Login

माया... भाग 5

तुझ्या पेक्षा पॉश आमच्या कडे माझे नौकर आहेत, मोहितला जाळ्यात ओढण्या आधी विचार करायचा, एवढ्या कळकट मुलीत मोहितने काय बघितल



माया... भाग 5

©️®️शिल्पा सुतार
.........

मोहित आज सकाळ पासून मायाला फोन लावत होता, तिचा फोन लागत नव्हता, ती पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती, शेवटच्या वर्षाला होती, आज लेक्चर होत, ती कॉलेजला गेली होती.

मोहितने सेक्रेटरीला फोन केला, "पवार माया बद्दल मला पूर्ण माहिती हवी आहे, ती कुठे आहे, काय करते आहे, माझा फोन का घेत नाही?"

"ठीक आहे सर,"

त्याने मिस्टर भास्करांना फोन केला, "त्या स्नेहाची चौकशी करायला सांगितली होती, त्याच काय झाल?"

"आला आहे तो रीपोर्ट, पाठवतो. "

मोहित बघत होता स्नेहाची माहिती, या आधी तिचे बरेच बॉय फ्रेंड होते, आता इगेंजमेंट झाली तरी अजूनही ती एक दोघांसोबत फिरत होती, त्याने ती इन्फॉर्मेशन घरी दाखवायच ठरवल, कधीच बोलतो आहे मी घाई होते लग्नाची, पण आई ऐकत नाही, किती मुलांबरोबर फिरली ही स्नेहा, आता पैशासाठी माझ्याशी लग्न करते. भविष्यात माझ्या सोबत तरी नीट राहील की नाही ही.

जरा वेळाने पवारांचा फोन आला, माया मॅडम कॉलेज मधे आहेत, त्याने लोकेशन दिल, थोड्या वेळाने मोहित कॉलेज मध्ये गेला, क्लासेस संपले होते, माया फ्रेंड्स सोबत बाहेर येत होती, माया.... त्याने हाक मारली, माया दचकली, ती समोर गेली,

"माया मला बोलायच आहे तुझ्याशी."

"तुम्ही इथे का आलात?" माया इकडे तिकडे बघत होती कोणी बघत का ते.

"तू माझा फोन का घेत नाही, मी काय करणार मग , चल कॉफी घेवू," ती आशाकडे बघत होती, ती जा म्हटली, दोघ कॉफी शॉप मध्ये गेले.

" तुमच लग्न जमल का मोहित? ",..

हो.

"मग तुम्ही मला का भेटायला येत आहात,"

" मला ते लग्न करायच नाही , मला तुझ्या सोबत रहायच आहे, " मोहित एकदम बोलला.

माया घाबरली, तो अस डायरेक्ट बोलेल तिला वाटल नव्हत," ते शक्य नाही, मी गरीब मुलगी आहे, शिक्षण झाल की मला नौकरी करायची आहे, थोडे काम आहेत, माझ ठरलं आहे,"

"काय आहेत काम मला सांग मी करेन मदत,"

"नाही थँक्स लिव मी अलोन,"

" तुझे प्रॉब्लेम ते माझे प्रॉब्लेम मिळून सोडवू माया होकार दे ," मोहित.

" अस बोलू नका तुमच्या घरचे ऐकतील का या लग्ना साठी ,"

"मी माझा निर्णय घ्यायला मोकळा आहे, ठीक आहे मी वाट बघेन तुझी, माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर बिलीव मी आपण खूप खुश राहू सोबत, " मोहित.

"मला मला थोड वेळ द्या, मला अजून लग्न करता येणार नाही," माया विचार करत होती,
" त्या काका काकूंना धडा शिकवल्या शिवाय मी शांत बसणार नाही, कस काय टाळु या मोहितला, हात धुवून मागे लागला आहे हा, "

दोघ सोबत निघाले, त्याने तिला रूम वर सोडल," माया माझा विचार कर, लवकर उत्तर दे, "

तो वापस गेला.
.....

स्नेहा मोहितला फोन लावत होती, कुठे आहे मोहित तिने सेक्रेटरी पवारला फोन केला, " काय चाललय मोहितच? कुठे असतो तो दोन तीन दिवस झाले, माझा फोन घेत नाही ",

" मॅडम सर कामात आहेत," पवार.

"काय काम? कुठे आहात तुम्ही? खरी माहिती दिली तर फायदा तुमचा आहे, बोनस हवा का या महिन्यात पवार बोला, " स्नेहा.

"हो मॅडम, सर इथे कॉलेज मध्ये आले होते. "

" काय काम आहे तिकडे, कोण आहे सोबत? "

पवार सगळ सांगत होते.

" ओह माय गॉड हे आता सांगता आहात तुम्ही? त्या मुलीची माहिती द्या," स्नेहा चिडली होती.

" इकडे येवू नका मॅडम, गडबड होईल,सर चिडतील, "

" शट अप पवार, तुम्ही मला सांगाल का काय करायच ते, जेवढ सांगितल तेवढ करा, आज संध्याकाळी मला मायाला भेटायच आहे, मला तिची माहिती हवी, डु इट फास्ट,"

" मॅडम पण हे सरांना समजल तर, " पवार घाबरले होते.

"कोण सांगेल मोहितला तुम्ही का?"

"नाही मॅडम," पवार काळजीत होते , स्नेहा मॅडम रागीट आहे जरा, काय होईल.

"मग काळजी करू नका, मी करते बरोबर, माझ्यासाठी त्या मुलीला धडा शिकवण महत्वाच आहे ,मोहितला मी काही बोलू शकत नाही, तो माझ्या पासून दूर जायला नको,"

" मॅडम पण आरामात घ्या जरा, " पवार.

" ठीक आहे, " संध्याकाळी स्नेहा अनाथाश्रमात आली, " मला मायाला भेटायच आहे, "

"तुमची ओळख, "

" आम्ही कॉलेज मध्ये सोबत आहोत, मी तिची मैत्रीण आहे स्नेहा , "

मायाला खाली बोलवल, नेमक आज सविता मॅडम जागेवर नव्हत्या , माया आली, स्नेहा बघत होती हीच का ती मुलगी, गरीब वाटते आहे , ड्रेस किती साधा आहे हिचा, हिच्यात काय आहे एवढ, फक्त सुंदर आहे थोडी, मोहितला काय झालं आजकाल की त्याने माझ्या ऐवजी हिला निवडल, की त्याला फक्त हिच्या सोबत टाइम पास करायचा असेल, तरी मला धोका आहे हिच्या पासून, हिने त्याला जाळ्यात ओढल असेल तर , तशी चालाख वाटते आहे ही , या अश्या मुली पैशासाठी काहीही करतात.

" माया ना तू मला मोहित बद्दल बोलायच आहे तुझ्याशी थोड," स्नेहा रागात होती.

"या वरती, पाहिल्या मजल्यावर माझी रूम मधे आहे,"

स्नेहा बघत होती अगदी साधी बिल्डिंग आहे, शी नको इथे, "नाही नको तू बाहेर ये,"

त्या दोघी गार्डन मधे उभ्या होत्या, बाजूला खाली जाणारा छोटा जिना होता, स्नेहा सोबत तिचे बॉडी गार्ड इतर लोक होते ,

"मी मोहितची होणारी बायको आहे,"

माया घाबरली,

" तू स्वतःला समजते कोण, मोहितच्या मागे आहे का तू?"

"नाही स्नेहा, "

"मॅडम म्हण मला,"

"सॉरी मॅडम,"

" तुझ्या पेक्षा पॉश आमच्या कडे माझे नौकर आहेत, मोहितला जाळ्यात ओढण्या आधी विचार करायचा, एवढ्या कळकट मुलीत मोहितने काय बघितल? तू जादु टोणा करते ना, नाहीतर तो असा काय आकर्षित होईल तुझ्याकडे, काय आहे तुझ्यात एवढ, बोल पटकन, पैसे हवे का तुला, मला माहिती आहे तुमची टोळी असते, श्रीमंत मुलांना फसवतात तुझ्या सारख्या मुली, पण एक लक्ष्यात ठेव मोहित माझा आहे, तू काहीही केल तरी तुला तो मिळणार नाही, " तिने साटकन मायाला थोबाडीत लावली, तिला ढकलून दिल, माया जिन्यावरून घसरून बाजूला जावून पडली, पाय लचकला होता तिचा, डोक खाली आपटल, डोक्याला खोच पडली, त्यातून रक्त येत होत,

माया रडत होती, स्नेहा जवळ आली," समजल ना माया, दूर रहायच्या आमच्या पासून, हे पैसे घे, आज रात्री इथून तोंड काळ कर, " तिने मायाच्या अंगावर पैसे फेकले,

" मॅडम चला इथून पुरे झाल, नका मारू तिला, चला पटकन," पवार रिक्वेस्ट करत होते.

स्नेहा गेली,

माया तिथे बसुन रडत होती, आशा वाट बघत होती, बराच वेळ झाला माया आली नाही, ती बघायला आली, मायाच्या डोक्यातून खूप रक्त गेल होत, तिला चक्कर येत होती, चालता येत नव्हत, पाय मुरगळ होता, आशाने सगळ्यांना बोलवलं, तिने मायाला उचलून आत नेल, सविता मॅडम आल्या, त्या घाबरल्या होत्या, खूप गोंधळ झाला,

त्यांनी डॉक्टरांना बोलवलं, "जखम जास्त मोठी आहे, कपाळावर टाके टाकावे लागतील, हॉस्पिटल मधे घेवून चला यांना,"

"कोणी केल हे माया? आशा काय झाल नेमक?" सविता मॅडम चिडलेल्या होत्या.

"एक मुलगी आली होती थोड्या वेळा पूर्वी, तिच्याशी बोलायला माया बाहेर गेली होती," आशाला विशेष माहिती नव्हती.

"माया कोण आल होत?" सविता मॅडम.

"माझ खूप डोक दुखतंय, प्लीज मॅडम मला काही विचारू नका,"

"गेट वर रजिस्टर चेक कर आशा ," सविता मॅडम.

"स्नेहा म्हणून कोणी तरी होत मॅडम हा फोन नंबर," आशा माहिती देत होती.

मॅडमने चेक केल, स्नेहा मोहितची होणारी बायको होती, तीने का मारल मायाला? त्यांनी मोहितला फोन लावला, "तुमची हिम्मत कशी होते आमच्या अनाथाश्रमात येवून आम्हाला त्रास द्यायची?"

"काय झालं मॅडम, काही चुकलं का?" मोहितला काही माहिती नव्हत.

मॅडम सांगत होत्या, "स्नेहाने खूप मारल मायाला, ती अ‍ॅडमिट आहे हॉस्पिटल मध्ये, पोलिस कंप्लेंट करायची आहे आम्हाला स्नेहा विरोधात, तुमच्या विरोधात,"

"मॅडम सॉरी ऐकुन घ्या, मला काही माहिती नाही या बद्दल मी येतो तिकडे, "मोहित घाबरला होता.

" तुम्ही आमच्या पासून लांब रहा मोहित साहेब, झाला तेवढा त्रास पुरे झाला आम्ही गरीब लोक आहोत अजून नुकसान झाल त्रास दिला तुमच्या लोकांनी तर आम्हाला, "

"मॅडम प्लीज अस काही होणार नाही, मी लक्ष देईन आता, काय झालं ते तर बघू द्या मला," मोहित टेंशन मधे होता. तो लगेच अनाथाश्रमात आला

" कोण कोण आल होत सीसीटीव्ही दाखवा, " स्नेहा मॅनेजर पवार अजून बरेच लोक होते, स्नेहा मायाशी काहीतरी बोलत होती, मायाला ढकलल तिने, ओह माय गॉड, त्याने फोन लावला त्या मॅनेजरला आणि स्नेहाला पकडा आधी, मोहित हॉस्पिटल कडे निघाला.

डॉक्टरांनी मायाला डोक्याला टाके टाकले होते , खूप रक्त गेल्याने चक्कर येत होती तिला. सलाईन लावली होती.

🎭 Series Post

View all