शीर्षक - मातृ रुपेन संस्थिता भाग २
रत्नांनी सहजच विचारलं,” काय ग लक्ष्मी मी अन्न देऊन आले तेव्हा काय आरडाओरडा चालू होता खाली?”
“ त्याचं काय झालं ? “लक्ष्मी निवांत खाली बसलीच आणि म्हणाली ,”तुमच्यापासून काय लपवणार मॅडम .माझा भाऊ आला होता भेटायला. उद्या दसरा म्हणून त्यांनी साडी साठी पैसे दिले तर अजून तो गेटच्या बाहेरपण गेला नाही तर माझ्या नवऱ्याने पैसे मागितले.
मी देत नाही म्हणाले ,तर माझा हात पिरगळला , मी जोरात ओरडले. तो आवाज गेट बाहेर भावाने ऐकला आणि परत येऊन माझ्या नवऱ्याच्या कानशिलात लगावली . त्यावेळी दोघांची झटपट झाली आणि -”

“आणि? काय ग ?”
रत्नाने काळजीने विचारलं.
रत्नाने काळजीने विचारलं.
भावाने त्याला गावाकडे घालवला.
स्पृहा म्हणाली ,”त्याला म्हणजे, तुझ्या नवऱ्याला?”
“ हो ताई मी तरी काय म्हणणार ?”
“अग पण सणावाराचं असं का ?” रत्ना.
“आपला माणूस धड नसल्यावर तो कसला सणवार आणि काय? त्याला काही फरक पडत नाही. असा नवरा असल्यावर , कसले सणवार ?”
“असं म्हणू नये , तो गावाकडे नाही गेला तर ?” रत्ना समजावत होती.
“न जाऊन काय करतो ? इथे आयते खायला मिळते ना , ते गिळाव की. . संध्याकाळ झाली की पाय त्या गुत्त्याकडे वळतात. काही बघत नाही मग! घरात काय हवं काय नको ?काहीच पाहत नाही. मी दिवस रात्र राबते आणि तो संध्याकाळी पैसे घेऊन जातो. सांगा बरं, कसा भरोसा ठेवायचा या माणसावर?”
आता रत्ना एकदमच भावनिक झाली.
“ विषय नको काढू , बस बर तू जेवण केलंस का?”
“ हे काय ,उशिरा केलं, तुम्ही दिलेले अन्न होतं ना. आता नको ताई !”
“एक सांग लक्ष्मी, अग पण तू कमावत नाही म्हणून नवऱ्याला काढून दिला , जर त्याने मनाला लावून घेतलं तर ?” स्पृहा हळूच चिंतेच्या सुरात म्हणाली .
“तो आणि मनाला लावून घेईल ? काय मॅडम तुम्हाला माहित नाही का? हे ऐत खाऊ नवरे कसे असतात ते आमच्या लोकात बघायचे, असेच असतात .बायको राबते तर यांचा जीव तुटत नाही अशी माणसं मनाला काय लावून घेणार? आणि हो लेकरात जीव आहे कुठे जात नाही तो!” ती बिनधास्त होवून म्हणाली.
“ तेच म्हणते लक्ष्मी ,पुरुष माणसं मनातलं बोलून दाखवत नाहीत, पण लेकरात जीव असतो त्यांचां. कुटुंबाशिवाय राहू शकत नाहीत .”
स्पृहा उगीच हळवी होत होती.
स्पृहा उगीच हळवी होत होती.
आता मात्र लक्षमी हसली.
“काय मॅडम, तुमच्या श्रीमंत लोकांचे हे चोचले. तो गावाकडे जाईल तर त्याला तिकडे काम केल्याशिवाय कोणी भाकरीचा तुकडा देणार नाही. तो काय राबतो तिकडे ? जोड्याने हाणतील लोक. फार लाज वाटली तर जीव देईल.”
“ अगं काय ते अभद्र बोलणे?” रत्नाने थांबवलं.
“ ताई तुम्हाला माहीतच आहे ना, असला नवरा असल्या पेक्षा नसलेला बरा ! मॅडम, मी माझ्या कामांमध्ये भरोसा ठेवते ,त्या माणसावर नाही .नवऱ्याने सोडलेली किंवा नवरा नसलेली बाई राहते म्हणल्यावर लोक सहानुभूतीने माझ्या पोरी बाळींना मदत तरी करतील. मला जास्तीचं काम देतील पण याला सोबत ठेवून ही काय फायदा? “
आताच स्पृहा गप्पच बसली . स्पृहाचे मन पुन्हा पुन्हा स्वतःची तुलना नकळत तिच्याशी करत होती.
अशाच परिस्थितीत मी पण असते तर? मी शिकलेले आहे म्हणून, जरा जास्त चांगले गुण आहेत, चांगले संस्कार आहेत त्यामुळे कदाचित कितीही राग आला तरी नवऱ्याबद्दल असं बोलू शकणार नाही.
मनात वाटलं ती नवऱ्याला सोडायला तयार आहे ,नवरा गेला तरीही काही मनावर घ्यायला तयार नाही, म्हणजे प्रेम उरलच नाही, फक्त व्यवहार उरलाय .
ती प्रॅक्टिकल रहाते आहे. ऍक्च्युली बरोबर आहे.

लक्ष्मी रत्नाला सांगतच होती .
“पोटी तीन पोरी आहेत , त्याची तरी काळजी आहे का त्या माणसाला ? दुसऱ्या मुलीच्या वेळी डॉक्टर मॅडम मी सांगितलं होतं फॅमिली प्लॅनिंग करा आणि त्याने ऐकलं नाही. तिसऱ्या बाळंतपणाच्या वेळी मात्र मी मरता मरता वाचले. मला सांगा माझ्या जीवाचं काय झालं असतं तर माझ्या तीन लेकी उघड्यावर पडला असत्या. . .या माणसाने त्यांना पोसलं असतं का? मीच हाता पाया पडून खर्चाची व्यवस्था केली आणि मग डॉक्टरने त्याला रागवून सही करायला लावली आणि तेव्हा माझं कुटुंब नियोजनाचा ऑपरेशन झालं. ताई, तेव्हा दोन महिने बोलला नाही हा माणूस ! काय तर त्याला शेतातल्या दोन एकर जमिनी साठी वारसदार पाहिजे होता मुलगा!
आणि मी लगेच दीड महिन्यात कामावर लागले ,म्हणून आमचा पोट भरते आहे.”

दोघी ही तिच्या व्यथा ऐकत सहानुभूती दाखवत होत्या.
पण त्या वेळी दोघींच्याही मनात वेगळेच विचार चालू होते.

समाप्त.
©®स्वाती बालुरकर ,सखी.
दिनांक २०.०१.२५

अष्टपैलू कौटुंबिक जलद फेरी
(कथेचे सर्वाधिकार लेखिकेच्या अधीन आहेत या साहित्याचे कॉपी करणे किंवा परवानगीशिवाय वापर करणे हा दंडनीय अपराध आहे.)
कथे संबंधी आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्या