मातृत्व

Depression

मातृत्व


"नेहा कोणाच्याही बाळाला कशी हात लावतेस ग"?

"अगं, बाळ किती गोड आणि निरागस असतात मग ते कोणाचंही असो,माणसाचं किंवा प्राण्याचं, सगळी गोडच"..नेहाच्या ठरलेलं वाक्य.


नेहा एक छान गुणी मुलगी, कॉलेज संपलं की आई बाबा नि लग्नाची तयारी सुरू केली. वधु वर केंद्रात नाव नोंदणी केली. नातेवाईकात सांगून ठेवलं. नेहाला स्थळ सांगून येऊ लागली. 
श्रेयस च स्थळ आलं. घरच छान ...सगळ्यांनाच आवडलं आणि नेहालाही. 

 आई बाबा आपल्यासाठी जे करतील ते योग्यच असेल हे तीच ठाम मत. श्रेयस शी लग्न झालं. संसारात रमली पटकन. सगळ्यांशी छान जमलं. सासू शी तर मैत्रीचं झाली.

   बघता बघता वर्ष कस गेलं कळलच नाही. वर्षातले सण वार येण जाणं सगळ्यात हरखून गेली. आता सगळे नातेवाईक विचारू लागले गुड न्युज कधी देणार. श्रेयस आणि नेहाला ही बाळ हवं होत. पण तिला दिवस राहत नव्हते. थोडी घाबरली. मग सासू बाईंबरोबर डॉक्टर कडे गेली.दोघांच्याही सगळ्या तपासण्या केल्या. सोनोग्राफी केली. तर एक ट्यूब ब्लॉक आहे म्हणाले. एकदा अजून एखाद्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणाले.


   मग नेहाच्या मागे डॉक्टर आणि दवाखान्याचे चक्र सुरू झाले. पण नीट काही सांगेन . नैसर्गिक दिवस राहतील असच म्हणत...आणि नेहा आणि घरातले आतुरतेने वाट पाहत होते.

मग आजूबाजूचे लोक, सल्ला द्यायचे. तू ना या डॉक्टरना भेट.. लगेच गुण येईल, तू ना पंचकर्म कर, तू होमिओपॅथी घे...एक ना अनेक.तीही कोणी सांगितलं की लगेच करत होती. 

प्रत्येक वेळेस घरातले, तिच्या मागे ठाम राहिले.4-5 वर्ष झाली. नेहाआणि श्रेयस आईबाबा होण्यासाठी आस लावून होते. एक मेकांना सांभाळत, होईल सगळं नीट या आशेवर. 


   "श्रेयस , आपण दत्तक घेउ या का रे बाळ?"नेहा

नेहा , " रागाऊ नकोस पण दत्तक घ्यायची थोडी भीती वाटते मला.. आणि हा शेवटचा पर्याय आहे ना ग. डॉक्टर म्हणालेत ना होईल. मग तू का विचार करतेस इतका. "

  " रुपाली,  अगं कालच कळलं मला तुला बाळ झालं,"नेहानी मैत्रीणीला फोन केला.अगं, मी रुपालीची काकु बोलतीये...तुला बोलवायचं होत ग , बारशाला , पण लेकुरवाळी बोलवतात म्हणून तुला नाही सांगितलं, रागावू नकोस हा.


नेहा ला खूप वाईट वाटलं...आणि नैराश्याच्या दिशेने तिची वाटचाल सुरू झाली. आपण आई होऊ शकत नाही यांच्यात तिला कमीपणा वाटू लागला आणि ती स्वतःला दोष देऊ लागली.आता डॉक्टर काहीही सांगू देत मी ते सगळं करणार. 

नेहाच्या लग्नाला 8 वर्ष झाली. वारंवार तपासण्या, निरनिराळी औषध injection घेत होती. शरीरावर आणि मनावर परिणाम तर होत होता फक्त वर वर दिसत नव्हता इतकंच.


एकदा नेहाची पाळी पुढे गेली, घरी टेस्ट केली तर positive . सगळे आनंदात , लगेच डॉक्टरांकडे गेले. ब्लड टेस्ट गेली तर ती निगेटिव्ह आली. याला false pregnancy म्हणतात. होत अस कधी कधी.परत नेहा हिरमुसली आणि नैराश्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे गेली. रात्र रात्र तिला झोप येत नव्हती. धायमोकलून राडावस वाटे. पण आपल्या मुळे कोणाला त्रास होऊ नये म्हणून आतल्या आत कुढत होती.

   एक दिवस सगळे घरातले बसले होते....सासूबाईंनी ठाम पणे सांगितलं...बास झालं...नेहा किती हाल करणारेस स्वतःचे..बाळ नाही झालं तर नाही झालं बाळा, तूला या सगळ्याचा त्रास पुढे जाणवेल. शरीरावर याचे दुष्परिणाम जाणवतील . खूप सहन केलयस तू. पण बास आता.

  आई आता डॉक्टर टेस्ट ट्यूब बेबी म्हणताय , लास्ट ऑपशन आता नाही राहील तर मग आपण दत्तक घेऊया.नेहा आई ना सांगते. शहरातल्या नामांकित डॉक्टर ना भेटतात. Assistant डॉक्टर सगळी नेहा आणि श्रेयस ची माहिती आणि आधीचे रिपोर्ट्स बघतात डिटेल त्यांच्या फाईल मध्ये लिहितात आणि मोठ्या डॉक्टर कडे त्या दोघांना भेटतात. 

   डॉक्टर बघतात फाईल...एक कागद समोर देतात...पुढची भेटायची तारीख बाहेरून घ्या ....इतकंच संभाषण....खरतर हे त्यांना पटलेलंच नसत, पण डॉक्टर जर सगळ्या पेशंटशी बोलत राहिले तर त्यांना वेळ कसा पुरेल असा विचार करून आणि स्वतःलाच समजावून निघतात... डॉक्टर जे सांगतील ते ते करतात....खूप पैसे ही खर्च होतात...पण निराशाच पदरी पडते...नेहा धाडस करून एकदा डॉक्टर ना विचारते. " डॉक्टर ,इतके दिवस treatment घेऊन पण succesfull का नाही होत....डॉक्टर नेहाला म्हणतात, " हीच ट्रीटमेंट आम्ही continue करणार आहे, तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही दुसरीकडे जा." नेहाला खूप वाईट वाटतं, आणि नेहाच निराशेच्या दिशेने अजून एक पाउल पडत.
   नेहा एकटी रहायला लागली, अबोल होत गेली....स्वतःला दोष देऊ लागली सतत, घरातल्यांना हे जाणवत होत...मार्ग तर काढायलाच हवा होता. नेहाला परत आपल्यात आणायचं होत


   नेहाची आत्या एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडे घेऊन जाते. त्या मात्र नेहाला खूप समजावतात. नेहा आपलं शरीर म्हणजे मशीन नाहीये ग...तू मनानी खंबीर रहा. आशा परिस्थितीत स्त्री कायम स्वतःला दोष देत राहते. ट्रीटमेंट घेणं हे जरी आपल्या हातात असल तरी निसर्ग ही खूप मोठी गोष्ट आहे...देवा पुढे आपलं काही चालत नाही. नेहा ला खूप धीर येतो. ती मानाने खंबीर होत जाते. हळूहळू सकारत्मक दिशेने तीच पाऊल पडू लागत. वेळीच घरचे तिला साथ देतात आणि नैराश्याच्या छायेतून तिला बाहेर पडायला मदत करतात. 

    नेहा विचार करते, हॉस्पिटल मध्ये आशा किती स्त्रिया तिने बघितल्या होत्या ,ज्यांना सासरकडून समाजाकडून किती मानसिक त्रास होता. त्यांना बाळ होत नाही म्हणून कायम त्या स्त्री ला दोषी धरलं जात होत. पण नेहा च्या बाबतीत अस नव्हतं घरातले सगळे तिच्या मताचा आदर करणारे आणि त्याचबरोबर तिला समजून घेणारे होते. या गोष्टीचा तिच्यावर सकारात्मक प्रभाव पडतो....डॉक्टर ही तिला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करतात...


   आणि एक दिवस तिच्या कडे बाळाच्या आगमनाची चाहूल लागते. सगळे सुखावतात. एक गोड परीचा जन्म होतो तिला हातात घेताच क्षणी नेहा सगळं विसरते आणि मातृत्वाच्या आनंदात नाहून निघते.


    ©️®️सौ गौरी जोशी