Login

मातीतलं सोन भाग ३

जेव्हा सारंगने तो शेतमाल तालुक्याच्या बाजारात विकायचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र तालुक्याच्या बाजाराच्या तिथल्या अधिकार्यांनी तो घेण्यास मनाई केली. तसेच त्या बाजाराच्या ठिकाणी त्याला व्यवसायाला जागाही मिळू दिली नाही.
मागील भागात.

“आत्या तुझ्या लेकाला सांगून ठेव,” वैष्णवी आठ्या पडून बोलली. “तिच्यापासून लांब राहायला.”

“आता तुला काय झाल?” शारदा काहीच न समजल्यासारख बोलू लागली. “आणि कोणाबद्दल बोलत आहेस?”

“उगाच न समजल्यासारख बोलू नकोस.” वैष्णवी आता जारा चिडून बोलली. “तिचं ती त्याच्या सोबत आली आली आहे ती.”

“आता मला काहीच समजत नाहीये तू कशाबद्दल बोलत आहेस.” शारदा तिचं काम करत बोलली. “आणि त्याला मी का अडवू? त्यांच ते पाहून घेईल. असही ती मुलगी खूपच गोड आहे की.”

“असुदेना.” वैष्णवी तोंड वाकड करत तिथून निघून गेली. तिला अस जाताना बघून शारदा मात्र मनातच हसली.

आता पूढे.

दुसरीकडे सतत जाणारी वीज बघून सारंगने त्याच्या शेतीच्या कामासाठी सरकारी कार्यालयात चार महिन्यापूर्वी अर्ज करून एका योजनेअंतर्गत सौर उर्जेच्या प्रकल्पाची मागणी केली. तब्बल चार महिन्यानंतर त्याला तो प्रकल्प मिळाला होता. त्यामुळे विजेची टंचाई दूर झाली. शेजारच्या धरणातून पाणी आणण्यासाठीही त्याला सरकारी कार्यालयात खूप हेलपाटे मारावे लागले. त्या धरणापासून त्यांच्या शेतजमिनीपर्यंत पाणी आणणे. त्यासाठी पाईपलाईन टाकणे. त्यासाठी लागणारी पाण्याची मोटार आणणे. ह्या सारखी काम करता करता बराच उशीर होत होता. पण सारंग काही थांबला नाही. मेहतनीने आणि चिकाटीने त्याने त्याला हव ते सर्व मिळवलं आणि शेतीच काम सुरु केल. सारंग स्वतः मातीत उतरला, हरींचा अनुभव आणि स्वतः शिकलेल्या नवनवीन पद्धती याने ती जमीन कसायला सुरवात केली.

ह्या सर्वात नुसतेच सल्ले देणारे, उपेशाचे डोस पाजणारे, पाय खेचणारे, प्रसंगी अडचणी उभे करणारे बरीच माणसं त्याला भेटली. पण तो कशानेही बाधला नाही. मेहनतीच्या फळाला वेळ लागतो. पण ते जेव्हा मिळत ना त्याच सुख आणि समाधान ह्याच मोल करण्याच सार्मथ्य कशातही नसत. सारंगच्या मेहनतीला तब्बल सहा महिन्यांनी फळ यायला सुरवात झाली. त्याने जसा अंदाज बांधला होता. त्याचा निकालही तसाच त्याला मिळायला लागला.

सारंगच्या शेतीतल उत्पन्न बघून बऱ्याच लोकांचे डोळे विस्फारले गेले. काहींना कौतुक वाटल. तर काहींना ईर्ष्या. मग काय? त्याच्या वाटेत अजून अडचणी कश्या येतील याची पुरेपूर काळजी घेतली जाऊ लागली. जेव्हा सारंगने तो शेतमाल तालुक्याच्या बाजारात विकायचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र तालुक्याच्या बाजाराच्या तिथल्या अधिकाऱ्यांनी तो घेण्यास मनाई केली. तसेच त्या बाजाराच्या ठिकाणी त्याला व्यवसायाला जागाही मिळू दिली नाही.

सारंगला जेव्हा या मागच्या माणसांची माहिती मिळाली. तेव्हा तो स्वतःशीच हसला.

“स्वतःही जमीन कसायला नको आणि दुसऱ्याने कसली तर त्यालाही कसू देणार नाही. म्हणे जमीन पिकत नाही.” सारंग दीर्घ श्वास घेत बोलला.

संध्याकाळच्या वेळेस तो, हरी, शारदा आणि श्रद्धा घरासमोरच्या ओट्यावर बसून गप्पा मारत बसले होते. त्यावेळेस सारंगने त्याच्या घरच्यांना गावातलीच मंडळी कशी त्याला काम करू देत नाहीयेत ते त्यांना सांगत होता.

“पाणी आणून दिल.” सारंग “लाईट जाते म्हणून सौर उर्जेचा प्रकल्प आणला. जमिनीची तपासणी करून दिली. कोणत्या पिकाला बाजारभाव येईल ते सांगितलं. ह्याचा एक रुपया घेतला नाही. एवढ सगळ करून मला काय मिळाल? तर माल विकायला जागाही मिळू नये? आता बाकी ठिकाणी सोयी नाहीत, पाणी नाही. तिथे समजू शकतो की पावसावरच अवलंबून आहे. पण इथे तर मी सर्व आणल होत ना? तरी त्यांचे पिक आले नाही आणि माझेच आले म्हणून राग धरायचा? त्या वरच्या आळीच्या सदा काकांनी माझ ऐकल. त्याचं शेतही पिकांनी फुलल आहे. ते नाही बघत कोणी.”

सारंग बऱ्याच दिवसांनी मोकळ होत होता. वाईट तर सगळ्यांनाच वाटत होत. तो माल विकला जाणार नाही. हा प्रश्नच नव्हता त्याला. त्याने त्यासाठी शहरातले खरेदीदार शोधून ठेवले होते. त्यांचाकडे त्याने आधीच शेतमालाचे नमुने पाठवून दिले होते. त्यांनाही ते आवडले होते आणि पुढच्या काही दिवसातच सारंगचा सगळा शेतमाल ते घेऊन जाणार होते.

ह्या चौघांच्या गप्पा चालू असतानाच तिथे सदा काका आले. आल्या आल्या त्यांनी सारंगला घट्ट मिठी मारली. हातात असलेल्या पिशवीतून पैसे काढून ते सारंगच्या पायावर ठेवणार होते. तोच सारंग पटकन मागे झाला.

“अहो काका अस काय करता?” सारंग त्यांना उभ करत बोलला. “लक्ष्मी आहे ती. देव घरात ठेवा.”

“ह्या घडीला तूच तर आमच्यासाठी देव बनून आलास.” सदा काका हळवे झाले होते. “एवढी वर्ष शेती केली. पण आजवर एकसंध एवढी रक्कम कधीच पहिली नव्हती.”

सारंगने त्यांना कांद्याचा बाजाराचा अंदाज घेऊन कांदा लावायला सांगितला होता. आता बाजारभाव नसल्यावर तो लावायचा म्हटल तर सगळ्यांनीच त्यांना वेड्यात काढले होते. पण जसा जमा झालेला कांदा संपायला आला. तसा कांद्याचा भाव परत वाढू लागला. तोपर्यंत सदाचा कांदाही वाढून कापणीच्या तयारीला आला होता. त्यामुळे कांद्याचा वाढलेल्या भावाच्या वेळेसच सदाचा कांदा मार्केटला गेल्याने सदकाकांना त्या कांद्याचे चांगलेच पैसे मिळाले होते. त्यांचा कांदाही सारंगने थेट शहरातल्या एका व्यापाराला पोहोचवला होता. त्यामुळे त्या व्यापारालाही फायदा झाला होता आणि सदाकाकांनाही चांगले पैसे मिळाले होते. यामुळे त्यांच्या बऱ्याच अडचणी सुटणार होत्या.

थोड्याच दिवसात सारंगचा शेतमाल शहराकडे निघून गेला. गावात आलेला शहरी ट्रक बघून गावातल्या बऱ्याच लोकांच्या नजरा सारंगला लागल्या नसतील तर नवलच होत. एव्हाना श्रद्धा ज्या कामासाठी आली होती. ते कामही तिचं संपत आल होत.

शहरात पाठवेलेल्या शेतमालाचे सारंगला लाखो रुपये मिळाले होते. शेतीच्या जोडीलाच सारंगने इतर एक दोन जोड धंदेही सुरु केले होते. त्यातूनही आता थोडफार उत्पन्न मिळायला लागल. आलेला पैसा सारंगने त्याच्या जोड धंद्यासाठी लावला. तर काही पैसा राहता वाडा सुधरवण्यासाठी लावायला घेतला.

एवढे दिवस कष्ट करणारा सारंग कोणालाच दिसला नव्हता. पण जसा त्याच्याकडे पैसा खेळू लागला. तसा तो इतरांना खुपू लागला. इतका की गावातल्या काही लोकांनी सारंगच्या मोठ्या काकांच्या इतर मुलांना तो रहात असलेल्या वाड्यात हिस्सा मागण्याचे सुचवले होते. कारण तो वाडा आता सुधारणा केल्यामुळे अजूनच खुलून दिमाखात उभा केला होता.

स्वतःच्या वाटणीची जमीन विकून आलेलले पैसे उडवून झाल्यावर त्यांनाही अजून पैश्यांचा मोह आवरला गेला नाही. मग त्याच काही लोकांच्या नादाला लागून ते परत सारंगसोबत जवळीक वाढवू लागले. त्याच्या भावाच्या एक बायकोने तर सारंगसाठी तिच्या ओळखीतले स्थळही आणले होते. कारण तोपर्यंत सारंगच्या शेती आणि त्याने लाखो रुपयाच पॅकेज सोडून त्या शेतीसाठी घेतलेल्या मेहनतीची बातमी न्यूजवाल्यांनी आणि श्रद्धाने तिच्या पी एच डी साठी केलेल्या संशोधनाने पूर्ण महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यांची मनात असलेली मनीषा सारंग न ओळखण्याइतपत मूर्ख तर नक्कीच नव्हता. पण काही झाल तरी ते आपल्या वडिलांच्या भावांचे मुल होती. त्याची ती भावंड होती. म्हणून त्याला त्यांच्याशी तोडूनही बोलता येत नव्हत. तेवढे चांगले संस्कार तर त्याच्यावर हरी आणि शारदांनी केले होते.

सारंग त्यांच्या बोलण्याला भुलत नाही म्हटल्यावर त्यांनीच गावातल्या पंचांना आणि काही गावाकारींना सोबत घेत, सारंगकडे त्या राहत्या वाड्यात हिस्सा मागयला सुरवात केली. कारण तो आणि हरी त्यांच्या भावांना आणि भावांच्या मुलांना नाही म्हणणार नाही. याची खात्री त्यांना होतीच.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all