Login

माया... भाग 3

संध्याकाळी आगाशे ग्रुप तर्फे आलिशान पार्टी आयोजित केली होती फाईव्ह स्टार हॉटेल मधे, तिथे जायला सगळे तयार होते,

माया... भाग 3

©️®️शिल्पा सुतार
.........

आज मोहितचा पंचवीसावा वाढदिवस होता. संध्याकाळी मोठी पार्टी होती. त्या पार्टी सोबत आज त्याचा स्नेहा सोबत साखरपुडा होता, घरात सकाळ पासून पूजा होम सुरू होत.

थोड्या वेळ थांबून मोहित ऑफिस मधे आला, नंदा ताईंना अनाथाश्रमात वस्तु दान करायच्या होत्या, तिथे जेवण द्यायच होत, त्या मोहितला फोन करत होत्या.

"आई तू पुढे हो मी ऑफिसहून डायरेक्ट तिकडे येईल, माझी महत्वाची मीटिंग सुरू आहे," मोहित बिझी होती.

नंदा ताई, आलोक राव, स्नेहा, तिचे आई बाबा सगळे अनाथाश्रमात पोहोचले, आधी सांगितल असल्यामुळे तिकडे सगळी तयारी झाली होती.

मोहित वेळेवर आला, त्याची गाडी पुढे होती, मॅनेजर बॉडी गार्ड गेट वर उभे होते, सगळे हॉल मध्ये बसलेले होते, बाहेर कोणीही नव्हत. कोणी दिसल नाही त्याला.

आश्रम परिसरातात खूप शांतता होती, सुंदर बगीचा होता आजुबाजूला, त्यातून आत जाणारी पायवाट, दोघी बाजूला छान बाक ठेवले होते, मोहित खाली उतरून सगळीकडे बघत होता, खूप छान वाटत होत इथे, एक प्रकारची शांती  होती .

नेमक इथे यायच होत ना, कोणी घरचे दिसत नाहीत, त्याने फोन हातात घेतला, नंबर लावणार तेवढ्यात त्याला एक गोड आवाज कानावर आला. अतिशय सुंदर, कोण गात आहे, आवाज बगिच्यातुन येत होता, एवढ्या शांततेत तो सुमधूर आवाज सगळीकडे घुमला, जादुई वातावरण निर्माण झाल होत, मनमोहक.... वाह काय आवाज आहे, तो ओढला गेला त्या गाण्याकडे.

तो बगीच्यात आला.

माया गात गात झाडांना पाणी देत होती, तो बघत राहिला, एकदम गोड मुलगी आहे ही, ती तिच्या जगात धुंद होती, छान आवाज तितकीच ती सुंदर , पलीकडून तो तिच्याकडे बघतो आहे तिला माहिती नव्हत, मधुन ती झाडांना गोंजारत होती, हळूच पाणी टाकत होती.

तो संमोहित झाला होता , गुलाबी ड्रेस, एका बाजूला दुपट्टा सोडलेला, सुंदर केस मोकळे सोडलेले , मेक अप नाही साधी टिकली लावलेली नव्हती, हातात बांगड्या नाही, कानात काही नाही, ही खरी मुलगी आहे की कोणी अप्सरा, कोण आहे ही?

एवढी सुंदर मुलगी नाजूक निरागस रूप, इथे काय करते आहे ही? अनाथ आहे का ही? की इथे काम करते? ,

तिला बघता बघता तो समोरच्या कुंडी वर धडकला, आई ग तो ओरडला

त्या आवाजाने मायाने समोर बघितल, ती एकदम पळत पुढे आली, "काय झाल पडले का तुम्ही? लागल का? बोला ना? काय झालं? कोण हवय तुम्हाला? "

तो भारावल्या सारखा तिच्या कडे बघत होता.

ती दोन मिनिट थांबली, त्याच्या एकटक बघण्याने विचलित झाली, तिथून निघाली, त्याने पटकन तिचा हात धरला, खर आहे की ही मुलगी, हे तो बघत होता,

" काय करताय सोडा, काय हवय? "तिने झटका मारला, ती पटकन झाडा मागे लपली, तो पुढे झाला, ती झाडा मागून त्याला बघत होती,

"हाय" मी मोहित,

ती दुसरीकडे बघून मागे सरकली, मोहित गोड हसत होता,

"एक्सक्युज मी एक मिनिट," त्याने हाक मारली, माया उभी होती त्या झाडाजवळ तो आला, तिने तिथून सटकायचा प्रयत्न केला, तिच्या दोघी बाजूने हात ठेवुन तो उभा होता, मायाला जाता येत नव्हत, "गोड आवाज आहे तुझा, खूप छान गातेस तू, नाव काय तुझ?, तू इथे रहातेस का? "

माया गप्प होती,

"नाव काय तुझ? "

"मला.. मला जायच आहे. "माया घाबरली.

"नाव सांगितल नाही तर जाता येणार नाही, आय एम सिरीयस." मोहित हसत होता.

माया,

त्याने हात पुढे केला, माया नुसती बघत होती,

" कोणी हात पुढे केला की हात मिळवायचा असतो,"

मायाने हात मिळवला,

जा, त्याने हात काढला,

तशी माया पटकन पळत आत निघून गेली तिथून,

काय मुलगा आहे, डायरेक्ट हात का धरतो, नाव विचारतो, कसा बघत होता माझ्या कडे, का आला आहे इथे? , ओह माय गॉड, कोण आहे तो?

मोहित तिथे उभा होता, माया.. तो छान हसला, इकडे आत गेली का ती, तो तिकडे जात होता .

"मोहित.. मोहित.. इकडे आहे कार्यक्रम ,बागेत काय करतो आहेस तु." स्नेहा आली.

"हो आलोच मी तू जा." तो माया गेली तिकडे बघत होता.

अचानक स्नेहाने त्याला मिठी मारली,

"काय हे स्नेहा बाजूला सरक," मोहित वैतागला होता. स्नेहा नेहमी भेटली की फिजिकल व्हायचा प्रयत्न करायची, हेच मोहितला आवडत नव्हत, तिच्या टच मधे प्रेम नव्हत, उगीच ती मोहितला मिळविण्यासाठी त्याच्या नेहमी जवळ जात होती, मोहित पेक्षा त्याच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी वर तिचा डोळा होता.

" मोहित तू माझ्या पासून दूर का पळतो, प्लीज इकडे ये, सकाळ पासून मी तुला भेटायचा प्रयत्न करते आहे, तू मला वेळ देत नाही, आजचा हा स्पेशल डे अजून स्पेशल नाही करायचा का तुला," स्नेहा त्याच्या कडे बघत होती.

"स्नेहा प्लीज कुठे आहोत आपण आणि काय चाललय तुझ? आई बाबा कुठे आहेत? चल तिकडे. " मोहित.

" ठीक आहे चिडू नकोस, मी नाही तुला टच करणार, तिकडे हॉल मध्ये प्रोग्राम आहे. " स्नेहा.

मोहित पुढे निघून गेला.

आज संध्याकाळी पार्टी झाल्यावर तुझ्या साठी माझ्या कडून एक गोड सरप्राईज आहे माय डियर मोहित बघु माझ्या पासून तू कस दूर राहतोस, मी आज तुला मिळवणार,

कार्यक्रम सुरू झाला, मोहितने केक कापला, पुर्ण कार्यक्रमात त्याला कुठेच माया दिसली नाही, निघतांना तो बगीच्याच त्या बाजूला बघत होता, माया... त्याच्या चेहर्‍यावर हसू आल. मी येईल परत तुझ्या साठी.

ते लोक गेले,

माया तिच्या रूमच्या खिडकीतून पडद्या आडून बघत होती, थ्री पीस मधला मोहित अतिशय हॅन्डसम दिसत होता, डोळ्यावर महाग गाॅगल, हातात ब्रँडेड घड्याळ, महाग फोन होता हातात, आजुबाजूला बॉडी गार्ड एक मॅनेजर होता सोबत, किती मोठा फौज फाटा, श्रीमंत लोक दिसता आहेत हे.

या मुलाने माझा हात धरला होता का, तो माझ्या कडे बघत होता का, स्वप्न आहे हे एक, नाव काय असेल या मुलाच, नंतर ऑफिस मध्ये मिळेल माहिती, मोठ्या घरचे आहेत हे लोक, त्यांचे नौकर माझ्या पेक्षा पॉश आहेत, गाडी किती मोठी, नकळत माया त्याच्या कडे ओढली गेली.

सगळे गेले, माया जेवायला खाली आली, डायनिंग हॉल मध्ये त्या लोकांची चर्चा सुरू होती.

"किती हीरो सारखा मुलगा होता तो, खूप हॅन्डसम," मुली बोलत होत्या.

"मुव्ही मधे काम करतो का तो? "

"नाही ग हे श्रीमंत लोक असे दिसतात रूबाबदार,"

"त्याच लग्न जमल होणारी बायको होती सोबत,"

"ती मुलगी शोभत नाही त्याला,"

"आपल्याला काय, जेवण छान आहे, केक घे,"

माया बाजूला बसुन सगळं ऐकत होती, त्याच लग्न जमल आहे हे ऐकुन ती नाराज होती, जावू दे नाहीतर कुठे भेटणार तो आपल्याला या पुढे, लग्न जमल तर मला नाव का विचारल, ती चिडली होती.

त्या लोकांनी आणलेले मोठा केक डायनिंग हॉल मध्ये ठेवलेला होता, अर्धा खावून झाला होता,

नेहमीच होत अनाथ आश्रमासाठी हे, गरीब मुलांवर अचानक कोणाला तरी दया येते , मग अस खायचे पदार्थ घेवून इकडे येतात , इतर वेळी लक्ष नसत कोणाच, वाढदिवसाच्या दिवशी इकडे येवून उपकार करतात हे लोक, ती परत चिडली होती,

ती केक जवळ गेली, केक वर हॅप्पी बर्थ डे मोहित लिहिलेल होत, अच्छा म्हणजे नाव मोहित आहे तर, जावू दे, तिने जेवून घेतल,
......

संध्याकाळी आगाशे ग्रुप तर्फे आलिशान पार्टी आयोजित केली होती फाईव्ह स्टार हॉटेल मधे, तिथे जायला सगळे तयार होते,

"मोहित कुठे आहे नंदा? झाला का तो तयार? " आलोक राव.

"हो आलीच बघून." नंदा ताई मोहितच्या रूम मध्ये आल्या, तो अजूनही तयार नव्हता, पूल साईडला चेअरवर तो लॅपटॉप उघडून बसलेला होता, समोर अनाथाश्रमाची वेबसाईट उघडलेले होती, तो माहिती वाचत होता, डोनेशन साठी लिंक होती, टेबल खुर्ची किचनची भांडी, किराणा, मुलांच शाळेच सामान बरच हव होत त्यांना, त्याने फोन हातात घेतला डायल करणार तेवढ्यात नंदा ताई आत आल्या, "मोहित काय हे अजून तयार नाहीस तू?"

घरचा टी शर्ट होता अंगावर, " होतो तयार आई, एक मिनिट थांब, थोड काम आहे "

" तुझा फोन कुठे आहे? स्नेहा किती फोन करते आहे तुला, तू तिचे कॉल्स का घेत नाही?" नंदा ताई.

मोहितने लक्ष दिल नाही, तो अजूनही लॅपटॉप मधे बघत होता, "आई मी येईन तिकडे वेळेवर . तुम्ही जा पुढे,"

"नाही आता चल उठ तयार हो, बरेच गेस्ट येणार आहेत त्यांच्याशी तुझी ओळख करून द्यायची आहे, स्नेहाच्या घरचे येतील इतर नातेवाईक येतील, जरा खुश रहात जा. "

" आई मला एवढा वेळ नाही,"मोहित.

" काय काम सुरू आहे तुझ? "

" आहे काहीतरी महत्वाच, " त्याला माया आठवली, गोड हसू त्याच्या चेहर्‍यावर आल, मला हवी ही,

नंदा ताईंनी कपाटातून कपडे काढून कॉटवर ठेवले.

" सिरियसली मी हा कुर्ता पैजामा घालणार नाही, मी फॉर्मल वर येईल,"मोहित.

" अरे पण प्रोग्राम आहे ना, अस करता का मोहित? "नंदा ताई.

" आई प्लीज मी कंफर्टेबल नाही कुर्ता मधे." मोहित.

" ठीक आहे तस कळव स्नेहाला तिचा तुझा मॅचिंग ड्रेस आहे." नंदा ताई.

"आई प्लीज आज करायला हवी का एंगेजमेंट? म्हणजे खूप घाई नाही का होत. " मोहितला कुठेही जायची इच्छा नव्हती.

" काही प्रॉब्लेम आहे का, काय झालं? "नंदा ताई.

"काही नाही मी आताच तर काम सुरू केल त्यात ही जबाबदारी लगेच. "मोहित.

" अरे कसली कमी आहे आपल्याला, छान रहायच तर अस करतोस तू, काही बोलली का तुला स्नेहा, उत्साही का नाही तू? "

" तस काही नाही आई, पण तिची माझी आवड मॅच होत नाही म्हणजे मी कंफर्टेबल नाही तिच्या सोबत."

" मोहित स्नेहा एक छान शिकलेली हुशार मुलगी आहे, लहान पणा पासुन बघते आहे मी तिला, ती योग्य आहे तुझ्या साठी. "

" आई पण. "

" मी काहीही ऐकणार नाही मोहित तयार हो पटकन."

" ठीक आहे. "

जावू दे नाही तरी आता फक्त इगेजमेंट तर आहे, माया सॉरी, मी तिच्याशी लग्न करणार आहे, त्याला त्याच्या विचारच आश्चर्य वाटल, खूप वेगळाच खुश होता तो.

🎭 Series Post

View all