Login

मौल्यवान मार्गदर्शक५०विचारांची 'सुविचार, Quotes' सरिता!

motivetional suvichar and quotes

सदर लेखामध्ये तुम्ही वाचू शकता,
suvichar marathi
marathi suvichar
success marathi suvichar
suvichar in marathi
inspirational marathi suvichar
good morning marathi suvichar
marathi suvichar good morning
marathi suvichar on life
50 suvichar in marathi
shubh sakal suvichar marathi

प्रस्तावना:- जीवनात आनंदच असेल तर मनुष्याला तिर्‍हाईताची गरज भासत नाही. पण खुप लोकांच्या नशीबी असे क्षण नसतात. तसेच आनंद आणि दुःख, निराशा जीवनात कधी नां कधी वाट्याला येतेच. असे प्रसंग कधी कधी आपण इतरांजवळ बोलू शकत नाही...अश्या वेळेस असे 'सुविचार, Quotes' आपले मार्गदर्शक बनतात...!

सुविचार Quotes !

१) प्रत्येक शब्द जपून वापरावा, बोलून विचारात पडण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करावा.

२) खोटे बोलून दिशाभूल करण्यापेक्षा वेळीच सत्य परिस्थितीची जाणीव करून दयावी.

३)आलेलं अपयश न डगमगता खिलाडू वृत्तीने स्वीकारल्यास यशाचा मार्ग सुकर होतो.

४) लहानसहान गोष्टीत खूप मोठा आनंद दडलेला असतो फक्त तो शोधण्याची दृष्टी आपल्याजवळ हवी.

५)भावनेचे बळ नियंत्रित ठेवले पाहिजे कारण ते शारीरिक बळापेक्षा खूप मोठे असते.

६)माझा माझ्या स्वतःवर विश्वास आहे...जोपर्यंत हा विश्वास ढळत नाही, तोपर्यंत कोणतेच संकट मला हरवू शकणार नाही...!

७)ज्या समाजात स्त्रीला फक्त, 'चुल आणि मूल' हेच समीकरण शिकवले जाते...तो समाज कधीच प्रगती करू शकणार नाही...!

८)आपला अपमान झाला तरीही शांत रहा...रागावर नियंत्रण ठेवा... कारण अपमानाचा बदला समोरच्या सारखे वागून नाही तर त्याच्या पेक्षा मोठ होऊन घेतला जातो...!

९)एखाद्या गोष्टीवर लगेच हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नका... कर्तव्य करत रहा...हक्क आपोआपच मिळतील...!

१०)तब्येतीच्या छोट्या छोट्या तक्रारी मोठ्या आजाराची चाहूल असतात त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका!

११)रडत बसण्यापेक्षा उत्तुंग यश मिळवून दाखवणे हीच निंदकांसाठी चपराक असते!

१२)तीच स्वप्नं खरी होतात जी तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघता आणि पूर्ण करण्यासाठी स्वतःला वाहून घेता!

१३)आपलं अस्तित्व रांगोळीच्या कणा सारखे असावं, कोणी विस्कटलं तरी आपले रंग तेथेच सोडून जावं !

१४)आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली. स्वतः मध्येच खुश रहा आणि कोणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका! 

१५)फांदी तुटण्याची भीती पाखरांच्या मनात नसते. कारण, त्यांचा पंखावर जास्त विश्वास असतो!

१६)एखाद्याला आपल्या व्यंगात्मक बोलण्याने एवढे छळू नका...की ती व्यक्ती, आत्मविश्वास गमावून बसेल...!

१७)एखादी नेहमी भेटणारी व्यक्ती. तुम्हाला भेटायला टाळत असेल. फोनवर बोलताना नेहमी सारखे बोलत नसेल. फोन घेत नसेल. बोलताना व्यस्त आहे भासवत असेल....तर समजून जा, ती व्यक्ती अडचणीत आहे...!

१८)आयुष्यात आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे खरे तर आभार व्यक्त केले पाहिजेत. कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे आपल्याला अचूकपणे शिकायला मिळतं!

१९)एखाद्याने सल्ला विचारल्यास. अगदी 'परफेक्ट सल्लागार' असल्या सारखे बोलू नका. कारण, चतूर व्यक्तीच दहाजणांचे सल्ले घेतो. आणि मग त्यातून त्याला सोयीस्कर होईल असा पर्याय शोधत असतो...!

२०)कितीही व्यस्त असलात तरी सुद्धा...जर तुमचे आईवडील तुम्हाला फोन करत असतील तर, बोलायचे टाळू नका. कारण त्यांच्या व्यतिरिक्त कुणाजवळच तुमची विचारपूस करण्या साठी वेळ नसतो...!

२१)शिक्षणाचे बळ, सगळ्या संकटांना म्हणते पळ!

२२)आपण आपली स्वतःची किंमत ठेवली तरच इतरही ठेवतील..!

२३)बीज असो वा नाते, विश्वासाचा ओलावा मिळाल्या शिवाय अंकुरत नाही!

२४)चेहऱ्यावरची स्माईल हाच खरा मेकअप असतो...!

२५)संयम आणि मनःशांती भावी प्रगतीचे द्योतक आहेत!

२६)स्वतःच स्वतःसाठी प्रेरणा बनलं की स्वानंद आपोआप मिळतो!

२७)व्यक्तिमत्वाचे सौंदर्य चांगल्या विचारांनी अधिकच खुलून दिसते!

२८)आपला स्वाभिमान विकणे हेच खरं मरण...!

२९)सुख आणि दुःख या आपल्या मनाच्या कल्पना आहेत..!

३०)आशा हेच माणसाच्या जगण्याचे गमक आहे...!

३१)समोर येणाऱ्या संधीला जो सन्मानपूर्वक सामोरा जातो. त्या व्यक्तीला नशिब नेहमीच साथ देत असते. काहीजण मात्र मिळालेल्या संधीतही समस्या शोधत बसतात आणि संधी गमावतात. संकट छोटे असले तरी त्यातून जो धडा मिळतो त्यातच यशाचे बीज दडलेले असते!

३२)आपण ज्याची इच्छा करतो. प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही. परंतू नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते. यालाच आपण चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद म्हणतो!

३३)नैसर्गिक संसाधने सहज उपलब्ध झालीत सध्या म्हणून आम्हाला त्यांची किंमत कळत नाही. पण त्यांची अशीच लयलूट आपण करत राहिलो तर एक नां एक दिवस ती नष्ट होणारच! म्हणून आतापासूनच त्यांची खरी किंमत ओळखून त्यांचा योग्य वापर करणे हे गरजेचे आहे!

३४)अहंकार उत्पन्न झाला की सद्सद विवेक बुद्धी लोप पावत जाते. माणूस ती भ्रमाची खोटी झापडं लावून त्याच दूषित नजरेने सर्व बघतो अन् त्यामुळे त्याला स्वतः पुढे सारे तुच्छ वाटायला लागते. अहंकाराची हीच अवस्था त्याच्या  ऱ्हासाला अन् पुढे विनाशाला कारणीभूत होते!
 
३५)प्रत्येकाचे आपापले वेगळे विश्व असते. कुणाचे विश्व त्यांच्या कुटुंबात, कुणाचे त्यांच्या मित्रांत, कुणाचे त्यांच्या व्यवसायात तर कुणाचे त्यांच्या छंदात सामावले असते. पण याही पलीकडे जाऊन साऱ्यांना सामावून घेण्याची भावना म्हणजे वैश्विक भावना आहे. ती जिथे असते मानवता तिथे वसते...!

३६)आयुष्य अनेक वळणा वळणांनी भरलेले आहे. प्रत्येक वळण एक नवा संदर्भ घेऊन येते. एखादे वळण दिशा दाखवत यशाच्या उच्च शिखरावर नेते तर एखादे वळण पार आयुष्य उधवस्त  करणारे असते. म्हणून प्रत्येक वळणाचा योग्य वेध घेत जपून पाऊल टाकणं कधीही योग्य...!

३७)रात्री अपरात्री, नेहमी पेक्षा वेगळ्या वेळात तुमच्या जवळच्या परिचिताने तुम्हाला काॅल केल्यास....जरुर घ्या. त्यांना काय बोलायचे आहे. आधी ऐकून घ्या. तुम्ही मनापासून त्यांचे ऐकणार आहात...हे त्यांच्या मना पर्यंत पोहोचू द्या. जमेल तेवढे बोलून त्यांना खुलवा, मदत करा. तुमचे सांत्वनाचे बोल...एखाद्याचे जीवन वाचवू शकतात...!

३८)कोणतेही व्यसन वाईटच. सोशल असं काही नसतं. चोचले आहेत ते. एकदा का कुणाच्या छायेत येऊन, "चव चाखाल..." ती तुमची सवय होऊन बसेल. सोशलच्या नावाखाली तुम्हाला व्यसनी, निरुपयोगी, कफल्लक बनवून, अनेक आजार तुमच्या झोळीत टाकतील हे "सोशल गुरु...!"

३९)एखाद्याची दुखरी नस पकडून...वारंवार त्याच गोष्टींची चर्चा करु नये...चर्चा केल्याने दुःख वाढतं!

४०)क्षणिक सुखाची भुरळ पाडून जे नातं जुळतं ते फसवं असतं,
अविचारी बुद्धीने घालवून तोल, मनाला आपण फसवायचं नसतं!

४१)दु:खाच्या गावा पलिकडंच सुखाचं घर उभं असतं,
सहनशिलतेच्या वाटेनंच आनंदाचं स्वप्न दिसतं!

४२)दुःख कधी ही कुरवाळत बसू नये. कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाते. ज्या गोष्टीचं दुःख सलतं. तिला डोक्यात थारा द्यायचा नाही त्या गोष्टीं पासून लांब जायचे. खंबीर व्हायचे!

४३)स्पष्टवक्तेपणा जरी आगाऊपणा वाटत असला तरीही माणसाने स्पष्ट बोलावे. कारण त्यामुळे मनातील शंकांचे समाधान होते आणि गैरसमज दूर होऊन जिव्हाळ्याची नाती न तुटता मन शांती मिळते!

४४)लोक आपल्याबद्दल काय बोलतात पेक्षा आपण आपल्याबद्दल काय विचार करतो...ते महत्वाचे ! कारण आपली परिस्थिती आपल्याला माहित असते. लोकांना नाही! नेहमी आत्मसम्मान जपा!

४५)एखादी कपोलकल्पित गोष्ट वारंवार बोलल्यास कालांतराने खरी वाटू लागते. सत्यता पडताळून बघितल्याशिवाय विश्वास ठेवू नये. खोटं उघड पडणारच!

४६)एखादी व्यक्ती आपल्या सत्कर्माचे भरभरुन कौतुक करते, तेव्हा खुप आनंद होतो. तसेच त्या व्यक्तीने आपली चूक दाखवली तर तिचा द्वेष करु नये. याउलट ती चूक सुधारावी. कारण समोरच्या व्यक्तीचा हेतू आपल्याला दुखावण्याचा किंवा कमी लेखण्याचा नसतो, तर ती आपल्याकडे आदर्श व्यक्ती, या दृष्टीनेच पाहत असते. हे समजून घ्यायला हवे.

४७)लहान मुलांशी बोलताना तथ्यहीन गोष्टी बोलू नये. जवळच्या व्यक्तिंना मनापासून ग्रहण करतात लहान मुले, म्हणूनच त्यांच्यावर चांगले संस्कार टाकायला हवेत!

४८)जगावर रुष्ट होऊन घरात कोंडून घेणे...आपल्याला जगापासून तोडतं...! जे आहे ते स्विकारुन...पुढे चालत रहायचं!

४९)आपल्या ज्ञानाचा फायदा गरजवंताना दिल्यास.
ज्ञानाची फलश्रृती मिळाली म्हणून समजा!

५०)शिक्षणाची कास धरुन शिखर गाठावे!
सावित्रीच्या लेकीने आत्मनिर्भर व्हावे!
०००
२२/०८/२३