Login

मायाजाल भाग 13

रावी कोण आहे???का मारतेय ती सर्वांना??₹


शरदला खुनी समजला होता.पण कसा????अर्नाळकरांच्या गोष्टींतील खुनी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचतो त्यानंतर तो खून करत जातो....बस या समीरने बोललेल्या या वाक्यात उत्तर लपलेले होते.काय आहे उत्तर??चला पाहूया.

समीरने ते वाक्य उच्चारले आणि शरदला रहस्य उलगडल्यासारखे झाले.virasikc या अक्षरांना मोडून vira is back म्हणजे वीरा परत आला आहे.शिवाय पुढे दोनच वयक्ती उरल्या होत्या.ओम कपूर आणि मॅडम एस उर्फ सुकांत रॉय.हा सगळा विचार चालू असताना फोन खणखणला .ओम कपूर गायब झाला होता.एवढ्यात खुद्द ओमच्या फोनवरून समीरला फोन आला होता,"मी ओमला मारणार आणि मॅडम एसला सुद्धा तुम्ही नाही वाचवू शकत त्यांना."समीर काही बोलायच्या आत फोन बंद झाला होता.आता मात्र घाई करावी लागणार होती.समीर कॉल शेफाली.शेफालीकडे शरदने विचारणा केली.सगळ्या डिटेल्स घेऊन ऑफिसला ये.शरद आणि समीर वेगाने मुंबईकडे येत होते.ओम आणि मॅडम एस वाचल्या तर मानवी तस्करीतील कितीतरी गुन्हेगार सापडणार होते.ओम बाबत सगळे डिटेल्स समीर फोनवरून मिळवत होता.काल पार्टीला असणाऱ्या सर्वांना पोलीस स्टेशनला आणायच्या सूचना त्याने दिल्या.आता नक्की जिंकणार कोण?काळ कोणाच्या बाजूला असेल? शरद आणि समीर दोघेही दोन दिशांनी झेपावत होते.लक्ष्य मात्र एकच होते.

मुंबईत पोहचताच समीर ओमच्या शोधात बाहेर पडला.शरदने कायदेशीर सल्ला घ्यायला वकिलांना बोलावलं.सुकांत रॉय....खूप मोठं नाव होतं.केवळ शशांकच्या पत्रावर अटक शक्य नव्हती.त्यासाठी शशांकच्या बँक लॉकर मधील कागदपत्रे हस्तगत करणे आवश्यक होते. शरद वकिलांशी बारकाईने चर्चा करत होता.आवश्यक सर्व मुद्दे समजावून घेत होता.आता ही शेवटची संधी होती,खुनी सापडण्याबरोबर अवैध व्यवसाय करणारे सूत्रधार सापडणे जास्त महत्वाचे होते.एवढ्यात शेफाली आली.शरदने वकिलांशी चर्चा आटोपती घेतली.शेफालीने सगळे मुद्दे समोर मांडले,"सर मरण पावलेल्या बॉडीवरील खुणा आणि विराटच्या देहावरील खुणा तंतोतंत जुळत होत्या,उंची,शरीराची ठेवण सगळं काही मॅच होत आहे,त्यामुळे तुम्ही सांगताय तो तर्क लागू होताना दिसत नाही.मी त्यादिवशी कुठून बेवारस मृतदेह गायब झाला का याची सुद्धा चौकशी केली पण....असे म्हणत शेफालीने फाईल समोर ठेवली.आणखी एक सर दर्शन पटेल आणि इतर युवकांना या योजनेत सूचना देणाऱ्या वयक्तीचे नाव \"रावी\"आहे.आपला अंदाज असा खोटा ठरताना पाहून शरद प्रचंड निराश झाला.तरीही त्याने शेफालीला पुढील सूचना दिल्या.सुकांत रॉय वर बारकाईने नजर ठेव आणि एवढे बोलून शरद ती फाईल घेऊन ऑफिसच्या बाहेर पडला.

इकडे ओमच्या रात्रीच्या पार्टीत सामील त्याचे मित्र व ते एस्कॉर्ट सर्वांना कदमांनी समीरसमोर हजर केले.समीरला प्रचंड राग आला होता.त्याने त्या ती एसकॉर्ट्सना आत घेतलं. कदम या *****चे कपडे उतरवा आणि फटके द्या.त्याशिवाय बोलणार नाहीत हे.समीर त्या तिघांकडे वळून म्हणाला,"ओम गायब झाला तेव्हा त्याला पाहणारे तुम्ही होता.आता काय ते लवकर बोला.असे म्हणत समीरने त्यांना रागाने मारायला सुरुवात केली.पोलिसी हात पडताच त्या तरुणांचा धीर सुटला,"सांगतो!सांगतो!!साहेब.मारू नका.काल रात्री नेहमीप्रमाणे आम्हाला फोन आला.यावेळी क्लाएंट रावी मॅडम कडून आला होता,म्हणजे तो कोणीतरी प्रसिद्ध पण तितकाच विकृत असणार होता.तरीही पैसा लागतो जगायला.आम्हाला दिलेल्या पत्त्यावर आम्ही पोहोचलो.नंतर रात्रभर.....असे म्हणत त्याने उघड्या अंगावरच्या जखमा दाखवल्या.क्षणभर समीरच्या डोळ्यात पाणी आले.स्वतःला सावरून त्याने विचारलं,"पुढे काय झालं??सकाळी रावी मॅडम स्वतः आल्या व ओमला घेऊन गेल्या सर..कदम स्केच आर्टिस्टला बोलवा.त्या रावीचा काही पत्ता वगैरे आहे का????एवढ्यात दुसरा ओरडला,"सर...आठवलं,एकदा आम्ही रावी मॅडमच्या एका फार्महाऊसवर गेलो होतो.त्याने पत्ता दिला.पुढच्या मिनिटाला गाडी आरे कॉलनीच्या दिशेने धावू लागली.

ओम शुद्धीत आला.समोरच्या वयक्तीने टाळ्या वाजवत म्हंटल,"आठवतंय का काही???ओळखलस का???अजूनही ओमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.हे कसं शक्य आहे??शशांकने आत्महत्त्या केलीय!!त्याचा मृतदेह पोलिसांनी स्वतः ताब्यात घेतला आहे...तेव्हा समोरून हसण्याचा आवाज आला...तुला वाटलं असेल कसं शक्य आहे...माझा बॉडी डबल आठवतोय ना...जो माझ्या डमीच काम करायचा.त्या रात्री तो मेला.. आणि जिवंत राहिली रावी!!हो!!हेच नाव दिल होत ना त्या मॅडम एस ने...कितीतरी वेळा या वेषात मला भोगलं... माझ्याकडे बाहेर पडायचा पर्याय नव्हताच.पण.....विराजच्या आत्महत्त्येनंतर त्याच्या भावाने,बहिणीने केलेला विलाप काळीज हलवून गेला.पोलीस तुमच्यापर्यंत पोहचू शकत नव्हते कारण...तो हलकट राणे.त्याने किती ऑफिसरकडे मला रावी बनवून पाठवलं...एक पूर्ण पुरुष असलेला मी.तुम्ही इंजेक्शन आणि हार्मोन्स देऊन वाटेल ते बदल करत होतात.विराज गेला तेव्हाच ठरवलं..सगळ्यांना संपवायच.. पहिला बळी शहाचा घेणार होतो.सगळं माहीत असताना मला नाही सोडवलं त्याने.तेव्हा त्याच्या पोराचे धिंडवडे काढणार होतो...पण श्रेयस मध्ये आला.त्यानंतर भावेश श्रेयसला वाचवत होता ते समजलं...सोडला त्याला..नंतर मात्र एकेकाला संपवत आलो.
असे म्हणून त्याने ओमला काही इंजेक्शन्स दिली.त्यानंतर एका मादक युवतीच्या रुपात त्याला सजवलं... बाहेर आठ ते दहा जण जमले होते...ओम अक्षरशः पायावर लोळत माफी मागत होता.त्याच्याकडे दुर्लक्ष करत रावी उर्फ शशांकने त्याला बेडरूम मध्ये फेकलं...अक्षरशः चिंध्या झाल्या कपडे आणि शरीर दोन्ही....जवळपास तीन तास हे चाललं होतं...त्यानंतर मरणप्राय पडलेल्या ओमच्या गळ्यावर रावीने सूरी फिरवली...एवढ्यात बाहेर पोलिस आल्याचा गलका झाला.रावी मागच्या दाराने वेगात बाहेर पडली...गाडीत बसणार एवढ्यात विजेच्या वेगाने गोळी हाताला घासून गेली..वेगात गाडी बाहेर पडली.गाडीत चालक आधीच तयार होता.मागे समीर धावत येत असताना गेट बंद झाले.समीर चरफडला.बरोबरच्या पोलिसांनी सगळ्यांना अटक केली.समीरने शरदला फोन करून कल्पना दिली..रावीचा चेहरा मात्र दिसला नाही...

रावी .....हे नाव मनात घोळवत असताना त्याला अचानक आठवलं vira जर आपण रिअरेंज केलं तर ravi होत...शरदला अचानक कोड सुटल्याचा भास झाला...कारण रावी हे शशांकला एका नाटकात स्त्री भूमिका करताना दिलेलें नाव होते...म्हणजे....शरद ताडकन उठला..वकिलांना फोन केला.सकाळी लॉकर उघडता येणार होता...तोवर सुकांत रॉय वर पाळत ठेवावी लागणार होती..रावी वाचेल का??? शशांक रावी कसा बनला??काय असेल या मायजलाचा शेवट...पुढच्या अंतिम भागात सर्व रहस्य उलगडेल..वाचत रहा मायाजाल.
0

🎭 Series Post

View all