माया... भाग 4
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
हॉटेल बाहेर श्रीमंत लोकांच्या कारच्या रांगा लागल्या होत्या, नंदा ताई, आलोक राव, मोहित हॉटेलवर आले, स्नेहाच्या घरचे स्वागताला उभे होते हार घेवून, "काय गरज आहे हे करायची, इनफ," मोहित सरळ आत निघून गेला, या पुढे हे स्वागत वगैरे मला आवडणार नाही.
स्नेहा त्याच्या मागे पळत आली, "मोहित तू हा का ड्रेस घातला, आपण कसे दिसतो आहोत, मॅचिंग ड्रेस कुठे गेला तुझा? नंतर बदलणार का,"
"नाही मी ह्याच ड्रेस वर रहाणार आहे." मोहित.
"काय अस करतोस मोहित." स्नेहा अजुन त्याच्या मागे चालत होती.
मोहित थांबला. "काय प्रॉब्लेम आहे स्नेहा अस केल तर मला इगेजमेंट करायची नाही."
"सॉरी मोहित."
तो आत निघून गेला.
स्नेहा नंदा ताईं जवळ आली, " काय झाल अॅण्टी का चीड चीड करतो मोहित? "
" अग अस नाही, त्याला कुर्ता आवडत नाही इतकंच, चल आत मध्ये, "
बरेच पाहुणे वाट बघत होते, मोहित स्नेहा स्टेज वर उभे होते, बरेच लोक ओळख करून घेत होते, मोहित गप्प होता, तो मायाचा विचार करत होता, साधी छान माया, तिचे ते घाबरलेले डोळे, सुंदर चेहरा, गोड आवाज, त्याच्या वर मायाने मोहिनी घातली होती, तो तिथे असून नसल्या सारखा होता,
स्नेहाचे वडील अनाउन्समेंट करत होते, सगळे टाळ्या वाजवत होते, दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या, स्नेहा खूप खुश होती तिने मोहितला मिठी मारली,
काय आहे हे, हे स्नेहा प्रकरण गळे पडू झाल आहे, आईने लग्न ठरवायची घाई केली माझी, एकदा चौकशी करावी लागेल या लोकांची.
मुळातच हे स्थळ स्नेहाच्या वडिलांनीच आलोकरावांना सुचवलं होतं, तेव्हाही मोहितने नाही म्हटलं होत. दोन्ही घरचे पूर्वी पासून एकमेकांना ओळखत होते दूरचे नातेवाईक होते ते, दोन श्रीमंत घराण्यात हे लग्न होणार होतं.
स्नेहा जरा बोल्ड बिंदास्त होती. बोलण्यातही जरा तुसडेपणास होता तिच्या. रोज व्यवस्थित मेकअप करत होती ती. नॅचरल ग्लो असा नाही चेहर्यावर. थोडासा रागीट स्वभाव बऱ्याच वेळा मोहितला दिसला होता. नेहमी नोकरांवर पण चिडचिड करत असे ती.
का काय माहिती पण मोहित तिच्याबरोबर अजिबात कम्फर्टेबल नव्हता आणि आता माया दिसल्यापासून तर त्याचं मनच उडालं होतं.
रात्री प्रोग्राम झाल्यानंतर स्नेहाने मोहितला बाजूला नेलं.
"काय आहे स्नेहा?" मोहित चिडला होता.
"मी तुला म्हटलं होतं ना कार्यक्रम झाल्यानंतर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे."
"काय आहे ते?"
तिने पुढे होऊन त्याच्या गालावर ओठ टेकवले. तो शॉक होऊन मागे सरकला. खिशातल्या रुमालाने त्याने त्याचा गाल पुसला. स्नेहा हसत होती." आपल्यात मुलगा कोण आहे मुलगी कोण आहे. काय अस करतोस मोहित, तू तुझ्या बाजूने काहीच पुढाकार घेत नाही. शेवटी मीच विचार केला तुला जर काही अडचण नसेल तर मी रेडी आहे आपल्या रिलेशन साठी, तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर चालेल मला."
मोहित शॉक होऊन बघत होता.
" अरे त्यात काय एवढ? आपण दोघं अडल्ट आहोत आणि आपलं लग्नही होणार आहे, तुझा होकार असेल तर आपण पुढच्या आठवड्यात पिकनिकला जाऊ आमच्या फार्म हाऊस वर, आपल्याला एकमेकां सोबत छान वेळ घालवता येईल. " स्नेहा.
मोहितने एकदा स्नेहाकडे बघितलं, नकारात्मक मान हलवली, तो तिथून निघून गेला, काय बोल्ड मुलगी आहे.
रात्री घरी आल्यानंतरही मोहित मायाचा विचार करत होता, माया खरच होती का की काही भास होता, कोण होती ती?, नंतर दिसली नाही ती तिथे, उद्या चौकशी करू अनाथाश्रमात, स्नेहाची पण चौकशी करावी लागेल बरीच फॉरवर्ड दिसते ही.
दुसर्या दिवशी सकाळी तो लवकर ऑफिसला गेला, त्याने त्याच्या सेक्रेटरी पवार यांना बोलवलं, "येस सर"
"या अनाथाश्रमाची पूर्ण माहिती मला हवी आहे, कोण कोण आहे तिथे सगळी माहिती हवी,"
"हो सर उद्या पर्यंत सांगतो."
"उद्या नाही आता एका तासात,"
"ठीक आहे,"
त्याने एक फोन फिरवला, "मिस्टर भास्कर"
"येस सर"
"मला एका व्यक्तीची माहिती हवी आहे, "
"डिटेल्स द्या, "
त्याने स्नेहाची पूर्ण माहिती पुढे पाठवली.
तेवढ्यात स्नेहाचा फोन आला, त्याने कट केला.
लगेच तिचा मेसेज आला," गुड मॉर्निंग स्वीट हार्ट, बिझी ह्म्म. "
त्याने दुर्लक्ष केल.
मीटिंग सुरू झाली.
एका तासाने अनाथ आश्रमाची पूर्ण माहिती त्याच्या समोर होती, जून होत ते अनाथाश्रम, बरेच मुल होते तिथे, त्या सोबत त्याच्या मागच्या बाजूला महिला आधार आश्रम ही होता, एक संस्था ती ट्रस्ट चालवत होती, ते देणगी स्विकारत होते,
तस काल मोहितच्या वाढदिवसा निम्मीत मोठी रक्कम त्यांनी तिथे दिली होती, आता परत कस जाणार तिथे, त्याने फोन लावला, "काल मी तुमच्या अनाथ आश्रमात आलो होतो त्यावेळी मला फर्निचरची अवस्था बरीच बिकट वाटली तर त्या संदर्भात मला तुम्हाला काहीतरी मदत करायची आहे तर मी येऊ का तिकडे."
"तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर मी इथून सांगू शकते की तुम्हाला किती फर्निचर लागते, तुम्ही ते ऑर्डर करून पाठवू शकता," सविता मॅडम.
" ठीक आहे मॅडम पण आमच्या लोकांना येऊन तिथे पाहणी करायची आहे. "
"काही हरकत नाही तुम्ही लोक येऊ शकता,"
" तुम्हाला काय हव काय नको त्याची लिस्ट करा, अजून काही घेता येईल का ते आम्ही बघु, आम्ही पेमेंट करून देऊ, पण या गोष्टीची वाचता कुठे करू नका, आम्हाला पब्लिसिटी आवडत नाही, " मोहित.
" ठीक आहे सर, आम्ही कोणाला काही सांगणार नाही, "
मोहित त्याच्या सिक्रेटरी पवार आणि आणखी दोन लोक अनाथ आश्रमात पोहोचले, त्या लोकांनी ऑफिसचा रस्ता दाखवला, तिथे जाऊन बसले, काय काय वस्तू लागत आहे त्याबद्दल डिस्कशन झालं.
मोहित इकडे तिकडे बघत होता. ही चक्कर फुकट गेली वाटत. कुठे आहे ती माया? खरच दिसली होती का मला काल ती, काही समजत नाही, गार्डन मधे जावुन बघाव लागेल, पण मी तिला हात लावून बघितल होत, छान बोलली ती माझ्याशी.
तेवढ्यात सविता मॅडमने हाक मारली, "माया चहा सांगितल होता गेस्ट साठी, कुठे आहे,"
"येस मॅडम आणते," आतून आवाज आला.
ती आणि बाकीच्या मुली तिथे ऑफिस मधे काम बघत होत्या, सविता मॅडमला तेवढीच मदत होत होती मुलींची , माया एका मुली सोबत ट्रे मधुन चहा घेवून आली, तिने तो ट्रे समोर ठेवला,
मोहित अति खुश झाला, तो नीट उठून बसला, तो माया कडे बघत होता, आजही निळया ड्रेस मध्ये ती खूप सुंदर दिसत होती, आकाशातून कोणी परी खाली आली जशी,
सेक्रेटरी त्याला काहीतरी सांगत होता, त्याच लक्ष नव्हत,
" सर सर," त्याने हाताने थांब सांगितल,
मायाने त्याला चहा दिला, तिने त्याच्या कडे बघितल, तो तिच्या कडे बघत होता, ती घाबरली कप बशी हलली, थोडा चहा खाली पडला त्याच्या पँट वर
"सॉरी सो सॉरी मला समजल नाही," ती पटकन बोलली, घाबरली होती ती,
"माया काय करते तू?" सविता मॅडम ओरडल्या.
माया गुपचुप बाजूला उभी होती.
"नो वरीज, मॅडम नका ओरडू तिला,"
"सॉरी मिस्टर मोहित," सविता मॅडम.
"इट्स ओके, नो नीड टु वरी, आय एम परफेक्टली फाइन, वॉश रूम कुठे आहे?" मोहित माया कडे बघत होता.
"माया त्यांना आत ने, "
" हो या आत,"
दोघ आत गेले, मोहित खुश होता. तो हात पाय धुवून बाहेर आला, मायाने टॉवेल दिला, "सॉरी ते मला समजल नाही, चटका लागला का तुम्हाला,"
"नाही माया, ठीक आहे मी,"
" तुम्ही काल ही आले होते का इथे? "
" हो बरोबर ओळखल मला मीच होतो तो गार्डन जवळ जेव्हा तू झाडांना पाणी देत होतीस, विसरली नाही वाटत तू मला," तो अजूनही माया कडे बघत होता.
माया गडबडली, ती दुसरीकडे बघत होती.
चला,
" माया एक मिनिट, हे माझ कार्ड, हा माझा फोन नंबर आहे, फोन कर मला बोलायच आहे तुझ्याशी,"
माया आश्चर्याने बघत होती." काय बोलायच आहे, इथे सांगा, मला जमणार नाही फोन करायला. "
" का नाही जमणार फोन नाही का? "
" आहे हा काय."
"मग काय प्रॉब्लेम आहे, मला आपल्या बद्दल बोलायच आहे." मोहित.
"आपल्या बद्दल, म्हणजे? हे बघा मी गरीब अनाथ मुलगी आहे, इथे नौकरी करते, मागे रहाते, मला कोणाचा आधार नाही, अशी गम्मत करु नका, "माया.
" मला तुझ्याशी ओळख वाढवायची आहे माया, प्लीज एकदा फोन कर, इथे बोलता येत नाही जास्त, तुझा फोन नंबर दे, "
नाही,
तो तिला येवु देत नव्हता, माया मदतीसाठी बघत होती, कोणी आल नाही.
त्याने मायाचा फोन तिच्या हातातून काढून घेतला, स्वतःचा नंबर डायल केला, तिच्या कडे देवून दिला, तो तिचा नंबर सेव करत होता , खूप धडधड होत होती तिला, ती पटकन तिच्या रूम मध्ये निघून गेली, मोहित आत येवून बसला, खूप खुश होता तो,
माया रूम मध्ये आली, आशा बघत होती माया घाबरलेली होती, "काय झाल माया?"
ती मोहित बद्दल सांगत होती,
आशा चौकशी करत होती,
रात्री घरी गेल्यावर जेवण झाल मोहित त्याच्या रूम मध्ये आला, त्याने मायाला फोन लावला, ती झोपत होती, या वेळी कोणाचा फोन असेल तिने उचलला,
"मी मोहित.. माया झाल का जेवण? काय करते आहेस तू?"
माया बघत होती आशा कुठे आहे, ती बाहेर कोणाशी तरी बोलत होती, "हे बघा तुम्ही मला उगीच फोन करू नका, माझा नंबर डिलीट करा, परत फोन केला तर मी.. मी सविता मॅडमला सांगेन,"
मोहित हसत होता, "माया काय अस मोकळ बोल माझ्याशी,"
" नाही तुम्ही मला फोन करू नका, "
" उद्या भेटू या का आपण."
"नाही जमणार," माया घाबरली होती, हे श्रीमंत लोक त्यात याचा काल साखरपुडा होता असे सगळे बोलत होते, काय म्हणण असेल याच? नुसता टाइम पास करणार असतिल, मला चालणार नाही अस, मी नाही बोलणार, तिने त्याच्या नंबर ब्लॉक केला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा