जलद लेखन
विषय - थोरलेपण
शीर्षक - मावळत्या दिनकरा...
भाग-१
विषय - थोरलेपण
शीर्षक - मावळत्या दिनकरा...
भाग-१
आल्या का गं सर्वजणी?
ममता, मयुरा, मुक्ता, गीता, शरयू, गौरी, शारदा, कांता, सुषमा ने सर्वांना आवाज दिला.
हो सुषमा, आलो आलो लगबगीने आत येत शारदा म्हणाली.
उद्यापासून अगदी वेळेवर यायचं बरं. आपलं ठरलं नां की, आपल्या घराजवळच्या गार्डनमध्ये योगा करायचा आणि मी तुम्हाला योगा शिकवणार आहे म्हणून.
हो मॅडम, गीता म्हणाली.
हे बघ गीता, मला मॅडम वगैरे म्हणायचं नाही. आपण सर्व समवयस्क नां? सुषमा म्हणाली.
सुषमा गंमत केली गं तुझी.
सुषमा, तू योगा शिकवणार म्हणतेस पण तू स्वतः तरी तंदुरुस्त आहेस का?
गौरीने सुषमाची फिरकी घेतली.
गौरी, हे बघ तंदुरुस्त असो वा नसो, कोणीतरी पुढाकार घ्यावाच लागणार नां?
आपण सर्वजणी रोज फिरायच्या निमित्ताने एकत्र येतो. एकत्र गप्पा मारत बसतो.तेव्हा मी रोज तुमच्या तोंडून ऐकायची, एक म्हणायची माझा हात दुखतो. दुसरी म्हणायची माझा पाय दुखतो. योगा क्लासला जायला मात्र कोणीच तयार होत नव्हतं. म्हणून मी ठरवलं जशी होईल तशी योगासना करायची व शिकवायची सुद्धा.
" वा ! छान आयडिया आहे तुझी."
सुषमा म्हणाली.
सुषमा म्हणाली.
"चला मग व्हा तयार. दोन लाईन करून बसा बरं सर्वजणी."
"बरं बाई, आता तर ऐकावेच लागेल तुझे." गीता म्हणाली.
योगासने झाली. "दमलो गं बाई आता आम्ही." सर्वांनी एका सुरात म्हटले.
हो. चला आता आपण थोडा वेळ गप्पा मारू. नंतर आपल्या घरी जाऊ मयुरा म्हणाली.
अगं आपण सर्व समवयस्क, समदुःखी मैत्रिणी. आपल्यापैकी जवळपास सर्वांचीच मुलंबाळं, सुना आपल्याजवळ नाहीत. कुणाची परदेशात तर कुणाची इथेच मोठ्या शहरात.
गौरीचे मिस्टर काही वर्षांपूर्वी वारले. हल्ली तर ती एकटीच असते इथे. कांता म्हणाली.
मैत्रिणींनो, आयुष्य वेगाने संपते. काळ सरत जातो. जीवनातील हे वास्तव आपण समजून स्विकारले पाहिजे. बालपण अज्ञानातच जाते. तारुण्य संपून मध्यम वय देखील आपण चटकन ओलांडतो आणि बघता बघता वृद्धापकाळ दृष्टिक्षेपात येतो.
आपली शारीरिक स्थिती आपल्याला तशी जाणीव करून द्यायला लागते. मात्र हा वृद्धापकाळ, थोरलेपण रम्य कसं करून घेता येईल हे आपले आपण ठरवले पाहिजे. आजच्या काळात ६०,७० वर्षाची व्यक्ती देखील तुलनेने पाहिले तर प्रकृतीने उत्तम असते.
पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आज परिस्थितीत बराच बदल झालेला आहे. प्रगत विज्ञानामुळे चांगले वैद्यकीय उपचार व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मुक्ता म्हणाली.
क्रमशः
सौ. रेखा देशमुख
क्रमशः
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा