समीर आणि प्रसाद त्या भव्य फोटो स्टुडिओ मध्ये येऊन पोहोचले. The sudhirs studio.... पाहूया इथे काही उलगडतय का?असा विचार करत समीर आत आला.रिसेप्शन वर एक युवक होता. बायकी हालचाली करत त्याने विचारलं,"कोण हवंय आपल्याला?पोर्टपोलिओ बनवायचाय का??समीर हसत म्हणाला,"आम्हाला सुधीर सरांना भेटायचं आहे.ओह,तुमची काही भेट ठरली असेल तर माफ करा.सर आज भेटणार नाहीत.समीर म्हणाला,"कुठे बाहेर गेलेत का? ते मी तुम्हाला सांगू शकत नाही.तुम्ही नंतर या.मग मात्र समीरने पोलिसी खाक्या दाखवला..आता बोला कुठेय तुमचे सर.तो तरुण घाबरला,"एक मिनिटं ह इन्स्पेक्टर मी त्यांच्या सेक्रेटरीला विचारतो.पालिकडून फोन उचलला गेला.सेक्रेटरी पोहोची चीज होता.सुधीर कामानिमित्त बाहेर गेला आहे,निरोप असेल तर माझ्याकडे द्या ना.आता समीर बिथरला,"शशांक मर्डर केसबाबत बोलायचंय..आता सांगा लवकर कुठेय सुधीर.हे ऐकूनच सेक्रेटरीचा स्वर बदलला,"साहेब मी दहा मिनिटात पोहोचतोय सगळे डिटेल्स देतो.समीर तोवर ऑफिसचे निरीक्षण करत होता.विशेष नजरेत येण्यासारखी गोष्ट म्हणजे पुरुष मॉडेल व त्यांचे सेमी न्यूड फोटो.समीरला अंदाज आला होता.प्रदीप हळूच म्हणाला,"सर हे सगळं म्हणजे हिमनगाचे टोक आहे".खरा व्यवसाय वेगळाच आहे.हे सगळं बोलत असतानाच बरोबर दहा मिनिटात सेक्रेटरी हजर झाला.अगदी मधाळ आवाजात बोलणे सुरू केले,"नमस्कार साहेब,आपण बोलावलं असत तर सुधीर सर स्वतः आले असते."समीर हसत म्हणाला,"एवढ्या मोठ्या बॉलिवूड फोटोग्राफरला बोलावून उगीच मीडियाला खाद्य नको ना."सेक्रेटरी समीरला आत घेऊन गेला,"आता बोला सर.शशांक आणि सुधीर एकत्र काम करत होते.मला त्याबाबत सुधीरशी बोलायचे आहे.सेक्रेटरी विनंती करत म्हणाला," पूर्णपणे व्यावसायिक संबंध होत".समीर नजरेत पहात बोलला,"ते मी ठरवेल,तुम्ही फक्त सुधीरला लवकरात लवकर चौकशीला पाठवा.असे म्हणत समीर आणि पाठोपाठ प्रसाद बाहेर पडले.
इकडे विजय राजे स्वतः चौकशीसाठी हजर झाले.शरद आणि कदमांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.मि. विजय तुम्ही विराटचे सख्खे भाऊ ?हो सर दादा,मी आणि मीना आम्ही तिघे भावंड.सुखी,समाधानी मध्यमवर्गीय कुटुंब होत .पण....गिरणीचा संप अनेक कुटुंबे संपवून गेला.त्याच संपाच्या होळीत आम्ही होरपळत राहिलो सर.दादाने स्वतःच आयुष्य उधळून दिल आमच्यावर. त्याने काय काय सहन केले ते मला डायरीवरून समजले.डायरी???शरदने प्रश्न विचारला.हो!!सर, दादा नियमित डायरी लिहायचा.असे म्हणून शरदला त्याने डायरी सोपवली.एकंदर विजय या प्रकरणापासून दूरवर शांत आयुष्य जगत आहे हे दिसत होतं.विजय गेल्यावर शरदने प्रथम बॉबीची डायरी वाचायला घेतली.एका अनाथ आश्रमात वाढलेला बॉबी.लहानपणापासून वासनेचा बळी ठरला.अश्रू पुसायला कोणीच नव्हतं. स्वतःसाठी उभं रहायचा कठीण संघर्ष करताना बॉबीला त्याच देखणं रूप वरदान ठरलं तसच शापही. अनेकांनी केलेली फसवणूक पाहून बॉबी स्वतः सुद्धा त्यात उतरला.पण त्याबरोबर शिक्षण चालू ठेवलं. पत्रकारितेत गेला.तरीही पूर्वायुष्य बॉबीचा कायम पाठलाग करत होत...पुअर बॉबी!!शरद उदासवाने उद्गारला! इतक्यात शेफाली आली,"सर,आत येऊ का??शरदने डायरी मिटली,"ये शेफाली!any news???नाही सर पण आपल्याला बॉबीचा लॉकर तपासायची परवानगी भेटली आहे.गुड!!!असे म्हणत शरदने हाक मारली,"कदम गाडी काढा!
जुहूमधील एका परदेशी बँकेच्या शाखेत बॉबीचा बँक लॉकर होता.सर्व प्रक्रिया पूर्ण करून शरदने लॉकर उघडला.त्यात बॉबीच डेथ विल आणि एक लिफाफा होता.बँकेच्या ऑफिसर समोर सगळी कागदपत्रे ताब्यात घेऊन शरद ऑफिसला परतला.बॉबीच मृत्युपत्र उघडलं.जवळपास दहा कोटीचे शेअर्स बॉबीने अनाथालयाला दिले होते.उरलेली सर्व मालमत्ता श्रेयस व त्याच्या कुटुंबियांना दिली होती.सोबतचा लिफाफा शरदने उघडला. ज्यात खुद्द शरदला बॉबीने लिहिलेलं पत्र होत.
इन्स्पेक्टर शरद,जर तुम्ही हे पत्र वाचत असाल तर मी या जगात नसेल.एव्हाना तुम्ही माझी डायरी वाचली असेलच.आई बापाला जड झालेला एक पोरगा अनाथालयात येतो आणि मग सुरू झाला एक वेगळा संघर्ष,स्वतःला जगवण्याचा,जपण्याचा.खाऊ ,पिऊ मिळाले म्हणजे माणूस जगत नाही ना..कधी दुखलं तर फुंकर मारायला आई हवी असते,एखादे संकट आले तर ते झेलायला बाबा हवे.आपल्याकडे यातलं काहीच नाही.खूप लहानपणी समजले.पण आयुष्य एवढे सरळ नसते ना....बुद्धी आणि रूप देवाने वारेमाप दिल होत.त्याचा पहिला फटका बसला,वयाचा पंधराव्या वर्षी.आमच्याच आश्रमातील एका संचालकाने मला हेरलं आणि संधी साधून.....असो.अनेक रात्री रडत राहिलो.शरीरावर झालेल्या जखमा भरल्या पण...मन कायमचे दुःखी झाले.त्यानंतर वेगवेगळ्या वळणावर अनेकजण भेटले डायरीत उल्लेख आहेच.पण....मी या जाळ्यात फसलो ते मात्र मॅडम एस मुळे. मॅडम एस कोण????अनेकदा शोध घ्यायचा प्रयत्न केला.सगळे रस्ते शशांकपाशी बंद झाले.शशांकच्या लोणावळ्यात असलेल्या फार्म हाऊसवर याच उत्तर आहे...शक्य झाल्यास शोधा..अनेक बॉबी कुमार्गाला जाण्यापासून वाचतील.पुअर सोल!!शरद पुटपुटत होता,एवढ्यात...समीर धावत आत शिरला.
सर!सर!!!समीर।अरे काय झालं??सर टी व्ही ऑन करा.शरदने टी व्हि लावला.सगळीकडे एकच बातमी होती गृहमंत्री देसाईंच्या मुलाचा खून झाला होता.पद्धत सेम...कदम !!!कदम पळतच गाडीकडे गेले.गाडी वेगाने मंत्र्यांच्या बंगल्याकडे धावू लागली...मंत्र्यांच्या मुलाचा यात काय संबंध?सुधीर घोष कुठे आहे????मॅडम एस कोण???आणि या सर्वांना एवढया शिताफीने कोण मारत आहे?वाचत रहा मायाजाल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा