Login

मातीतलं सोन अंतिम भाग

“खबरदार बाबांना काही बोललात तर.” वैष्णवी खवळून बोलली. “स्वतःच्या बापाला घराबाहेर काढल होतास तेव्हा कुठे गेली होती तुझी शिकवण?”
मागील भागात.

स्वतःच्या वाटणीची जमीन विकून आलेलले पैसे उडवून झाल्यावर त्यांनाही अजून पैश्यांचा मोह आवरला गेला नाही. मग त्याच काही लोकांच्या नादाला लागून ते परत सारंगसोबत जवळीक वाढवू लागले. त्याच्या भावाच्या एक बायकोने तर सारंगसाठी तिच्या ओळखीतले स्थळही आणले होते. कारण तोपर्यंत सारंगच्या शेती आणि त्याने लाखो रुपयाच पॅकेज सोडून त्या शेतीसाठी घेतलेल्या मेहनतीची बातमी न्यूजवाल्यांनी आणि श्रद्धाने तिच्या पी एच डी साठी केलेल्या संशोधनाने पूर्ण महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यांची मनात असलेली मनीषा सारंग न ओळखण्याइतपत मूर्ख तर नक्कीच नव्हता. पण काही झाल तरी ते आपल्या वडिलांच्या भावांचे मुल होती. त्याची भावंड होती. म्हणून त्याला त्यांच्याशी तोडूनही बोलता येत नव्हत. तेवढे चांगले संस्कार तर त्याच्यावर हरी आणि शारदांनी केले होते.

सारंग त्यांच्या बोलण्याला भुलत नाही म्हटल्यावर त्यांनीच गावातल्या पंचांना आणि काही गावाकारींना सोबत घेत, सारंगकडे त्या राहत्या वाड्यात हिस्सा मागयला सुरवात केली. कारण तो आणि हरी त्यांच्या भावांना आणि भावांच्या मुलांना नाही म्हणणार नाही. याची खात्री त्यांना होतीच.

आता पूढे.

पण ह्या वेळेस सारंग एकटाच नव्हता. त्याच्यासोबत उभी होती त्याची लक्ष्मी म्हणजेच वैष्णवी. तिला सारंग आणि त्यांच्या घरच्यांसमोर उभ राहिलेलं बघून बाकी सगळेच तिला गोंधळून बघू लागले. कारण एका गरीब घरातली मुलगी ती देखील त्यांच्याच गावातली, आता श्रीमंत होऊ पाहणाऱ्या मुलाच्या घरात जाणे. हे देखील कोणाच्या पचनी पडत नव्हत. पण गरजेला उभी राहिलेली ती कोणीच पहिली नव्हती. गेले वर्षभर ती आणि तिचे वडील वामन हे सारंगसोबत सावली सारखे उभे राहीले होते.

(कालच्या दिवशी.)

श्रद्धाचा पी एच डीचा संशोधनाचा प्रबंध युनिवर्सिटीमध्ये दाखल झाल्यानंतर तो प्रबंध वाचून तिच्या मार्गदर्शकांनी तिचं चांगलाच कौतुक केल होत. गावाकडची मानसिकता, शेती, राहणीमान आणि सुधारणा यावरचा तो प्रबंध होता. या प्रबंधाने शेतकरी वर्गात नक्की काय सुधारणा करता येतील याची मार्गदर्शक तत्वे श्रद्धाने मांडण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर सारंगची पेपरात आणि न्यूजला आलेली बातमी बघून त्याच्या दुसऱ्याच दिवशी श्रद्धाने सारंगच घर गाठलं. येताना सोबत खूप सारी मिठाई आणि गोडाधोडाचे पदार्थ घेऊन आली. आता ती आल्याच समजताच वैष्णवी देखील सारंगच्या घरी जाऊन पोहोचली. तिथे जाऊन पाहिलं तर तो आणि श्रद्धा एकाच ताटात जेवत असेलेले तिला दिसले. तस तिच्या चेहऱ्यावर लगेच आठ्या पडल्या. ती रागातच श्रद्धाकडे बघू लागली. श्रद्धाने ते पाहिलं आणि तिला अजूनच खट्याळपणा सुचला. तिने तिच्या हाताने सारंगला एक घास खाऊ घातला. मग काय? वैष्णवी काली मातेच रूप धारण करण्याच्या तयारीत असतानाच शारदा तिच्याजवळ गेल्या.

“तुला काय झाल? एवढ रागात यायला?” शारदा

“तिला सांगून ठेव त्याच्या एवढ्या जवळ जाऊ नको म्हणून.” वैष्णवी तिच्या रागावर कसातरी संयम ठेवत बोलली. “नाहीतर तिचं डोकच फोडेल मी.”

“आता?” शारदा काहीच न समजल्यासारख बोलल्या. “का बर? छान दिसते की जोडी दोघांची.”

“आत्याऽऽऽऽऽऽ” वैष्णवीच्या सहनशक्तीचा अंत झाला. “तुझा लेकासोबत मला लग्न करायचं आहे. मी त्याला भांडली म्हणून तो तिला सारखा चीपकत आहे. अजून जर चीपाकालाना तर त्यालाही नाही सोडणार मी.”

तिला अस मोठ्याने बोलताना बघून सारंग, श्रद्धा आणि शारदा तिघेही हसायला लागले. तर त्यांना हसताना बघून वैष्णवी गोंधळून गेली. ते बघून श्रद्धा तिच्याजवळ आली.

“सारंग मातीत सोन पिकवणारा सोनार आहे.” श्रद्धाने तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवला. “आणि सोनाराच्या आयुष्यात लक्ष्मीच शोभून दिसते.”

तेव्हा कुठे वैष्णवीच्या डोक्यात जरा प्रकाश पडला. तिने लागलीच सारंगची माफी मागीतली. मग लगेच दोघांच्या आई वडिलांनी बोलण करून घेत त्याचं लग्न ठरवून टाकल. आधी मनात राग असूनही तिला कोणालाच भांडता येत नव्हत. आता तर ती त्या घराची सून झाली होती. म्हणून ती आता बिनधास्त त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली.

(आजच्या दिवशी.)

“कसला हिस्सा मागत आहात?” वैष्णवी “वाटे तर आधीच पडले होते ना. त्यात हा वाडा तुम्हाला नको होता. म्हणून तर गावातल्या माणसांच्या नादी लागून वाडाच्या ऐवजी जास्तीची शेतजमीन मागितली. आता ती विकून पैसेही संपले, म्हणून हा दुरुस्त केलेला वाडा दिसला ना?” वैष्णवी कडक आवाजात विचारू लागली.

“तुझा काय संबंध?” मोठे काकांचा मुलगा “ते आम्ही आणि सारंग काय ते बघून घेऊ?”

“काय संबंध म्हणजे?” वैष्णवी “मी ह्या घराची सून आहे. जसे तुम्ही तुमच्या बायकोच्या पुढे काहीच बोलत नाहीत ना. तसे हे पण माझ्या पुढे काहीच बोलणार नाहीत.”

तिचं ते सडेतोड बोलण ऐकून मग ते सगळेच शांत बसले. यानंतर वैष्णवीने तिचा मोर्चा बाकी गावाल्यांकडे वळवला.

“आणि तुम्ही,” वैष्णवी हाताची घडी घालून बोलू लागली. “जेव्हा ह्यांनी चार चांगल्या गोष्टी सांगून पहिल्या तेव्हा त्यांना वेड्यात तुम्हीच काढलं होत ना? तुम्ही त्याचं ऐकल असत तर तुमचाही सदामामांसारखा फायदा झाला असता. पण नाही, एवढे कष्ट कोण घेणार नाही का? तुम्हाला लाईट आणून दिली, पाण्याची सोय केली. त्याच काहीच नाही. पण त्यांच्या शेतमालाची विक्री थांबवण्याच काम बरोबर केलत. माणसाने एवढ पण निष्ठुर नसाव.”

“वामन्या.” एक गावकरी जरा रागात बोलला. “तुझ्या लेकीला सांभाळ. हेच शिकवलस का?”

“खबरदार बाबांना काही बोललात तर.” वैष्णवी खवळून बोलली. “स्वतःच्या बापाला घराबाहेर काढल होतास तेव्हा कुठे गेली होती तुझी शिकवण?”

वैष्णवीचा तो अवतार बघून बाकी गावकरी तर गारच झाले. एकाच गावातले तर ते होते. ती रागात आली की समोरच्याचं काहीच झाकून ठेऊ देत नाही. हे त्यांना चांगलच माहिती होत. त्यापेक्षा त्यांनी गप्प राहणे पसंत केल.

“हे बघा.” सारंग आताशी बोलला. “वाद घालण्यात मलाही काही इंटरेस्ट नाहीये. प्रेमाने राहिलात तर आपल्या, तुमच्या मुलांना सुट्टीमध्ये गावी यायला हे त्यांच्या काकाचं घर असेल.” नंतर तो गावाल्यांकडे वळला. “मी आताही तुमची मदत करायला तयार आहे. अट तिचं, सर्वांनी एकत्र राहून काम आणि मेहनत करूयात.” आणि सारंगने त्यांच्यासमोर हात जोडले.

काही गावकऱ्यांनी होकारार्थी मान हलवली, तर काही नुसतेच मान डोलवत राहिले. तर काही काहीच न बोलता तिथून निघून गेले.

सारंगच्या काकांच्या मुलांनी मात्र प्रेमाने सारंगला जवळ घेतले. बऱ्याच वर्षांनी त्यांची ती मिठी घट्ट झाली होती. शारदा आणि हरीलाही समाधान वाटले. हरीची बंधुमंडळीही आता त्या वाड्यात येऊन पोहोचली होती. आपल्या सर्व मुलांना एकत्र मिठी मारलेल बघून त्यांनीही वर देवाकडे बघत हात जोडले.

“भारी आहे हो तुमची कडक लक्ष्मी.” श्रद्धा वैष्णवीजवळ जात बोलली.

“अजून तर तू तिला नीट पाहिलं नाहीयेस.” सारंगचा मधल्या काकांचा मुलगा चिडवण्याच्या सुरात बोलला. “बरेच किस्से आहेत तिचे. तू आहेस ना चार पाच दिवस. आपण आरामात बसून ऐक.”

तसे वैष्णवीचे डोळे विस्फारले गेले आणि ती तशीच लाजून तिच्या घराकडे पळून गेली.

एवढे वर्ष अवकळा आलेला तो वाडा आता त्याच्या त्या कुटुंबाला एकत्र पाहून पुन्हा ताजा तवाना दिसायला लागला. आता तर अजून एका सुनेच्या स्वागताच्या तयारीला लागला.

समाप्त.