“सूनबाई, देवाने तुला एवढं सगळं दिलंय ते मिरवण्यासाठी नाही दिलं. किमान आपल्या नणंदेसमोर तरी उगाच दिखावा करू नकोस. माझ्या लेकीचं मन तरी दुखणार नाही,"
सुधाताई रागाने काव्याला म्हणाल्या.
सुधाताई रागाने काव्याला म्हणाल्या.
“सासूबाई, मी कुठे दिखावा करतेय? घरात कार्यक्रम आहे म्हणून नीट आवरायला नको का? नाहीतर नंतर तुम्हीच म्हणता की आमच्या घराची इज्जत मातीमोल केली,”
काव्याने उत्तर दिलं.
“घालायचं असेल तर आवडीने घाल. पण नणंदेला हे सांगायची काय गरज आहे की हा सोन्याचा हार आहे की नकली, त्याची किंमत किती आहे,”
सुधाताई चिडून म्हणाल्या.
“सासूबाई, मी स्वतःहून कधीच ताईंकडे जाऊन सांगत नाही की मी काय घातलंय, किती किमतीचं आहे. त्या स्वतः येऊन विचारतात आणि मग तुमच्याकडे येऊन काय-काय सांगतात. शेवटी मी किती सहन करू? प्रत्येक कार्यक्रमाला हेच चालू असतं,”
काव्याही बोलून गेली.
“जर प्रत्येक कार्यक्रमाला हेच होत असेल तर तिने विचारलं तरी उत्तर देऊ नकोस. स्वतःचाही मूड खराब करतेस आणि माझाही,”
सुधाताईंनी सुनावलं.
सुधाताईंनी सुनावलं.
दोघींचाही मूड खराब झाला. काव्या शांतपणे आपापल्या कामात गुंतली, तर सुधाताई नातेवाइकांमध्ये जाऊन बसल्या. पण मनातील कटुता दोघींच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. कारण हे सगळं नेहमीचंच होतं.
सुधाताईंना तीन मुलं होती—दोन मुलगे आणि एक मुलगी. मोठ्या मुलगा मनीषचं लग्न काव्याशी झालं होतं. मुलगी मानसीचं लग्न राजेशशी झालेलं होतं. धाकटा मुलगा समीर अजून अविवाहित होता.
राजेशचं उत्पन्न ठीकठाक होतं,आणि मानसीपण नोकरीं करत होती.पण बचतीच्या नावाखाली काहीच नसायचं.
दोघं नवरा-बायको एकसारखेच—फिरणं, ब्रँडेड कपडे, उगाचच खर्च करणं यांची सवय. त्यामुळे गुंतवणूक तर दूरच. घरखर्चाचाही बराच भार सासऱ्यांवरच होता. त्यामुळे ते दोघे बिनधास्त होते.
सासू-सासरे त्यांच्या सवयींनी हैराण झाले होते. वारंवार समजावूनही काही उपयोग झाला नाही, म्हणून त्यांनी गप्प राहणंच पसंत केलं. एकुलती एक सून असल्यामुळे तिला वेगळंही करत नव्हते.
मात्र मानसीची सवय पाहून सुधाताईंनी आपले दागिने स्वतःकडेच ठेवले होते. मानसीच्या माहेरकडून जे दागिने चढवले होते, तेवढेच तिच्याकडे होते.
दुसरीकडे मनीष आणि काव्या दोघंही नोकरी करत होते. काव्या लहान मुलगा असल्यामुळे एका शाळेत अर्धवेळ शिक्षिका होती. महिन्याला सुमारे पंधरा हजार रुपये कमवत होती. दोघंही सुरुवातीपासून विचारपूर्वक खर्च करत होते.
काही महिन्यांपूर्वी समीर कमवू लागला, तेव्हा त्याने स्वतःच सांगितलं—
“वहिनीची कमाई घरखर्चात वापरू नका. आम्ही दोघं भाऊ मिळून खर्च पाहू.”
मानसीला नेहमी तक्रार करायची सवय होती. सासरच्यांनी दागिने दिले नाहीत, उलट चढवलेलेही स्वतःकडेच ठेवले, असं ती सतत म्हणायची.पण तसं काही नव्हतं.
जेव्हा काव्या कुठल्याही कार्यक्रमात दागिने घालायची, तेव्हा मानसी चिडायची.
“वहिनी,हे सासरचेच दागिने ना? तुमचं नशीब किती चांगलं! सगळे दागिने तुमच्याकडेच आहेत. माझं असं नशीब कुठे?”
असं म्हणत ती टोमणे मारायची.
आणि मग सुधाताईंकडे जाऊन रडारड करायची,
“आई, वहिनी मुद्दाम नवीन दागिने घालून मला चिडवतात.”
हे ऐकून सुधाताईंनाही राग यायचा आणि त्या काव्याला सुनावायच्या,
“तुला माहिती असताना तिच्यासमोर दागिने का घालतेस?”
आजही तसंच झालं. समीरच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. काव्याने आपल्या बचतीतून सोन्याच्या नेकलेस घेतलं होतं आणि तोच आज घातला होता. मानसीची नजर हारावर पडताच तिने विचारलं—
“वहिनी , नवा हार आहे वाटतं. सोन्याचा आहे का?”
काव्याला उत्तर द्यायचं नव्हतं, पण पुन्हा विचारल्यावर ती म्हणाली—
“हो ताई , नवीन घेतलाय.”
“कितीला घेतला?”
मनातल्या मनात जळत मानसीने विचारलं.
“फार महाग नाही. फक्त पेंडंट सोन्याचं आहे, बाकी मोती आहेत. पेंडंटही पातळच आहे. साधारण पन्नास हजारांचा पडलाय,”
काव्या सहज म्हणाली.
हे ऐकताच मानसीचं काळीज ठस्स झालं. ती थेट सुधाताईंकडे गेली आणि त्यांना खोलीत बोलावून घेतलं.
“आई, हे काय योग्य आहे का? वहिनीकडे सगळे दागिने आहेत, तरीही त्यांच्यासाठी नवा हार आणलात. माझ्याकडे तर फक्त लग्नातले दागिने आहेत. मला द्यायचं म्हटलं की तुला अडचण होते. मुलगी लग्नानंतर परकी होते ना!”
सुधाताई शांतपणे म्हणाल्या—
“तो हार आम्ही घेतलेला नाही. काव्याने स्वतःच्या कमाईतून घेतलाय.”
“तुला कसं माहीत? दादानेच घेतला असेल. मला टाळण्यासाठी सगळं. आता वहिनीची कमाईचं कारण काढाल.”
असं म्हणत मानसी डोळ्यात पाणी आणून निघून गेली.
पुढे सगळे एकत्र बसल्यावर मनीष म्हणाला—
“मानसी, प्रत्येक वेळी हे नाटक कशासाठी? तुझ्या सासरी काही कमी आहे का?”
“माझ्यासाठी काहीच नाही, पण वहिनीसाठी हार आहेत,”
मानसी चिडून म्हणाली.
“मानसी, प्रत्येक वेळी हे नाटक कशासाठी? तुझ्या सासरी काही कमी आहे का?”
“माझ्यासाठी काहीच नाही, पण वहिनीसाठी हार आहेत,”
मानसी चिडून म्हणाली.
“तो हार काव्याने स्वतः घेतलाय. मग हा तमाशा कशासाठी?”
मनीष समजावून सांगत होता.
तेवढ्यात समीर म्हणाला—
“तुला हार हवा असेल तर नवऱ्याकडून माग.तू स्वता कमावते.
आमच्याकडून काय अपेक्षा ठेवतेस? लग्नात आम्ही कर्ज काढून सगळं केलं. आता आयुष्यभर आम्हीच खर्च करायचा का?आणि आम्ही करू पण.
पण हे असं वागणं किती वेळा समजून घ्यायचं.”
हे ऐकून मानसी आणखी चिडली. रागातच सासरी निघून गेली. यावेळी तिला थांबवायला कोणीही पुढे आलं नाही.
समीरच्या लग्नालाही ती तशीच रुसलेली आली. पण तिच्या रुसव्याने काहीही बदल झाला नाही.
कारण धाकटा भाऊही तितकाच स्पष्टवक्ताच होता—खरं सांगणारा, कोणालाही न घाबरणारा.
समाप्त.
