Login

भाग तिसरा मत परिवर्तन

मत बदलणे
त्यावर विणाचे वडील विणाला म्हणतात, विणा तु हॉटेल मॅनेजमेंन्टची पदवी घेतली आहेस. त्याचा उपयोग तु तुमच्या बागेतल्या चिकूचे पल्प, आईसक्रीम, जॅम व बर्फी असे विविध पदार्थ बनवुन विकण्याचा घरगुती व्यवसाय चालु कर. तु तुझ्या नोकरीत हेच करायचीस ना. त्यामुळे तुझ्या शिक्षणाचा उपयोग घरात राहुन होईल आणि प्रत्येक वेळी तुला तुझ्या नवरा किंवा सासुला पैसे मागावे लागणार नाही. आणि ह्यातुन घरात पैसे येणार त्यामुळे तुझा नवरा आणि सासुसासरे ह्यासाठी नाही म्हणणार नाही. वडीलांचा सल्ला विणाला पटला.
विणाने सासरी आल्यावर तिच्या घरगुती व्यवसायाबद्दल आधी सागरला सांगते. सागर आधी नाही म्हणतो; पण त्या व्यवसायातील फायदा जेव्हा विणा त्याला पटवुन देते. त्यावेळी तो तिला म्हणतो, आधी हे सर्व पदार्थ आईबाबांना बनवुन खायला दे. त्यांना हे पदार्थ आवडले की आपण त्यांच्या समोर तुझ्या व्यवसायाबद्दल बोलू. विणाने चिकूची बर्फी, जॅम, पल्प व आईसक्रीम बनवुन सासुसासर्‍यांना खायला दिले. त्यांना हे पदार्थ खुप आवडले. तेव्हा सागरने त्याच्या आईवडीलांना सांगितले की विणाला चिकूचे आईसक्रीम, पल्प, जॅम व बर्फी ह्याचा घरगुती व्यवसाय करायचा आहे. तिने ह्याचेच शिक्षण घेतले आहे. ह्यासाठी जास्त खर्च येणार नाही आणि आपल्याला त्याचा खुप फायदा होईल. चिकूसोबत विणानी बनवलेल्या वस्तू पण आपण बाजारात विकायला ठेऊ शकतो. त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे. त्यावेळी थोडा विचार करून सासुसासरे विणाला घरगुती व्यवसाय करायला परवानगी देतात. हे ऐकुन विणाला खुप आंनदं होतो.
विणाने बनविलेल्या चिकुचे, आईस्क्रीम, पल्प, जॅम व बर्फीला बाजारात भरपुर प्रमाणात विकले जातात. विणाच्या ह्या व्यवसायामुळे गावातील लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे सगळेजण विणाच्या सासुसासऱ्यांचे कौतुक करु लागतात. तुमच्या सुनेमुळेच आम्हाला रोजगार मिळाला. नातेवाईक व मित्रपरिवारात विणाची व तिच्या व्यवसायाचे खुपच कौतुक होऊ लागते. हे बघुन सागरच्या आईचे विणाबद्दलचे मत बदलते. ती विणाला म्हणते, विणा मला माफ कर. शहरातील मुलींविषयी माझा गैरसमज होता. तो तु आज बदलुन दाखवलास. मला वाटायचे शहरातल्या मुली फक्त भटकभवान्या असतात, त्यांना त्यांच्या शिक्षणाचा खुप अभिमान असतो. त्यांना स्वयंपाकपाणी येत नाही. ते घर तोडतात, पण तु हे दाखवून दिलेस की शहरातील सगळ्याच मुली तश्या नसतात.
©️®️ सौ. ज्योती प्रशांत सिनफळ

0

🎭 Series Post

View all