Login

मायाजाल भाग 3

एक डॅशिंग पोलीस ऑफिस,तेवढीच कणखर त्याची टीम विरुद्ध एक सिरीयल किलर.
मागील भागात आणखी एक खून झालेला पाहून शरद आणि टीम चक्रावली. यामागे कोण असेल?नक्की हेतू काय असेल या सगळ्यामगे?दोन्ही खून करणारी व्यक्ती एकच असेल का?या सर्व प्रश्नांच्या उत्तरासोबत उलगडत जाईल मायाजाल..

ह्या खुनातसुद्धा हाच हेतू असेल का?त्याच्या रूम मेट्स ना बोलावून घेतलं होतं.त्या चौकशीत काय समोर येईल यावर पुढची दिशा ठरवता येईल.विचार करतच शरद पोलीस स्टेशनला पोहचला.शेफाली आणि समीर आधीच आले होते.कदम चहा घेऊन आत आले,"साहेब,चहापाणी करून घ्या".शरद शेफालीकडे वळत म्हणाला,"तू कॉल डिटेल्स काढलेस का?श्रेयसला शेवटचा फोन कोणाचा होता?"शेफालीने कागद समोर ठेवला,"यात काहीही संशयास्पद आढळत नाहीय सर,शिवाय भावेश शहा गेले महिनाभर देशाबाहेर आहे.त्याचे कॉल नियमित येत होते.ही चर्चा सुरू असताना क्षुधांशु चे मित्र हजर झाले.सगळे प्रचंड घाबरलेले.फिल्म इंडस्ट्रीत काम करणारे ते सगळे तरुण,शरदला त्यांच्याकडे पाहून कीव येत होती आणि वाईट सुद्धा वाटत होतं.किती स्वप्न घेऊन आले असतील मुंबईत?काय काय सोसलं असेल यांनी.सगळे विचार मागे सारत शरदने बोलायला सुरुवात केली,"तुमच्या मित्राच कोणाशी भांडण वगैरे?तेव्हा ते म्हणाले,"सर,जेमतेम पोट भरणारी माणस आम्ही,कोणाशी वैर घ्यायला वेळ आणि ताकद हवी ना?मग त्याला का मारलं गेलं?मागील काही दिवसात त्याने काही खास सांगितलं होतं का? तेव्हा त्यातील एकजण बोलू लागला,"सर,क्षुधांशु खूप स्वप्न घेऊन आलेला,देखणा चेहरा आणि अभिनय आपल्याला सगळं सहज मिळवून देईल असा भाबडा समज होता त्याचा.हळूहळू या इंडस्ट्रीतील सगळं दिसायला,समजायला लागलं पण...तोवर परतीचा मार्ग बंद झाला सर.तो कामाचं जास्त काही बोलत नसे सर..एवढ्यात दुसरा एकजण बोलला,"आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती दर्शन पटेल देऊ शकेल.हे दोघे एकाच एजन्सीत काम करत आणि खास मित्र होते..यांना जायला सांगा कदम.माझ्या परवानगीशिवाय शहर सोडून जायचं नाही.
दर्शन पटेल??समीर कुंडली काढ याची.एवढ्यात शेफालीने मॅसेज केला,"मासा तलावात आला".शरद हसला.कदम गाडी काढा,पुढच्या अर्ध्या तासात कदम,शेफाली आणि शरद बाहेर पडले.भावेश शहा,बिग बुल नावाने प्रसिद्ध होता.एवढ्या सहज दाद देईल का तो?कदमांनी शंका व्यक्त केली.शेफाली आणि शरद फक्त हसले.भावेशच्या ऑफिसवर शरद आणि शेफालीने श्रेया बद्दल ब्र सुद्धा न काढता चौकशी चालू केली.इन्कम टॅक्स कडून आलोय ही मात्रा लागू झाली.तो बोलत असताना शेफालीने कॉल डिटेल समोर मांडले,"श्रेयस पाटील या नंबरवर तुम्ही रोज बोलत होता?नाव ऐकताच भावेश सहज हसत म्हणाला,"तो सेक्रेटरी आहे माझा".आहे??मग कुठेय?शेफाली हसली.आज आला नाहीय का?आता मात्र भावेश फसला होता.मॅडम गेले चार दिवस त्याचा फोन लागत नाहीय.बहुतेक तो बाहेरगावी असावा!शरद म्हणाला,"बहुतेक?तुमचा सेक्रेटरी तुम्हाला सांगून जात नाही का?आता भावेश अडकला होता.शरदने सरळ ओळख सांगितली,"तुम्ही सहकार्य कराल तर तुमचं नाव मीडियात येणार नाही".मी सगळं सांगतो साहेब पण..इथे नको.ठीक आहे.मी बोलावले की या!सर्व माहिती सकट. शरद आणि शेफाली बाहेर पडल्यावर भावेशने घाम पुसला आणि पहिला फोन बॉबीला लावला,"बॉबी प्लिज मला भेट".पलीकडून फोन कट झाला.

इकडे समीर दर्शन पटेलच्या मागावर होता.दर्शन एक नवीन मॉडेल असूनसुद्धा अतिशय उंची राहणीमान पाहून समीरला शंका आलीच.समीरने त्याचा पाठलाग सुरूच ठेवला.रात्र झाली आणि दर्शनची कार शहराबाहेर पडली.पनवेल बाहेर एका आलिशान बार बाहेर गाडी थांबली.बाहेर पडलेल्या दर्शनकडे समीर पहातच राहिला.गाडीतच चेंज करून तो बाहेर आला होता.अतिशय उत्तान कपडे,मेकअप ...समीर अर्ध्या तासाने आत गेला.दहा ते बारा तरुण पोर नाचत होती त्यांच्यावर पैसे फेकले जात होते.समीर दर्शनकडे पहात असलेला पाहून एक वेटर जवळ आला,"सर कुछ चाहीये?समीर हसला.वेटर परत जवळ जात म्हणाला,"उसका थोडा ज्यादा लगेगा!समीरने हळूच मान डोलावली.वेटरने आकडा समोर ठेवला.समीरने पैसे काढून दिले.हळूच एक चावी दिली.मेरे पिछे आइये। समीर आत गेला.एकदम उंची खोली होती.समीर बसला.दहा मिनिटांनी दर्शन आत आला.समोर बसला,"सरळ कपडे उतरवायला सुरुवात केली,"क्या क्या करोगे?समीर त्याच्या जवळ गेला.त्याला म्हणाला,"इधर मजा नही आयेगा। दुसरी जघह जाने का ज्यादा पैसा लगेगा।दोघे बाहेर पडले.समीरने त्याला गाडीत बसवले आणि सरळ गाडी मुंबईकडे वळवली.गाडीत दर्शन गप्प होता. गाडी एका ठिकाणी थांबली.समीर उतरला.दर्शन उतरताच समीरने रिव्हॉल्वर लावलं,"अंदर चलो।आत जाताच समीरने फाडकन कानाखाली वाजवली,"मुंबई पोलीस,क्राईम ब्रँच!"दर्शन घाबरला,"साहेब,पोटासाठी करावं लागतं सगळं,या मुंबईत जगणार कस?घरी पैसे कसे पाठवणार?समीर हसला,"क्षुधांशुला ओळखतो? दर्शन रडायला लागला,"सर,त्याला मी नाही मारलं सर..खूप प्रामाणिक आणि मेहनती होता..पण सर पैशाच सोंग आणता येत नाही.अगदीच नाईलाज झाला तरच तो यायचा माझ्यासोबत..त्यादिवशी असाच एकजण त्याला बाहेर घेऊन गेला आणि.....सर मला खरच माहीत नाही बाकी काहीच..समीरने त्याला परत धमकावले,"तुझा नंबर मला देऊन ठेव आणि हो मी सांगेल तेव्हा चौकशीला यायचं..तो बार कोणाचा आहे?मालक कोण आहे?चालवतो कोण?सगळे लिहून दयायचे समजलं.सगळे लिहून घेतल्यावर दोघे बाहेर पडले,"आता तू घरी जा".समीर असे म्हणून त्याला सोडत होता एवढ्यात......एक मुलगा जिवाच्या आकांताने पळत येत होता .तो जवळजवळ समीर वर आदळला.समीरने त्याला पकडलं.तो प्रचंड घाबरला होता.समीरने त्याला पाणी दिल.दर्शनाला म्हणाला,"याला चहा आण!"तो मुलगा शांत झाल्यावर समीरने त्याची ओळख दिली.त्याने मोबाईल काढला.सर हे बघा माझ्या मित्राच्या मोबाईलवरून मला sos चा मॅसेज आलाय.त्यानंतर मी खूपदा फोन केला पण....पण काय?फोन बंद लागतोय.तो कुठे गेला होता?समीरचा प्रश्न ऐकून तो थोडा थांबला,"सर ,ते....बोल लवकर.मढ मध्ये एकाला भेटायला गेलेला.का?कशाला?सगळं सांगतो पण ..चल लवकर गाडीत बस..
इन्स्पेक्टर समीरची कार वेगाने धावू लागली..कोण असेल हा मुलगा??तिसरा बळी जाईल?की समीर वेळेवर पोहचून त्याला वाचवेल???वाचत रहा मायाजाल...
0

🎭 Series Post

View all