माया... भाग 1
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
अष्टपैलू लेखक महासंग्राम.
तिसरा राऊंड रहस्य कथा.
ही कथा फक्त मनोरंजन करण्यासाठी लिहिली आहे. याचा कोणाशी काही संबंध नाही. वाचकांचे आभार.
.......
.......
रहदारीचा रस्ता केव्हाच मागे पडला होता. एक कार जोरात शहराबाहेर जात होती. माया ती कार चालवत होती. थोड्या वेळात एका साध्याश्या हॉटेल समोर ती कार थांबली. त्यातून माया खाली उतरली. ती आली तशी हॉटेल मधले सगळे लोक हातातल काम थांबवून तिच्याकडे बघत होते. एकदम जादू होत्या तिच्या असण्यात, ती खरी आहे का कोणता भास. एवढी परफेक्ट, खूप सुंदर. तिचा औरा तसा होता, कोणीही आकर्षित होईल असा.
पिवळ्या रंगाची सुंदर साडी ती नेसली होती. त्यावर व्हाइट ब्लाऊज, अतिशय आकर्षक फिगर, केस मोकळे, डोक्यावर गॉगल अडकवला होता, अजिबात मेकअप नाही, फक्त थोडी लिपस्टिक लावलेली, कपाळावर लाल टिकली, हातात घड्याळ, एका हातात ब्रेसलेट, लयबद्ध चालीने ती समोर येवुन थांबली.
समोरच्या टेबलावर एक माणूस बसलेला होता. तो तिची वाट बघत होता. "हॅलो मॅडम " तो उठून समोर आला.
"हॅलो मिस्टर जॉन" माया आणि तो दोघ काहीतरी बोलत होते. ते कार मधे जावुन बसले. कार वेगाने निघून गेली. कोणीतरी त्यांच्यावर लक्ष देवून होत. तेवढ्यात त्या माणसाने त्यांचे फोटो काढून घेतले, पुढे पाठवून दिले. समोरून कोणी तरी ते फोटो बघून खुश होत. त्यांनी विचारल " माहिती बरोबर आहे ना" .
हो.
"ठीक आहे. छान काम झाल उद्या येवून तुझे पैसे घेवुन जा . "
एक तासाने कार वापस आली. हॉटेल जवळ थांबली . तिथे मिस्टर जॉन उतरले. मायाने त्यांना पैशाच मोठ बंडल दिल. ते खुष होवुन त्यांच्या कार मध्ये बसले. निघून गेले.
माया निघाली. एका आलिशान घराच्या गेटच्या आत तिने कार पार्क केली. थोडी थकल्या सारखी दिसत होती ती. आजकाल धावपळ होत होती तिची. तिने ईकडे तिकडे बघितल बंगल्यात शांतता होती. हुश्श बर झालं सासू सासरे बाहेर नाहीत. तिने कारच्या आरशात स्वतःला बघितल. ठीक आहे ना सगळ. केस नीट केले, थोड पाणी पिल, हळूच उतरून ती बाहेर आली.
कार मधून उतरून ती घरात जात होती. तिच्या हालचाली कोणीतरी टिपत होत. पोर्चमध्ये एका पिलर मागे तो उभा होता. तिथून तो मायाच्या हालचाली टिपत होता. ती पुढे गेली तशी दोन हात मागून आले. त्याने तिला जवळ ओढून घेतल. ती खूप घाबरली. एकदम झटपट करत होती ती. सोडा.. ओह माय गॉड कोण आहे. ही काय पद्धत आहे का.
" रिलॅक्स माया, इट्स मी, आय लव यू".आता ती त्या माणसाच्या मिठीत होती, तो तिला सोडत नव्हता.
" मोहित काय हे, जावू द्या ना " माया धडपड करत होती.
"माया माय डार्लिंग, कुठे गेली होती तू, आमचा काही विचार आहे की नाही, किती वाट बघायची" , त्याने तिच्या कानावर ओठ टेकवले.
ती एकदम शहारली, लाजली, "आई बाबा बघतील सोडा ना" ती उगीचच लाजून बोलली.
"नाही" तो एकदम अधिकार वाणीत बोलला, "कुठे गेली होतीस, एवढी काय सुंदर दिसतेस, कस काय कंट्रोल करणार आम्ही ".
माया एकदम दचकली, मोहित घरी कसे या वेळी, हे केव्हा आले असतिल घरी, काही समजल तर नसेल ना यांना , हे तर संध्याकाळी येणार होते ना, म्हणजे तसच सांगितल होत यांनी मला, ओह माय गॉड काय सांगू आता, थोड लाडीगोडीत घेवू, "मोहित प्लीज आपण आत जावून बोलू, सोडा ना घरात सगळे आहेत "
"अजून तू माझ्या प्रश्नच उत्तर दिल नाही माया",
काय?
"कुठे गेली होतीस एवढी सुंदर होवुन. " मोहित त्याचा हट्ट सोडत नव्हता.
काय सांगू.. " मी.... मी.. मैत्रिणीला भेटायला" ,
"अच्छा लंच साठी का?"
"हो भिशीची पार्टी होती आमची" ,
"सकाळी सांगितल नाही तू मला, ठीक आहे फोटो दाखव", त्याने फोन मागितला.
" ते.. ते आम्ही फोटो नाही काढले", माया कशी बशी बोलली, थोडी घाबरली होती ती.
" बर झाल मला नसत आवडल माझ्या एवढ्या सुंदर बायकोला बाकीच्या लेडिजच्या नवर्यांनी बघितल तर", मोहित हसत होते.
" काहीही काय हो" , मोहित मजा करत आहेत, माया एकदम शांत झाली.
" बरोबर आहे ना, तू आज घरातून निघतांना बघितल का स्वतः कडे, हा पिवळा रंग तुला किती छान दिसतो आहे ते, पण एवढी का घाबरली आहेस तू, कोणी काही म्हटलं का तुला? "
"नाही ते तुम्ही अचानक मागून मिठी मारली ना म्हणून दचकले, आज कसे काय लवकर घरी आलात तुम्ही? ",
" तुला भेटायला तुझ्या सोबत छान वेळ घालवायचा होता मला, पण आम्ही याव तूच घरी नाही, चल आता वेळ घालवू नकोस, आय एम व्हेरी मच इगर टु बी विथ यू , येते ना की उचलून घेवू" , मोहित तिच्या जवळ आला.
येते.
चार वाजता मीनु आली शाळेतून. मम्मी.. मम्मी.. पप्पा तुम्ही कसे घरी? मम्मी आहे का?
" हो काय झाल मम्मी नसायला " मोहितने मीनुला जवळ घेतल.
" रोज मम्मी नसते या वेळी घरी, आजी मला खायला देते म्हणून विचारल, बर झालं पप्पा तुम्ही घरी आलात , तुमच्या मुळे मम्मी घरी आहे आज" , मीनु आत पळाली.
मोहित विचार करत होता मीनु काय म्हटली ते, माया मीनु येईल म्हणून लवकर निघते ऑफिस मधून, आजही माया घरी नव्हती, काय चाललय हीच? , कुठे जाते ही रोज? .
मीनु आत रूम मध्ये माया जवळ होती दोघी खुश होत्या.
मोहित अजूनही विचार करत होता, काय असेल नक्की? , जावू दे असेल तिला काही काम, माझा विश्वास आहे माया वर, नेहमी ऑफिस मध्ये असते ती आपल्या सोबत, उगीच जास्त विचार करायला नको, तो आत आला, "चल मीनु खावून घे काहीतरी आणि तयार हो, आज आपण शॉपिंगला जाणार आहोत, तुझा बर्थडे आहे ना नेक्स्ट वीक" ,
"खरच आता जायच पप्पा, थॅंक्स" , मीनु आवरायला पळाली.
माया मोहित कडे बघत होती, " तुला घ्यायचे ना ड्रेस माया" ,
"हो, आज काय स्पेशल आहे मोहित?"
"काही नाही तू माझ्या सोबत इतका छान वेळ घालवला दुपारी सो आय एम हॅप्पी " तो डोळा मारत बोलला,
माया लाजली.
"मागच्या आठवडय़ात मी घरी नव्हतो, कंटिन्यू मीटिंग होत्या, फॉरेनला होतो ना मी, त्यामुळे वाटल तुमच्या दोघीं सोबत वेळ घालवावा, आज मी दिलेल सरप्राईज आवडल वाटत तुला , राइट", तो मायाच्या डोळ्यात बघत होता, हळू हळू तिच्या जवळ येत होता, माया मागे सरकली तिच्या अंगावर काटा आला, ती खाली बघत होती,
" माया तू मला काहीच सुचू देत नाही", मोहित तिला मिठीत घेणार तेवढ्यात तिने त्याला ढकलला ती आवरायला आत पळाली.
" माया... माया वेट ठीक आहे आज रात्री सोडणार नाही मी तुला" तो हसत होता.
शॉपिंग झाली, मीनु साठी खूप ड्रेस घेतले, माया साठी पण डिझायनर ड्रेस सिलेक्ट केले,
" तु हे ड्रेस घालून दाखव माया, बघु तर दे कशी दिसते माझी बायको, मी बाहेर उभा आहे, दाखवायला ये बाहेर ",
माया हसत चेजिंग रूम मध्ये गेली, मोहित पण ना, एकदम त्रास देतात,
तिचा फोन वाजत होता, जॉनचा फोन होता, तिने फोन उचलला,
"मॅडम एक प्रॉब्लेम झाला आहे, एका अननोन नंबर वरून हे फोटो आले आहेत, आपण भेटलो ते, कोणी काढले असतिल? "
" कुठे आहेत फोटो, हे बघा मिस्टर जॉन मोहितला हे समजायला नको, प्लीज काहीतरी करा" माया काळजीत होती.
"मी पाठवतो तुम्हाला फोटो. "
" कोण आहे या मागे? काय म्हणण आहे त्यांच? "
"काय माहिती, बहुतेक ते आपला पाठलाग करत असतिल."
"काय एक एक काॅप्लीकेशन आहे समजत नाही" , मायाच्या फोन वर फोटो आले, फोटोत ती मिस्टर जॉन सोबत उभी होती, स्पष्ट दिसत होती, तिला एकदम घाम फुटला.
"ओह माय गॉड मिस्टर जॉन आता काय, काही फोन वगैरे आला का त्यांचा",
" नाही अजून मी सांगतो मॅडम, तुम्ही टेंशन घेवू नका. "
" लवकर साॅल्व करा हे प्रकरण, कोण ब्लॅकमेल करत आहे आपल्याला. " माया काळजीत होती. तिचे हात थरथरत होते.
"तुम्ही काळजी करू नका मॅडम. "
चेंजिंग रूम वर टकटक झाली, मायाने पटकन फोन ठेवला, मोहित होता, त्याला एक ड्रेस आवडला होता तो घेवून आला होता, "तू फोन वर बोलत होतीस का आता माया?"
"नाही " माया घाबरली.
"हो तू फोन वर बोलत होतीस" ,
"मी माझी एकटी बोलत होती. "
"ठीक आहे, रिलॅक्स, हा ड्रेस घालून दाखव, मी बाहेर उभा आहे, घाम पुस तो " ,मोहित बाहेर निघून गेला,
माया तिथे पाच मिनिट बसली. मोहितला काही समजल तर काय करू मी. उद्या भेटते मिस्टर जॉनला. पैशाची अरेंजमेंट करावी लागेल.
......
......
माया काय लपवते आहे मोहित पासून? बघु पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा