मातृत्व. भाग - १
सदाशिवराव खुर्चीवर बसून खिडकीतून बाहेर पाहत होते. हातातला चहाचा कप अजूनही ओठांना लावला नव्हता. डोक्यात फक्त एकच विचार चालू होता, तो म्हणजे आपल्या मुलीचं आता कसं होईल! ते विचारात असताना त्यांची पत्नी मालती तिथे आली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, तसं ते विचारातून बाहेर आले.
"काय हो... तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, नका एवढा विचार करू... त्याने तुमच्या तब्येतीवर परीणाम होईल." मालती.
"विचार करू नको तर काय करू मालती! आपल्या मुलीला किती स्थळं आली पण त्या सगळ्यांनी तिला नकार दिला. तिच्या भविष्याची काळजी वाटतेय गं मला!" सदाशिवराव म्हणाले.
सदाशिवराव आणि मालती यांना दिक्षा एकुलती एक मुलगी होती, तिचं बारावी पर्यंतच शिक्षण झालं होतं. ती खुप हुशार होती पण बारावीची परीक्षा झाल्यावर ती मैत्रीणींसोबत फिरायला गेली होती तेव्हा तिचा खुप मोठा अपघात झाला होता आणि त्यातच तिची गर्भ पिशवी निकामी झाली होती आणि ती कायमचं तिचं मातृत्व गमावून बसली होती. त्या एका घटनेने तिला पुढे शिकायची इच्छाच राहिली नाही, घरात बसून टेलरींगचं काम तेवढं ती करत होती. तिच्यातले मातृत्व गमावल्यामुळे तिच्याशी लग्न करायला कोणीच तयार होत नव्हते. त्यामुळे सदाशिवराव आणि मालती यांना दिक्षाची काळजी वाटायची.
"अहो... मी काय म्हणतेय, वृषभला तुम्ही एवढं सांभाळलं आहे, त्याचे बाबा गेल्यानंतर आपणच त्याला आणि ताईंना आधार दिला आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च देखील केला आहे, आता तो अमेरिकेला नोकरी करतोय तर तुमची बहिण सुद्धा आपल्याकडेच राहतेय, बाहेर मुलगा बघण्यापेक्षा आपल्या घरातच मुलगा आहे. तुम्ही एकदा ताईंना विचारून तरी बघा!" मालती.
"अगं पण तिला विचारून आपण तिला धर्म संकटात कसं टाकायचं?" सदाशिवराव.
"तुम्ही एकदा विचारून तरी बघा, त्या नाही म्हटल्या तर आपण विषय सोडून देऊ आणि मनात राग पण नाही धरायचा!" मालती एकदम समजूतीने बोलली.
"सदाशिव, मालती.... मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे!" पाठीमागून सदाशिवरावांची मोठी बहिण सुमन आली आणि त्यांचं बोलणं ऐकून म्हणाली. तिच्या आवाजाने हे दोघेही तिच्याकडे बघू लागले.
माफ करा ताई, पण मी दिक्षाच्या काळजीने तसं बोलत होती. तुम्ही प्लीज राग नका मानू!" मालती खाली मान घालून बोलली.
"अगं त्यात राग येण्यासारखं काय आहे, एक आई म्हणून तुझी काळजी बरोबरच आहे. दिक्षा माझी सून झाली तर मला आनंदच होईल आणि मुलांचं काय घेऊन बसली, आपण अनाथाश्रमातून एखादं मुल दत्तक घेऊ. मालती, फक्त मुल जन्माला घालणं म्हणजेच मातृत्व नसतं, उलटं दुसऱ्याचं मुल आपलं म्हणून सांभाळणं यात खरं मातृत्व असतं. आणि आपली दिक्षा खुप प्रेमळ आहे ती तिची प्रत्येक जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडेल याची मला खात्री आहे." सुमनचं बोलणं ऐकून त्या दोघांनाही आनंद झाला.
"ताई, पण वृषभ तयार होईल का लग्नाला?" सदाशिवरावांनी विचारलं तसं मालती पण सुमनकडे बघू लागली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा