Login

माया... भाग 6

बरोबर ऐकल तुम्ही, निघा आता इथून, स्नेहा तुझा रीपोर्ट आला माझ्या जवळ, तुझी करंटबॉय फ्रेंडची लिस्ट आहे माझ्याकडे



माया... भाग 6

©️®️शिल्पा सुतार
.........

मोहित हॉस्पिटल मधे आला, माया झोपलेली होती, बाहेर आशा सविता मॅडम बसलेल्या होत्या,

"सॉरी मॅडम माझ्या मुळे खूप त्रास झाला तुम्हाला,"

"तुम्ही इथे नव्हत यायला हव होत मोहित साहेब, प्लीज शक्य असेल तर निघा तुम्ही," सविता मॅडम.

"मॅडम मी करतो सगळ ठीक एक चान्स द्या, अस चिडू नका, प्लीज थोड ऐकुन घ्या, मला माया सोबत लग्न करायच आहे, मी प्रेम करतो तिच्यावर, खर सांगतो, त्या मुळे स्नेहा चिडली असेल," मोहित.

" हे शक्य नाही, तुम्ही किती प्रोटेक्ट करणार मायाला, ती खूप साधी आहे, तुमच्या गैरहजेरीत तिला त्रास देतील स्नेहा सारखे तुमचे नातेवाईक, तुमच्या आई बाबांच काय? त्यांना आवडेल का अशी गरीब अनाथ मुलगी? , हे बघा तुम्ही मायाच्या मागे येवू नका, तुमच्या घरचे म्हणता आहेत तिथे लग्न करा, किती लागलय तिला, मोठी खोच पडली डोक्याला, चालता येत नाही पाय मुरगळला, अश्या पद्धतीने मारता का एकाद्याला, काही करता काही झाल असत म्हणजे?" सविता मॅडम खूप चिडल्या होत्या.

"माफ करा या पुढे अस होणार नाही, मी स्वतः काळजी घेईन मायाची, तिच्या साठी बॉडी गार्ड ठेवतो, मी लग्न करणार आहे तिच्याशी विश्वास ठेवा, घरचे ऐकत नसतील तर सेपरेट राहू आम्ही," मोहित कळकळीने बोलत होता.

" उद्या बोलू आपण यावर, हॉस्पिटल मधे नको, " मॅडम शेजारी मोहित बसलेला होता, रात्री केव्हा तरी मायाला जाग आली, मॅडम आशा आत जावून भेटले.

" मी भेटू का मायाला प्लीज मॅडम, "त्यांना त्याच्या डोळ्यात खूप काळजी दिसली.

जा.

मोहित आत आला, माया बसलेली होती, आशा तिच्या जवळ होती, ती दचकली, आशा बाहेर गेली, "माया आय एम सॉरी, कस वाटतय आता,"

" ठीक आहे मी आता, तुम्ही या पुढे इथे येवू नका मोहित मी रिक्वेस्ट करते." माया घाबरली होती.

" तू त्रास करून घेवू नको माया आराम कर, आपण नंतर बोलू," मोहित बाहेर जावुन बसला, थोड्या वेळाने घरी गेला.

सकाळी तो ब्रेक फास्ट घेवून आला, सविता मॅडम आशा तुम्ही घरी जा, मी आहे इथे, मी लक्ष देईन माया कडे ,

त्या गेल्या,

मोहित आत आला, माया गप्प होती, त्यानेही काही न बोलता मायाला खायला दिल, ती घेत नव्हती, "आशा कुठे आहे? "

"सविता मॅडम आणि आशा रात्र भर जाग्या होत्या, घरी गेल्या त्या आराम करतील दुपारी येतील, तुला काही लागल तर मला सांग,"

सिस्टर येवून कपाळावर ड्रेसिंग करून गेली.

"तुम्ही जा इथून, प्लीज मोहित, तुमच्या मुळे मला काही झाल तर, मला बोलायच नाही तुमच्याशी, मला इतर ही महत्त्वाची काम आहेत, मला एकट सोडा, " माया चिडली होती.

" शांत हो माया, आराम कर," मोहित.

डॉक्टर आले मायाला तपासल," ठीक आहेत या आता, तुम्ही घरी घेवून जावू शकता यांना, त्यांनी मेडिसिन टॉनिक लिहून दिले, दोन दिवसानी या दाखवायला,"

" मॅडम कुठे आहे, कशी जावू मी वापस, काय हे, " मायाला काळजी वाटत होती, तिने फोन हातात घेतला.

" माया मी आहे ना, ठेव तो फोन, " मोहित तिची तयारी करत होत्या,

" कपडे बदल मी बाहेर आहे," तो जरा वेळाने आत आला, तीच सामान बॅग मधे भरल, खाली गाडी आली, नवीन असिस्टंट कदम सोबत होते आता.

" बिल वगैरे काय झाल ते बघा कदम, इतर सामान आणा,"

हो साहेब.

"चल माया," तिने हळूच पाय खाली टेकवला, पायातुन कळ गेली, तिने आधारासाठी एकदम मोहितचा हात धरला.

" चालता येत नाही तुला," मोहितने तिला उचलून घेतल,

"प्लीज मला खाली सोडा मी रिक्वेस्ट करते मोहित , डॉक्टर डॉक्टर प्लीज हेल्प, सोडा मला, " माया घाबरली होती.

" शांत हो माया जरा, मी काही तुला पळवून नेत नाही, चालता येत का तुला," मोहित हसत होता.

माया गप्प झाली, मोहितच्या पाठी मागे तिने हाताने धरला होत , त्याच्या जवळ छान वाटत होत, ती तिची तिची लाजली, परफ्युमचा मस्त वास येत होता, तो समोर बघून चालत होता, छान दिसतो हा, तिला तिच्या विचाराने हसू आल.

त्याने तिला कार मधे बसवल, तो स्वतः कार चालवत होता, ते अनाथाश्रमात आले, सगळ्या मुली बघत होत्या, आशा पळत आली, "चल माया,"

"थांब आशा तिला चालता येत नाही," मोहित तिला उचलून आत घेवून आला, माया लाजली होती, तिला रूम मधे झोपवल,

कदम सामान घेवून आले, बाकीच्या मुली कुजबूज करत होत्या, किती लकी आहे माया, मोहित किती श्रीमंत आणि हॅन्डसम आहे.

मोहित तिथे बसुन ऑफिसच काम करत होता,

"मोहित तुम्ही जा आता,"

"नाही, काय प्रॉब्लेम आहे मी इथे थांबलो तर, तुला काही लागल तर ,"

"एक तर ही बिल्डिंग फक्त लेडिज साठी आहे, इथे कोणाला यायला परवानगी नाही, आणि ही माझ्या सोबत आशाची ही रूम आहे," मायाच बरोबर होत, आशा केव्हा पासून बाहेर उभी होती.

" आपण तुला सेपरेट रूम घ्यायचो का? " मोहित.

" नाही प्लीज जा तुम्ही, झाली तेवढी मदत पुरे झाली थँक्स," माया.

"ठीक आहे मी येतो संध्याकाळी, काय हव तुला, काही सामान मागवायच आहे का,"

नाही,

मोहित गेला, बॉडी गार्ड खाली उभा होता, आशा आत येवून बसली, "माया मोहित साहेब खरच तुझ्याशी लग्न करणार आहेत, ते काल मॅडमला सांगत होते. "

" आशा मला नाही करायच हे लग्न, मी अजून ठरवल तस काही झाल नाही, मी काका काकूंना सोडणार नाही,"

" अग मोहित साहेब चांगले आहेत तू त्यांची मदत घेवू शकते या कामात ,"

"नको माझे प्रॉब्लेम मी सोडवेन, तू मला मदत करणार का मला ,"

हो.

" मी नकार देते आहे, मोहितला सांगते मी अवी सोबत लग्न करते आहे, पिछा तरी सुटेल, मला नको ते श्रीमंत लोक,"

" अग पण ऐक तरी चांगले आहेत मोहित सर, एकदा बोलून तर बघ," आशा समजावत होती.

" नाही, तू अवीला सांगून ठेव, " अवी आशाचा मानलेला भाऊ होता.

"एकदा नीट विचार कर माया, चांगला चान्स घालवते तू , "

" तुला माहिती आहे आशा माझ्या आयुष्याच ध्येय काय आहे ते, तरी तू अशी बोलतेस, मोहित सोबत रहाताना ते शक्य नाही,"

ठीक आहे.
....

मोहित घरी आला, आई बाबा वाट बघत होते, " कुठे होता तू रात्र भर मोहित? "

" तुम्हाला माहिती आहे ना मी कुठे होतो ते, मग का विचारता आहात," मोहित आत जात होता.

" तुझ हे जे चालल ते आम्हाला पसंत नाही, त्या अनाथ मुलीसाठी तू रात्र भर हॉस्पिटल मधे रहायची गरज नव्हती, " नंदा ताई.

"तिला मारल स्नेहाने, आपल्या मुळे झाल ते,"

"पैसे देवून मोकळा हो, त्या साठी चालत या लोकांच हे नाटक," नंदा ताई.

"नाही अस काही नाही मला आवडते माया, " मोहित बोलला.

" तुझ लग्न स्नेहा सोबत होणार आहे हे लक्ष्यात ठेव, " नंदा ताई चिडल्या होत्या.

"नाही स्नेहा एकदम लालची मुलगी आहे, तिचे खूप अफेअर सुरू आहेत अजुनही, मी माया सोबत राहणार, "

"ती मुलगी इथे येणार नाही, "नंदा ताई.

" ठीक आहे मी जातो हे घर सोडून मग, " मोहित ऐकत नव्हता.

" नाही हे चालणार नाही, तुला स्नेहाशी लग्न कराव लागेल, नाहीतर मी जिवाच बर वाईट करून घेईन," नंदा ताई.

" नंदा काय बोलतेस हे," आलोक राव चिडले होते.

"आणि माझ लग्न मायाशी झाल नाही तर मी जिवाच बर वाईट करून घेईल," तो आत निघून गेला,

नंदा ताईंनी स्नेहाला फोन लावला," काय गरज होती तुला अस करायची, मूर्ख नुसती मला सांगायच होत, आता परिस्थिती हाता बाहेर गेली आहे, भोग आपल्या कर्माचे फळ, "

स्नेहा अपसेट होती, ती हॉल मध्ये येवून बसली, तिचे आई बाबा सोबत होते,

" तुला काय गरज होती अस करायची, कशाला नाव घ्यायला गेली त्या पोरीच, आपण केल असत काही तरी, " बाबा चिडले होते.

"आता काय बाबा?"

"मी बोलतो मोहितशी,"

"बाबा मला भीती वाटते काय होईल पुढे ." स्नेहा.

"काळजी करू नकोस," त्यांनी मोहितला फोन लावला त्याने उचलला नाही, मी जावून भेटतो त्याला,

ते निघाले मोहितच्या घरी आले, स्नेहा होती सोबत, मोहित हॉल मध्ये येवून बसला,

"काय चाललय मोहित मी काय ऐकल, माया कोण आहे? "

" तुम्ही स्नेहाला विचारा तिला माहिती आहे, आणि हे अस का केल हे ही विचारा, मायाला का मारल तू स्नेहा ," मोहित चिडलेला होता.

स्नेहा पटकन पुढे आली, "मोहित आय एम सॉरी, माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर , ती मुलगी तुला जाळ्यात ओढत होती, म्हणून मी चिडले तिच्यावर,"

" तुला काय माहिती तिच्या विषयी? साधी मुलगी आहे ती, ती नाही मी आहे तिच्या मागे, मला तिच्याशी लग्न करायच आहे,"

सगळे शॉक झाले.

स्नेहा रडायला लागली, नंदा ताई, स्नेहाची आई तिच्या जवळ आल्या." मोहित काय बोलतोस तू? "

" बरोबर ऐकल तुम्ही, निघा आता इथून, स्नेहा तुझा रीपोर्ट आला माझ्या जवळ, तुझी करंटबॉय फ्रेंडची लिस्ट आहे माझ्याकडे, काल रात्री तू कोणा सोबत होती ते सांगू का प्रूफ सकट,"

ती गडबडली, सगळे एकमेकांकडे बघत होते,

"माझ्या कोणत्याही गोष्टीत तुम्ही कोणी मधे मधे करू नका मी आधीच सांगतो," मोहित बाहेर निघून गेला

"आता काय करू या आलोक राव? स्नेहाने मोठी चूक केली, " स्नेहाचे बाबा काळजीत होते.

" आम्ही काही मदत करू शकत नाही तुम्हाला," आलोक राव.

"अस कस? मी सोडणार नाही मोहितला त्याने फसवल आम्हाला,"

" काय झालं साखरपुडा झाला ना, त्या मायाने पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली तर पुढे काय करायच त्याचा विचार करा आधी, आता ती एकटी नाही मोहित आहे तिच्या बाजूने, माझ ऐकाल तर शांत रहा तुमच्या मुलीला समजवा, तो कोण बॉय फ्रेंड आहे त्याच्या सोबत लग्न लावून द्या, " अलोक राव चिडले होते.

" आम्ही पाहू काय करायच ते तुम्ही सांगू नका आम्हाला, म्हणजे तुमचा पाठींबा आहे वाटत या मोहितच्या लग्नाला,"

" नाही आम्ही विरोध केला पण तो ऐकत नाही, बघू काय करायचं ते, " आलोक राव.

ते निघाले

कार मधे स्नेहा चिडलेली होती,

" आता चिडून काय उपयोग स्नेहा, त्या मुलीला का मारल तू? आणि काय हे तुझे बॉय फ्रेंड आहेत का अजूनही, " तिची आई चिडलेली होती.