मागील भागात.
सारंगने श्रद्धाची त्याच्या आई सोबत ओळख करून दिली. तिथेच मामांना बसलेल बघून त्यांनाही तो भेटला. तोपर्यंत शारदाने सर्वांसाठी चहा देखील टाकला. बाहेरच्या खोलीत गप्पांना उधाण आल. थोडावेळ गप्पा मारून झाल्यावर श्रद्धा शारदाला मदत करायला किचनमध्ये गेली. आता तर हरीला त्यांना आलेली शंका खरी वाटायला लागली. तर त्यांचा चेहरा बघून सारंगला खूप हसायला येत होत. पण त्याने ते मुश्किलीने दाबून ठेवलं.
आता पूढे.
शारदाने तर श्रद्धाला खूपच मनाई करून पहिली. पण तिने त्यांच काही ऐकलच नाही. चहा झाल्यावर ती देखील त्यांच्यासोबत चहा घेऊन बाहेरच्या खोलीत आली. सर्वांनी चहाचा आस्वाद घेतला. सारंगच मन तर तो चहा घेऊन तृप्त झाल होत. प्रवासाचा सर्व थकवा त्याचा क्षणात नाहीसा झाला.

चहा पिऊन झाल्यावर सारंग त्याच्या आईसोबत गप्पा मारत बसला. बाजूला श्रद्धा होतीच. ती देखील दोघांमध्ये शामिल झाली. सारंगच्या लहानपणाच्या एक एक खोड्या शारदाला विचारात होती. नंतर तिने देखील तिच्या गावी असलेल्या घराबद्दल सांगायला सुरवात केली. अशातच दुपारच्या जेवणाची वेळ झाली. आताही श्रद्धा शारदाच्या मदतीला होती.
दुपारच्या जेवणाला ते बसणारच होते तेवढयातच एखाद वादळ जोरात येऊन दारावर आपटाव आणि त्याने ते दार चांगलच वाजाव. अश्या पद्धतीचा आवाज झाला. तसे सारांगसोडून सगळेच दाराकडे बघू लागले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते. तर आपला सारंग मनातच हसत होता. कारण त्याला आता कोण आल असेल? याचा आधीच अंदाज लागला होता.
दारावर उभी असलेल्या तिच्या चेहऱ्यावर जरा राग दिसून येत होता. धावतच आल्याने लागलेली धाप, तिच्या नाकपुड्या सतत वरखाली होत होत्या. केसांची चेहऱ्यावर आलेली एक बट आवरत ती सरळ येऊन वामनच्या बाजुला बसली.
“काय गं?” वामन तिला विचारू लागले. “येणार नव्हतीस ना? तेव्हा तर चिडून बोलली होती. मग आता कशी उगवलीस?”
“काही नाही बाबा, ते असच.” तिने सारंगवर तिची नजर स्थिर ठेवत बोलली. “काम झाल मग आली.”
मग शारदाने तिलाही जेवण वाढले. श्रद्धाने वाढलेल्या जेवणातून एकच घास खाल्ला आणि पुढच्याच क्षणाला तिच्या डोळ्यातून सरकन पाणी ओघळल.
“ईऽऽऽऽऽऽस” श्रद्धा हाताने चेहऱ्याला हवा घालत तोंडातून आवाज काढू लागली.
तिला तिखट लागलेलं बघून शारदाने तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. तिनेही एका दमात ते पाणी पिऊन टाकल.
“अगं तुला सवय नाही तिखट खायची तर बोलली असतीस ना?” शारदा काळजीने बोलल्या आणि नंतर सारंगकडे वळल्या. “आणि तुला सांगायला काय झाल होत रे?” शारदाने सगळा राग सारंगवर काढला.
“तिलाच हौस आहे गावाकडच आयुष्य जगायची.” सारंग तर सहज बोलून गेला. पण दुसरीकडे तिला म्हणजेच वैष्णवीला ठसकाच गेला. ती डोळे विस्फारून श्रद्धाकडे बघू लागली. तर तिला बघून सारंगला मनातच खूप हसायला येत होत. पण तो अजूनही स्वतावर ताबा ठेऊन होता.
एव्हाना श्रद्धाला लागलेला तिखटपणा कमी झाला. शारदानेही तिला गुळ आणून दिला. तिने तिचे ओलावलेले डोळे पुसले आणि सगळ्यांकडे बघत उगाच हसून बघू लागली.
“नको नाटक करूस.” सारंग आता इथे त्याची हसण्याची हौस पूर्ण करून घेतली होती, ज्याची जाणीव श्रद्धाला झाली. “सगळ्यांना समजल की तुला तिखट लागल ते.”
श्रद्धा त्याला बारीक डोळे करून बघू लागली आणि ‘तुला नंतर बघते.’ अस इशा-यातच बोलून गेली.
हा सगळा प्रकार वैष्णवी बघत राहिली. तसा तिच्या रागाचा पारा वाढू लागला. पण ती स्पष्ट बोलू पण शकत नव्हती. कारण तिनेच तर त्याला तोऱ्यात नाही नाही ते सुनावल होत. मग आता काही बोलण म्हणजे माघार घेण्यासारखं होणार होत. मग ती फक्त मनातच भांडायचं काम करत होती.
दुपारची जेवण आटोपली आणि सारंग सरळ झोपायला निघून गेला. श्रद्धाला देखील एक खोली झोपण्यासाठी दिली होती. मग ती तिथे जाऊन झोपली. वैष्णवीची तर झोपच उडाली होती. ती शारदाला किचनच्या कामात मदत करत होती. पण तिचं मन तर अजूनही श्रद्धाच्या आसपासच घुटमळत होत. शारदाने तिला त्याबद्दल विचारलही होत. पण तिने ते हसून टाळल होत. थोड्यावेळाने वामन आणि वैष्णवी त्यांच्या घरी निघून गेले. तिची तर निघायची इच्छा नव्हती. पण थांबण्यासाठी दुसर काही कारणही तिच्याकडे नव्हत. मग नाईलाजाने ती तिच्या वडिलांसोबत घरी निघून गेली.
संध्याकाळच्या चहाच्या सुमारास सारंगने श्रद्धाच्या त्याच्या गावी येण्याच नियोजन सांगितलं. तेव्हा कुठे हरीच्या मनातल्या शंका दूर पळल्या. त्यांच्या त्या शंका ऐकून ते सगळेच मनसोक्त हसले.
दुसऱ्या दिवापासून सारंगने त्याच्या वडिलांना मिळालेल्या शेतीकडे लक्ष द्यायला सुरवात केली. शेतात पिक पिकत नाही म्हणून हरीच्या मोठ्या भावांच्या मुलांनी त्यांना मिळालेली काही शेतजमीन अजून विकली होती. पण सारंगला त्याच शेतजमिनीमध्ये काहीतरी करताना बघून त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यांनी सारंगला वेड्यात काढून त्याच्याकडे दुर्लक्ष केल. मग सारंगने त्यांचा विषय सोडला.
सारंगने त्याच कौशल्य पणाला लावलं. मिळालेल्या शेतजमिनीच्या मातीची तपासणी करून आणली. त्यात कोणती पिक येऊ शकतात? कोणती पिक आलटून पालटून घेतल्याने शेतजमिनीचा कस टिकण्यात मदत मिळेल? आजूबाजूची पाण्याची परिस्थिती, वातावरणाचा अंदाज ह्या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन त्याने तिथेच शेती करण्याचा निर्णय जाहीर केला. तसा घरच्यांना धक्काच बसला. एवढा शिकून सवरून आलेला मुलगा गावी येऊन शेती करतो. हेच यांना पचनी पडत नव्हते.
सगळ्यांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण सारंग आपल्या निर्णयावर ठाम राहीला. जेव्हा सगळे त्याच्यावर हसत होते. तेव्हा तो त्याच्या शेतातल्या घरात संशोधनात व्यस्त होता. सारंगच्या मोठ्या काकांची मुल शेजामींनी विकून चारचाकी गाड्यात फिरू लागली. सारंग मात्र आजही त्याच्या वडिलांच्या छोट्याश्या गाडीत अभिमानाने त्याच काम करून घेत होता.
पुढचे चार ते पाच महीने श्रद्धाही सारंगला जमेल तशी मदत करत राहली. तिला सारंगच्या एवढ मागे पुढे करताना बघून वैष्णवीच्या मनातल्या इगोवर तिच्या मनातल प्रेम भारी पडलच. पण अस लगेच सारंगला जाऊन सांगण्यापेक्षा तिने सरळ तिची लाडकी आत्या गाठली. तिचं आजच बिथरलेल रूप बघून शारदाही क्षणभर गोंधळली. तिने वैष्णवीला डोळ्यांनीच काय झाल म्हणून विचारलं. तशी वैष्णवी बोलत सुटली.
“आत्या तुझ्या लेकाला सांगून ठेव,” वैष्णवी आठ्या पडून बोलली. "तिच्यापासून लांब राहायला.”
“आता तुला काय झाल?” शारदा काहीच न समजल्यासारख बोलू लागली. “आणि कोणाबद्दल बोलत आहेस?”
“उगाच न समजल्यासारख बोलू नकोस.” वैष्णवी आता जारा चिडून बोलली. “तिचं ती, त्याच्या सोबत आली आहे ती.”
“आता मला काहीच समजत नाहीये तू कशाबद्दल बोलत आहेस.” शारदा तिचं काम करत बोलली. “आणि त्याला मी का अडवू? त्यांच ते पाहून घेईल. असही ती मुलगी खूपच गोड आहे की.”

“असुदेना.” वैष्णवी तोंड वाकड करत तिथून निघून गेली. तिला अस जाताना बघून शारदा मात्र मनातच हसली.
क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा