Login

मातीतलं सोन भाग १

जसजस मोठ्या भावांच्या मुलांची लग्न झाली. तसतस घरात गैरसमजुतीचे वलय वाढायला लागले आणि एवढे वर्ष एकत्र नांदत असलेले कुटूंब पुढच्या काही वर्षात वेगवेगळे चूल मांडू लागले.
“काय शारदे?” वामन सकाळीच तिच्या घरी पोहोचला. “कधी यायच म्हणतोय तुझा लेक?”

“आज दूपारच्या गाडीला येणार आहे.” शारदा हलकेच हसत बोलल्या.

“त्याला घ्यायला जायला लागेल ना स्टॅन्डवर?” वामन कमरेवर हात ठेवत बोलला.

“हे घ्यायला गेले आहेत.” शारदा किचनमधलं आवरत बोलली.

“बरं.” वामन तिथेच घुटमळत बोलला.

वामनची चाललेली चलबिचल शारदाला चांगलीच माहीती होती. ती म्हणजे त्यांच्या लग्नात गृहप्रवेशाच्या वेळेस शारदाने तिच्या वहिनीकडे मागितलेली वामनची मुलगी आणि आज शारदाचा मुलगा शहरात चांगला शिकून सवरून गावी येत होता. म्हणून वामन त्याच्या बहिणीच्या घरी सकाळीच येऊन पोहोचला होता.

हरी सकाळीच मुलगा येणार याच्या आनंदात तालुक्याच्या ठिकाणी आपल्या मुलाच्या आवडीचे खास गुलाबजाम आणायला गेले होते. येता येता मुलाला ते घेऊन येणार होते.

हरीला वारशाने कैक एकरची जमिन मिळाली होती. तस त्यांच एकत्र कुटूंब होत. हरी त्याच्या चार मोठ्या भावांसोबत एकत्र रहात होता. जोपर्यंत आई वडिल होते, तोपर्यंत सगळ काही व्यवस्थित चालू होते. एवढचं काय? आई वडील गेल्यानंतरही सगळ काही व्यवस्थित चालू राहील होत.

पण जसजस मोठ्या भावांच्या मुलांची लग्न झाली. तसतस घरात गैरसमजुतीचे वलय वाढायला लागले आणि एवढे वर्ष एकत्र नांदत असलेले कुटूंब पुढच्या काही वर्षात वेगवेगळे चूल मांडू लागले. त्यांची मूल तर वाटणी घेऊन, त्या पैशाने आई वडीलांना गावीच ठेवून शहरात रहायलाही गेले. बोलायला तर बोलले होते की शहरात आमच्यासोबत राहयला या, पण ते किती मनापासून बोलले होते? ते त्यांच्या आई वडीलांना चांगलच समजून गेल होत.

तस वेगळी राहायची या चारही भावांची इच्छा तर नव्हती. पण मूल आणि सूनांच्या हट्टापूढे त्यांच काहीच चालल नाही.

आजही गावाकडे असणारा त्यांचा हा वाडा दिमाखात उभा होता. पण त्यातली माणस ज्यांना जशी जमिन मिळाली तसे त्या जमिनीवर घर बांधून त्यात जाऊन राहू लागले. हरी मात्र आजही तो वाडा सांभाळत होता. तोही बराच जूना असल्याने आणि घरातली माणस दूरावल्याने त्यालाही अवकळा आली होती.

पण आज तो वाडा जरा चांगलाच सजला होता. तो ही त्याच्या नव्या वारसदाराची वाट बघत होता. जणूकाही त्याची उतरलेली अवकळा काढून टाकणारा तो शेवटची आशा होता.

हरी त्याची सगळीच खरेदी आणि काम आटपून बसस्थानकावर गेला. त्याची बस यायला अजूनही अर्धा तासाचा अवकाश होता.

सारंग, शारदा आणि हरीचा मोठा मूलगा. गावात चौथी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो शहरात शिकायला गेला होता. ॲग्रीकल्चरमध्ये डिग्री घेऊन तो परततं होता. अभ्यासात हुशार असल्याने तो उत्तम मार्कांनी पास झाला होता. म्हणूनच त्याने त्याच्या कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मुलाखत न देताही त्याला दोन ते तीन कंपन्यांनी जॉबसाठी ऑफर पाठवली होती. पण त्याने त्याला नकार देत आपल्या गावचा रस्ता पकडला होता. स्वतःहून चालत आलेल्या जॉबला दिलेल्या नकाराची गोष्ट त्याने त्याच्या घरच्यांपासून मात्र लपवून ठेवली होती.

इयत्ता चौथीच वर्ष संपल्यानंतर सारंगला ह्याच बस स्थानकावर सोडायला हरी आणि त्याची आई शारदा आली होती. शहरात आपल्या मोठ्या भावाचा एक मुलगा असून सुद्धा हरीने सारंगला होस्टेलवर ठेवलं होत. त्याच कारण हरीच्या भावांना माहिती होत. पण त्याबद्दल बोलल कोणीच नव्हत. त्यावेळेस झालेली सर्व घटना हरीला आता जश्याच्या तशी आठवली होती. त्यावेळेसही शरदाच्या भावाने म्हणजेच वामननेच मदत केली होती.

ह्या सर्व आठवणीमध्ये कधी अर्धा तासाचा एक तास उलटून गेला ते हरीलाच समजल नाही. बस स्थानकाच्या खडकाळ रस्त्यावरून धडाडत आलेल्या बसच्या आवाजाने हरी त्याच्या विचारातून बाहेर आला. हरीने समोर मान वर करून पाहिलं तर शहराकडून येणार ती बस धूळ उडवत दिमाखात बस स्थानकात प्रवेश करत होती.

त्या बसा स्थानकावर वाट बघत आळसावलेल शरीर त्या बसला आलेलं बघून परत तरतरीत झाल. बस थांबल्यासरशी बसच्या दारापुढे पुढील मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी केली. तर त्य गर्दीतून बसमधून उतरणारे प्रवाशी कशीतरी वाट काढत त्या बसमधून उतरत होते.

पुढच्या काही क्षणात हरीचा चेहरा उजळला गेला, कारण बसमधून सारंग उतरला होता. शालेय शिक्षण घेत असताना तरी तो सुट्ट्या मिळाल्या मिळाल्या तो घरी येत होता. पण जस त्याने अग्रीकल्चरसाठी प्रवेश घेतला तस गेले तीन वर्ष त्याला गावी यायला वेळच मिळाला नव्हता. जी काही खबरबात होती ती फक्त फोनवरच होत होती. तीन वर्षानंतर त्याला हरी बघत होता.

उंचापुरा, वडिलांप्रमाणेच मिसरूड ठेवलेली. तब्येतीने बारीक दिसत होता. तस तर प्रत्येक आई वडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी बाहेरून आल्यावर बारीकच झालेली दिसते. कारण घरच जेवण त्यांना मिळत नाही. पुढच्या काही सेकंदातच सारंग हरीजवळ पोहोचला. त्याने लगेच त्यांना वाकून नमस्कार केला.

तस तर त्याला अचानक येऊन सरप्राईज द्यायचं होत. पण महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर अग्रीकल्चरला प्रवेश घेण्यापूर्वी तो असाच न सांगता अचानक आला होता. तेव्हा शारदा त्याला खूप ओरडली होती.

‘आम्ही घरी नसतो तर?”

‘जेवण तयार नसत.’

‘अस न सांगता कोणी येत का?’

असे एक ना अनेक प्रश्नांना सारंगला सामोरी जाव लागल होत. शेवटी आईच काळीज असत. ते थोडीच काळजी करण सोडणार असत. म्हणून ह्यावेळेस खास आठवडभर आधीच फोन करून तो आला होता.

हरी सारंगला चालण्यासाठी बोलले, तोच सारंगने पाठीमागे वळून पहिले. मग हरीचही लक्ष पाठीमागे गेल. पाठीमागे सारंगच्याच वयाची मुलगी उभी होती. जी सारंग सोबत आली होती. तिला पाहून हरी जरा गोंधळले. त्यांना गोंधळलेल बघून सारंग बोलला.

“माझी वर्ग मैत्रीण, श्रद्धा.” सारंगने तिला इशारातच जाल बोलावले. ती देखील पटकन पुढे आली आणि वाकून हरीला नमस्कार करू लागली.

“बस बस, सुखी रहा.” हरी तिला आशीर्वाद देत बोलले.

“सध्या जॉबला सुट्टी होती.” सारंग “मग ती म्हणे सोबत येते. मग आलो घेऊन.”

“अस होय.” हरी हलकेच हसत बोलले. “चांगल आहे की. नाहीतर गावाकडे यायचं म्हटलं की आजच्या मुलांची तोंड वाकडी होतात.”

“मग आतापासून सवय लावायला नको.” श्रद्धा हलकेच हसत बोलली.

तसे हरी तिला चमकून बघू लागले. तर दुसरीकडे सारंगनेही तिच्याकडे बघत ‘काय आहे?’ असा नजरेनेच इशारा केला. यावर ती खांदे उडवत हलकेच हसली.

पण इकडे हरीला मात्र काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटायला लागल. त्यांच्या घरी आलेले वामन त्यांना आठवू लागले.

मग ते तिघेही गाडीत बसून घरी यायला निघाले. गाडीतही श्रद्धा हरींसोबत मनमुराद गप्पा मारत होती. घरात कोणाला काय आवडत? घरातले कसे आहेत? या बद्दल चौकशी करू लागली. मग हरीला सारंग आणि श्रद्धावर जरा शंका यायला लागली. त्यांना तर आता त्यांच्या बायकोची भीती वाटायला लागली. पुढे जाऊन तर त्यांची शंका खरी ठरली, तर ‘ह्या सटवीला घरी का घेऊन आले?’ हा शारादाचा रागाने आलेला प्रश्न हरींना आत्ताच दिसायला लागला.

पुढच्या अर्ध्या तासात ते त्यांच्या घरी पोहोचले. शारदाने सारंगवरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. सोबत आलेल्या श्रद्धावरूनही तुकडा ओवाळला आणि दोघांनी घरात घेतलं.

दोघाही फ्रेश झाले. सारंगने श्रद्धाची त्याच्या आई सोबत ओळख करून दिली. तिथेच मामांना बसलेलं बघून त्यांनाही तो भेटला. तोपर्यंत शारदाने सर्वांसाठी चहा देखील टाकला. बाहेरच्या खोलीत गप्पांना उधाण आल. थोडावेळ गप्पा मारून झाल्यावर श्रद्धा शारदाला मदत करायला किचनमध्ये गेली. आता तर हरीला त्यांना आलेली शंका खरी वाटायला लागली. तर त्यांचा चेहरा बघून सारंगला खूप हसायला येत होत. पण त्याने ते मुश्किलीने दाबून ठेवलं.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all