलेली मुलगी आहेस. तुला आमच्या गावात राह्यला जमेल का? तुला तुझी नोकरी सोडावी लागेल. त्यावर विणा सागरच्या आईला म्हणते. मला गावात राह्यला आवडेल आणि इथे आल्यावर मला नोकरी करता येणार नाही ह्याची कल्पना सागरने मला आधीच दिली होती. मी ह्या सर्व गोष्टींचा विचार करुनच सागरशी लग्न करण्याचा विचार केला आहे.
विणाचे विचार ऐकल्यावर सागरचे आईवडील सागर, विणाच्या लग्नाला परवानगी देतात.
सागर व विणाचे लग्न खुप धुमधडाक्यात सागरच्या गावी होते. सागरच्या घरात विणासमोर सगळी सुखे हात जोडुन उभी असतात. सागरच्या घरी सगळ्या कामाला बाई असते, फक्त स्वयंपाकाचे काम विणा करत असे. सागर शेताच्या कामातून वेळ मिळाला की विणाला बाहेर खरेदीला, सिनेमाला व बाहेर फिरायला घेऊन जाई. सागरचे आईवडील पण विणाशी प्रेमाने वागायचे; पण तरीही विणा आंनदात नव्हती, कारण विणाला नोकरी करायची सवय होती. त्यामुळे दिवसभर घरात बसुन तिला कंटाळा यायला लागला होता आणि दुसरे कारण म्हणजे सागर आणि सागरचे आईवडील पैश्याच्या बाबतीत खुपच कंजुस होते. विणा साधी भाजी घ्यायला गेलीतरी आल्यावर तिला तिच्या सासुला पै आणि पैचा हिशोब द्यावा लागे. विणाला स्वतःसाठी काही घ्यायचे असेलतर प्रत्येक वेळी सागर किंवा त्याच्या आईकडे पैसे मागावे लागे. सागर आणि त्याचे आईवडील प्रत्येक गोष्ट खरेदी करताना ती गोष्ट स्वस्त आणि मस्त कशी मिळेल ह्याचा विचार करायचे. ह्या सर्व गोष्टीचा विणाला खुप त्रास होत असे. ती ह्याबाबत सागरशी बोलते पण त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे तिने ह्या विषयावर आपल्या आईवडीलांशी बोलायचे ठरवले.
विणा जेव्हा तिच्या माहेरी जाते तेव्हा तिच्याकडे बघुन तिची आई तिला विचारते, विणा तु आनंदात आहेस ना तुझ्या संसारात. तेव्हा ती तिच्या सासरकडची परिस्थिती तिच्या आईवडीलांना सांगते.
©️®️सौ. ज्योती प्रशांत सिनफळ

0

🎭 Series Post

View all