Login

माया... भाग 12

मोहित काळजीत होता, काय सुरू आहे हे, तेवढ्यात डिटेक्टिव भास्करांचा फोन आला, मोहित साहेब फार गडबड झाली आहे, माया मॅडम बद्दल महत्वाच सांगायच आहे,

माया... भाग 12

©️®️शिल्पा सुतार
.........

मोहित झोपला होता, मायाचा फोन व्हायब्रेट झाला, ती हळूच बाजूला झाली, फोन बघून दचकली, वेगळ्या ठिकाणावरचे तिचे आणी जॉनचे फोटो होते, खाली लिहिल होत "कसे वाटले फोटो," ती घाबरली, काय हे, सकाळी फोन करावा लागेल, तिला झोप येत नव्हती घाम फुटला.

सकाळी तिने टेरेस वर जावुन मिस्टर जॉन यांना फोन केला , "काय आहे हे ब्लॅकमेल प्रकरण, आपण त्या माणसाला पैसे दिले ना, मग परत का मागतो तो, आपले भरपूर फोटो आहेत त्यांच्याकडे."

"हो ना मॅडम, मला ही आलेत ते फोटो, लवकर या मॅडम आपल्याला तिकडे जाव लागेल, जमल तर बोलून बघू आज आपण त्याच्याशी, त्याने दुपार पर्यंतचा वेळ दिला आहे, " मिस्टर जॉन.

"हो मी येते अर्धा तासात, "

मोहित आज उशिरा उठला होता, आवरल होत त्याच, " माया जायच ना ऑफिसला? की दुपार नंतर जावू या, "

" मोहित काय हे, आटपा तुम्ही जा बर, " माया हसत होती,

मोहित ऑफिसला गेले की मलाही जाव लागेल मिस्टर जॉन वाट बघत असतिल.

" माया काय अस, प्लीज दोन तास, माझ्या मनाच नाही करणार का," मोहित तिच्या मागे मागे करत होता.

मायाला टेंशन आल काय कराव," मोहित महत्वाच काम आहे, आज सुट्टी घेता येणार नाही, "

मोहितचा फोन वाजत होता, "सर ते फॉरेनचे क्लायंट वाट बघत आहेत,"

"ओह सॉरी मी विसरलो होतो येतो मी अर्धा तासात, "

" माया आपल्याला निघाव लागेल लगेच, चल आज सोबत जावू ऑफिस मधे,"

"तुम्ही जा मोहित, मी आशाकडे जाते आहे जरा वेळ, तिला बर नाही बघते थोड डॉक्टरकडे नेते तिला, "

" ठीक आहे," मोहित गेला.

माया निघाली, मिस्टर जॉन भेटले, थोड पुढे गेले तर ब्लॅक मेल करणार्‍या मुलाचा फोन आला, "मला पैसे देणार का आज? की फोटो पुढे पाठवु,"

"निघालो आहोत आम्ही येतो अर्ध्या तासात, " मिस्टर जॉन.

त्याने एक लोकेशन दिलं, तिथे पैसे ठेवून देऊ वापस जा, पोलीस वगैरे सोबत घेऊन आले तर माझ्याहून कोणी वाईट नाही, मोहित साहेबांना सगळे रिपोर्ट जातील आणि उद्याच्या पेपरमध्ये पण बातमी येईल,"

" आम्ही असं काही करणार नाही तुम्ही पण जरा शांत रहा, तुम्ही सांगता आहात तिथे पैसे ठेवतो, कोणी नाही आमच्या सोबत," मिस्टर जॉन.

माया आणि मिस्टर जॉन त्याने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले, "त्या समोरच्या टॉयलेट मधे हिरव्या डस्ट ब्रेन मधे पैसे ठेवायचे आहेत पन्नास हजार,"

"नाही मिस्टर जॉन त्या माणसाला भेटायला बोलवा, मी असे पैसे द्यायला तयार नाही, काहीही होवु दे," माया.

" मी बघतो सांगून, पण आपल्याला अस करता येणार नाही, तो चालला गेला आणि त्याने फोटो लिक केले तर,"

ठीक आहे.

मिस्टर जॉन पैसे घेवुन समोर गेले, त्यांनी समोर पैसे ठेवले ते तिथून निघाले, माया उभी होती तिथे आले," आपण याच्या मागे जायचं का बघायचं का कोण आहे तो? "

"हो चालेल, तुम्ही वरती थांबा मी खाली थांबते," माया.

" कार थोडी बाजूला लावा मॅडम,"

ब्लॅकमेल करणारा मुलगा पैसे घ्यायला आला, त्याने चेहरा झाकलेला होता, तो जसा डस्टबीन जवळ आल तस मिस्टर जॉनने त्याला पकडल, तो त्यांना ढकलून पुढे पळायला लागला, त्याच्या हातात पैशाची बॅग होती, तो पटकन त्याच्या बाइक वर बसला.

माया पटकन पुढे गेली," कोण आहेस तू? एक मिनिट थांब, बोल तरी काय हवं आहे तुला ते? मी तुला अजून पैसे देते, थांब, सांग कोणी सांगितलं आहे तुला हे काम करायला,"

त्याने काहीही ऐकलं नाही, मायाला ढकलून दिल, बाईक घेऊन तो जोरात निघाला, मिस्टर जॉन पळत खाली आले, "काय करूया गाठता येईल का त्याला आपल्याला, "

ते दोघं त्याच्या मागे निघाले, बराच वेळ पाठलाग सुरू होता,

शेवटी तो मनुष्य एका शेतातल्या जुन्या घरात घुसला, बाहेर गाडी लावून मिस्टर जॉन आणि माया पळत आत मध्ये गेले, आत कोणीच नव्हतं, "मॅडम सावध रहा, आपण इथे यायला नव्हत पाहिजे, विचित्र वाटत आहे इथे, "

" कुठे गेला तो मुलगा, पूर्ण घर रिकामा होतं, चला मिस्टर जॉन वापस जावू आपण," माया पण घाबरली होती.

तेवढ्यात मागच्या बाजूने गोठ्यासारख्या ठिकाणाहून कोणाचातरी ओरडण्याचा आवाज आला, जॉन आणि माया तिकडे पळत गेले, कोणीतरी त्या मुलाच्या पोटात चाकू खुपसला होता, त्याच्या पोटातन खूप रक्त येत होतं आणि त्याला खूप त्रास होत होता, दोघ खूप घाबरले, कोणी केल हे, कोण आहे बापरे.

" मला वाचवा असं ओरडत होता तो,"

"कोणासाठी हे काम करत होता बोल पटकन," मिस्टर जॉन त्या मुलाला विचारात होते.

"हे विचारायची वेळ नाही मिस्टर जॉन, त्याला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे," माया घाबरली होती. रक्त बघून तिला एकदम उलटी येत होती.

"नाही माया मॅडम, चला लवकर येथून, याचं काही खरं नाही त्याला तीन चार ठिकाणी चाकू लागला आहे, तो पाच दहा मिनिटाच्या वरती जिवंत राहणार नाही, सांग तुला कोणी हे काम करायला सांगितलं? "

तो ब्लॅकमेल करणारा बेशुद्ध पडला आणि लगेच वारला मिस्टर जॉन त्याची नाडी तपासत होते, "चला मॅडम,"

"काय झालं मिस्टर जॉन," मायाला समजल नाही तो वारला.

" काही नाही चला पटकन इथून, "

माया येतच नव्हती," त्याला डॉक्टर कडे नेवु, "

नाही मॅडम, मिस्टर जॉन तिला ओढत घेऊन गेले, गाडीत बसवलं, ते आता गाडी चालवत होते,

" काय झालं त्याला? " मायाच्या डोळ्यात पाणी होतं.

" काही नाही खून झाला त्याचा, खूप मोठी चुकी झाली, आपण त्याच्या मागे नव्हता यायला पाहिजे, आता माहिती नाही काय होईल, तुम्ही घरी जा आणि मिस्टर मोहित यांना सगळं सत्य सांगा,"

" नाही सांगता येणार आपलं काम झालं नाही," माया.

" सांगावच लागेल माया मॅडम, आता काही इलाज नाही नाहीतर खूप मोठ्या संकटात आपण फसू आणि मोहित साहेबांचा गैरसमज होईल आपल्याला कोणीही यातून बाहेर काढणार नाही, बाकीच्यांकडून समजण्यापेक्षा तुम्ही पटकन सांगा त्यांना, " मिस्टर जॉन.

"आता फोन करू का? "

"हो करा,"

मायाने फोन बाहेर काढला, मोहितला फोन लावला, त्याने फोन उचलला नाही, तिने परत पाच मिनिटांनी फोन लावला,

"एनीथिंग अर्जंट माया, मी खूप मोठ्या मीटिंगमध्ये आहे तुला माहिती आहे ना, आज फॉरेनची क्लाइंट आले आहेत, थोड्या वेळाने बोलतो "

" मोहित मला महत्त्वाचं बोलायचं आहे,"

" आता नाही माया संध्याकाळी येतो लवकर घरी,"

" मोहित ऐकून तरी घ्या, "त्याने फोन ठेवून दिला.

" काय झालं मॅडम? " मिस्टर जॉन.

" मोहित बिझी आहेत त्यांनी काही ऐकून घेतलं नाही आता काय?"

"खुप चुकीच झाल हे, तुम्ही मोहित साहेब घरी आले की लगेच सांगा त्यांना, "

मायाला घरी यायला खूप उशीर झाला, मीनु वाट बघुन कंटाळली, तिने मोहितला फोन केला, त्याची नुकतीच मीटिंग संपली होती," पप्पा मला मम्मी पाहिजे,"

" मम्मी आली नाही आज ऑफिस मधे, काय झालं मम्मी घरी नाही का? "

" नाही" मीनु रडत होती.

नंदा ताईंनी फोन घेतला, "मोहित काय सुरू आहे मायाच? कुठे आहे ती, मीनु ऐकत नाही, रडते आहे. "

"आई मी बघतो, तू काळजी करू नकोस, येतो मी लगेच घरी,"

लगेच ये.

तसं त्याला संध्याकाळी गेस्टला घेऊन डिनरला जायचं होतं, पण त्याने विचार केला आधी घरी जाऊन मायाचं काय म्हणणं आहे ते ऐकू आणि मग पुढे जावु.

मोहितला आठवलं दुपारी मायाचा फोन आला होता, काय झालं असेल? त्याने मायाला फोन केला,

मायाने फोन उचलला, "मोहित कुठे आहात तुम्ही? मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे,"

" हो घरीच येतो आहे,"

"नाही आता ऐका,"

"माया कुठे आहेस तू?"

"घरा जवळ आहे,"

"घरी जा आधी, मीनु रडते आहे तिला गप्प कर मी येतोच आहे,"

मायाचा नाईलाज झाला, ती घरी आली, नंदा ताई खूप चिडल्या होत्या, मीनु रडत होती, ती तिला समजावत होती,

मोहित काळजीत होता, काय सुरू आहे हे, तेवढ्यात डिटेक्टिव भास्करांचा फोन आला, मोहित साहेब फार गडबड झाली आहे, माया मॅडम बद्दल महत्वाच सांगायच आहे,

" काय झालं, कुठे होती आज माया," मोहित काळजीत होता.

" मॅडम एका साहेबां सोबत होत्या सकाळ पासुन, मी मागे होतो त्यांच्या,"

"कोण आहे तो,"

"जॉन म्हणून, डिटेक्टिव जॉन,"

"का पण, काय चाललय हे? " मोहित चिडला.

" माहिती नाही सर, आता थोडी माहिती मिळाली आहे, एक तासात क्लिअर होईल मग सांगतो, साहेब मॅडम जिथे होत्या तिथे एक मर्डर झाला आहे, थोडी गडबड आहे, "

" ओह माय गॉड त्याचा मायाशी काय संबंध? "

"ज्या माणसाचा खून झाला तो मॅडम ला त्रास देत होता, "

का?

"ते समजल नाही अजून, अर्धा तास द्या, चौकशी करतो आहे, लगेच मेसेज कींवा फोन करतो, "

मोहित टेंशन मधे होता,

पाच मिनिटात तो घरी आला, " माया... माया.... खूप चिडला होता तो, "

माया आत होती, मीनु तिच्या जवळ होती, नंदा ताई समोर बसलेल्या होत्या , मोहित बेडरूम मध्ये आला, मीनुला त्याने माया जवळून उचलून घेतल, बाहेर येवून नंदा ताईं कडे दिल.

मीनु त्याच्या मागे येत होती,

"मीनु तू आजी सोबत थांब, आई मी आलो, "मोहित रागाने आत आला, माया रडलेली वाटत होती, नुसती बसलेली होती ती, ती पुढे आली तिने मोहितला मिठी मारली, ती रडत होती,

"मोहित मला तुम्हाला खूप महत्वाच सांगायच आहे, प्रॉमीस करा तुम्ही मला सपोर्ट कराल, माझ्या वर विश्वास ठेवाल, "

" कुठे होतीस तू माया? काय झाल? तू शांत हो आधी, काय गोंधळ आहे हे मला नीट सांग,"

" मोहित आय आय एम सॉरी मी तुम्हाला न सांगता थोडं काम करत होती, आता एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, "

" काकांचा प्रॉब्लेम आहे ना? मी तुला आधीच सांगितलं होतं असं करू नको, संकटात फसशील,"

" मोहित मला बोलायला चान्स द्या ना, मला त्यातून एक नवीन माहिती समजली आहे खूप महत्त्वाची," माया रिक्वेस्ट करत होती.

" मला काहीही ऐकुन घ्यायच नाही माया, "मोहित खूप रागात होता.

🎭 Series Post

View all