Login

माया... भाग 15 अंतिम

पिंटू आणि मायाने काका काकू विरोधात प्रॉपर्टीचे ओरिजनल पेपर लपवले, आई बाबांचा एक्सीडेंट केला, यांच्या पासून जिवाला धोका आहे, असे चार्जेस लावले


माया... भाग 15 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.........

पोलिसांनी चौकशी केली, स्नेहा पळून गेलेली होती, पोलीस वापस आले, "स्नेहा सापडेपर्यंत माया मॅडमला सोडता येणार नाही,"

"अस कस इंस्पेक्टर?" मोहित.

"हो अस असत स्नेहाची चौकशी होईल, मग समजेल खर काय ते, तुम्ही घरी जा मिस्टर मोहित, स्नेहाच्या मागे पोलीस गेलेले आहेत, माया मॅडमला अजून सोडता येणार नाही,"

माया तिथेच बेंचवर बसली होती, मिस्टर जॉन तिच्या सोबत होते,

" मी दोन मिनिटं भेटू का मायाला? " मोहित.

हो.

तो माया जवळ आला, माया पटकन उठून त्याला भेटली, ती रडत होती,

" अजिबात काळजी करू नको माया मी आहे ना, मी घरी जातो थोडा वेळ, आई बाबांना सगळ सांगतो, लगेच येतो तुझ्या जवळ, ते ही काळजीत असतिल."

" ठीक आहे, मीनुची काळजी घ्या, मोहित एक विचारायच होत, मला घरी येता येईल ना," तिला तीच काळजी होती.

"हो माया, स्नेहा सापडली की सोडतील ते,"

" तस नाही तुम्ही ते काल बोलले होते घरातून निघून जा, मी तुमच्या शिवाय मीनु शिवाय नाही राहू शकत." माया.

मोहितला कस तरी झाल, "सॉरी माया मी रागात होतो तेव्हा , सगळ तुझ आहे मी मीनु आपल घर, यापुढे अस होणार नाही, काळजी करायची नाही." तो मिस्टर जॉन कडे आला," मिस्टर जॉन थँक्स, थोड लक्ष द्या माया कडे. मी येतो थोड्या वेळात. "

" हो मी इथे आहे साहेब मॅडम सोबत, अजून एक महत्वाच काम बाकी आहे आपल, काका काकूंना अटक करायची आहे, मॅडम आणि पिंटूच्या नावावर असलेले ओरीजनल प्रोपर्टी पेपर त्यांच्या कडून घ्यावे लागतील,"

"हो सगळ करू आपण आधी त्या स्नेहाला अटक झाली पाहिजे, म्हणजे पोलिस मायाला सोडतील, "मोहित.

मोहित घरी आला, आई बाबा वाट बघत होते, मीनु झोपली होती, त्याने सगळ सांगितल, माया निर्दोष आहे हे ऐकून ते खुश होते, स्नेहा अजूनही त्रास देते आहे आपल्याला, कठिण आहे हे सगळं, मायाच्या फॅमिली बद्दल ऐकुन त्यांना वाईट वाटल, बर झाल तिचा भाऊ भेटला.

"माया का नाही आली आता घरी? " बाबा.

" थोडी चौकशी बाकी आहे उद्या सोडतील बहुतेक,
स्नेहा सापडत नाही ती पळून गेली आहे, मीनु ठीक आहे ना," मोहित.

"रडत होती झोपली आता, उद्या माहिती नाही काय करेल," नंदा ताई.

"तिला सांग की माया येणार आहे दुपारी,"

मोहित पोलिस स्टेशन मधे आला, आता तो माया आणि मिस्टर जॉन सोबत होता, मायाला आता बर वाटत होत, सकाळ झाली, "मोहित तुम्ही घरी जा जरा वेळ, आराम करा मग या,"

"नाही माया मी तुला सोडून कुठे जाणार नाही, "

"मिनू उठली असेल आपण दोघेही घरी नाही हे बघून ती घाबरेल, तुम्ही प्लीज घरी जा मिनूला तयार करून शाळेत पाठवून द्या," माया.

" ठीक आहे मी घरी जाऊन येतो काही वाटलं तर लगेच फोन कर, "

"माझा फोन पोलिसांनी जमा करून घेतला आहे माझ्याकडे फोन नाही," माया.

"ठीक आहे मी इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो, " मोहित आत मध्ये गेला," किती वेळ आहे अजून, मायाला केव्हा सोडणार? सापडली का स्नेहा? "

"हो ते लोक एका ठिकाणी आहे असं समजलं आहे, आमचे लोक जात आहे तिकडे, लवकरच अटक होईल स्नेहाला आणि ज्याने खून केला आहे त्या मुलाला ही," इंस्पेक्टर बिझी होते.

"मायाच्या काका काकूं विरुद्ध कंप्लेंट केली होती, तो वारंट निघाला का? त्यांना केव्हा अटक होईल? त्यांच्या पासून धोका आहे, " मोहित.

" आज दुपारपर्यंत होईल ती अटक, "

"ओरिजनल प्रॉपर्टीचे पेपर त्यांना जमा करायला सांगा, "

" हो ते काम बहुतेक कोर्टात होईल. तस तुम्ही तुमच्या वकीलाशी बोलून घ्या, "

" मी जरा वेळ घरी जाऊन येतो, माया आहे इथे, "

ठीक आहे.

मोहित घरी आला, मीनु उठलेली होती, ती खूप प्रश्न विचारत होती," मम्मी कुठे आहे? काय झालं ती इकडे येणार नाही का आता? "

"अस काही नाही बेटा, तुझी मम्मी कामानिमित्त बाहेर गेलेली आहे तू स्कूलमधुन आली की येईल तुझी मम्मी,"

त्याने मीनूला तयार केलं, शाळेत सोडून दिलं, तो परत पोलीस स्टेशनला येऊन बसला येताना, त्याने माया आणि मिस्टर जॉन साठी चहा नाष्टा आणला होता.

"मिस्टर जॉन तुम्ही घरी जाऊ शकता, " पोलीस इन्स्पेक्टर.

माया आणि मोहित इंस्पेक्टर कडे बघत होते," आमच काय? "

"स्नेहाला आणि त्या मुलाला पकडला आहे, दोन तास तुम्हाला थांबावं लागेल अजून मोहित साहेब, चौकशी होईल थोडी, त्यानंतर उद्या पासून जेव्हा बोलवलं तेव्हा यावं लागेल, "इंस्पेक्टर.

मिस्टर जॉन जरा वेळ घरी जावून आले.

दुपारी स्नेहा आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं, स्नेहाच्या घरचे सोबत होते, खूपच गोंधळ झाला, ते लोक केस मागे घेण्यासाठी दबाव वाढवत होते, सगळा गुन्हा त्या खून केलेल्या मुलाच्या माथी मारत होते,

मोहितने स्नेहावर केस केली होती की ही आमच्या फॅमिलीच्या मागे आहे, थोडी का होईना शिक्षा तिला व्हायलाच पाहिजे, तीच खरी मस्टर माईंड आहे, त्यामुळे तिची लगेच सुटका झाली नाही.

मायाला घरी जायला सांगितलं.

माया, मिस्टर जॉन, मोहित बाहेर आले.

"आपली केस अजून अर्धवटच आहे माया मॅडम, काका काकूंना अटक झाली नाही अजून, थोड अलर्ट रहा. " मिस्टर जॉन.

"हो आता तिकडे लक्ष द्याव लागेल," मोहित.

" पिंटू कुठे आहे त्याला भेटायला जाऊ," माया.

पिंटू मिस्टर भास्कर यांच्या ऑफिस मध्ये होता, सगळे तिकडे गेले, मायाने पळत जाऊन त्याला मिठी मारली, दोघेजण रडत होते,

" मिळाला आहे आता पिंटू, काळजी करायची नाही माया, रडू नकोस," मोहित.

" पिंटू हे आहेत मोहित, तुझे जिजाजी, " माया.

" हो माया ताई खूप चांगले आहेत हे, मला काल रात्री खुप वेळा फोन केला त्यांनी, या ऑफिस मधे बसायला सांगितल होत," पिंटू.

" घरी जाण्या आधी आपल्याला परत एकदा पोलीस स्टेशनला जाव लागेल," वकील.

ते सगळे सोबत होते,

पिंटू आणि मायाने काका काकू विरोधात प्रॉपर्टीचे ओरिजनल पेपर लपवले, आई बाबांचा एक्सीडेंट केला, यांच्या पासून जिवाला धोका आहे, असे चार्जेस लावले, ते ओरिजनल पेपर त्यांच्याकडून घेऊन आम्हाला द्या असा कोर्टात अर्ज सुद्धा केला.

सगळे बाहेर आले,

"माहिती नाही पण किती शिक्षा होईल त्यांना," माया.

"आता नाही त्रास देणार ते जेल मध्ये बरेच वर्ष जातील त्यांचे, " वकील.

" मिनू आली असेल शाळेतून, चल माया आता घरी जावं लागेल," मोहित.

माया मोहित कडे बघत होती, "मोहित एक मिनिट मला बोलायचं आहे तुमच्याशी,"

ते दोघे बाजूला गेले, "पिंटूला आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो का आपण? त्याचं माझ्याशिवाय कोणी नाही,"

"हे काय विचारणं झालं का माया, ते काय माझ्या एकट्याचा घर आहे का आपल्या कडे नाही तर कुठे राहील पिंटू."

"मिस्टर जॉन खूप धन्यवाद, मी येते उद्या ऑफिस मधे तुमची फी द्यायला,"

"हो काका काकूंना अटक झाली की करू हिशोब, अजून नाही, " मिस्टर जॉन.

सगळे घरी आले, मिनू मायाला येऊन भेटली," कुठे गेली होती मम्मी तू कालपासून,"

" यापुढे असं होणार नाही, हे बघ कोण आल आहे पिंटू मामा, आई बाबा माझा भाऊ, तो इथे राहील आपल्या कडे, चालेल ना? "

" काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. " पिंटू ओळख करून घेत होता.

माया आत बेडरूम मधे आली, मोहित तिच्या मागे आला, त्याने मायाला मोठी मारली, "रागावली आहेस का तू माझ्या वर माया? "

" नाही मोहित उलट मीच चुकले या पुढे तुमच्या पासून कोणतीच गोष्ट मी लपवून ठेवणार नाही, "

"मी पण तुझ्याशी मोकळ बोलेल तुझ काय म्हणणं ते ऐकुन घेईल," मोहित माया इमोशनल झाले होते, खूप मोठ संकट होत हे माया.

हो ना.

मीनु आत आली, दोघ बाजूला झाले, "मम्मी टीचरने खूप स्टडी दिला आहे, तू काल पासुन घरी नाही , मला स्टडी केला नाही तर पनिशमेंट होईल ना स्कूल मधे, "

"अरे बापरे चल आण तुझे बुक्स करून टाकू स्टडी,"

जेवताना सगळे खुश होते, पिंटूला त्याची रूम आवडली होती. तो माया बराच वेळ बोलत होते,

दुसर्‍या दिवशी आशा भेटायला आली होती, ती मोहित काय म्हणतील म्हणून घाबरत होती, बर झाल पण हे संकट टळल.

कोर्टात केस उभी राहिली, स्नेहाला खून केल्याची सुपारी दिल्या बद्दल शिक्षा झाली, काका काकूंना चांगलीच शिक्षा झाली, माया पिंटूला त्यांची जमीन मिळाली त्यावर असलेल घर मिळाल, त्यांनी ते सगळ ताब्यात घेतल, मोठी प्रॉपर्टी होती, मोहितने त्याला कंपाऊंड बांधल, तिथे सांभाळायला एक कुटुंब ठेवल, वॉचमन होता, आता त्या जागेवर ते शेती करत होते,

पिंटू कॉलेजला होता त्याची इकडे अ‍ॅडमिशन केली होती, माया आता खूप खुश होती,

मोहित ऑफिस हून आला, जेवण झालं, माया मोहित त्यांच्या रूम मधे होते, व्हाइट कलरची सुंदर नायटी मायाने घातली होती, मोहितची नजर तिच्या वर होती हे तिने आरशातून बघितल होत. माया ही आता लाजली होती.

"आटोप माया, किती आवरत बसते तू रात्री, खूप सुंदर आहेस तू, चल इकडे ये बर,"

"पाच मिनिट मोहित,"

" आता बर वाटत ना तुला माया? की अजून काही आहे तुझ्या मनात," मोहित मुद्दाम तिला चिडवत होता.

"नाही मोहित आता काही प्रॉब्लेम नाही, " माया.

"अजून तुला काही काम असेल तर मला सांगायच, आपण दोघ मिळून करू, मी आहे तुझ्या सोबत," मोहित.

"हो, पण मला अजून काही काम नाही ,"

"तुला नाही पण मला आहे एक काम,"

काय?

"फिरायला जायच माझ्या बायको सोबत,"

माया कॉटवर येवून बसली.

कुठे?

" तू म्हणशील तिथे, बूकिंगच बघून घे, "

हो.

" आता काय मग माया? मीनु झोपली आहे , माझा काही विचार आहे की नाही, "

माया नेहमी प्रमाणे खूप छान लाजली . मोहित तिच्या कडे बघत होता, त्याने पुढे होवुन तिला जवळ घेतल.

समाप्त.