Login

मायाजाल भाग 1

मुंबईच्या झगमगाटात घडलेली एक खुनमालिका आणि ती उलगडणारा जिगरबाज अधिकारी
ट्रिईंग ट्रीईंग ...........ट्रिईंग......... ट्रीइंग....... मोबाईल खणखण वाजत होता...मध्यरात्रीच्या निरव शांततेत तो आवाज अक्षरशः सगळ्या बिल्डिंगला जाग करणारा होता.चरफडत शरद उठला आणि फोन उचलून झोपेतच कानाला लावला...शरद पुढच्या अर्ध्या तासात तू मला क्राईम लोकेशनवर हवा आहेस....फोन कट.....च्या××××× यांना काय जातंय सांगायला...बडबडत शरदने तोंडावर पाणी मारले.
इन्स्पेक्टर शरद मुंबई क्राईम ब्रँचचा हँडसम हंक,एखादी केस हातात आली की सुटणारणच..... पुढच्या मोजून पाचव्या मिनिटाला शरद लोकेशनकडे निघाला होता.जाताना ब्लूटूथ स्पीकर वरून टीमला सूचना चालू होत्याच.

शरद,शेफाली,समीर कॉन्स्टेबल कदम आणि फॉरेन्सिक मधून डॉ प्रिया देशमुख.सगळी टीम हजर झाली.लोखंडवाला मधील पॉश इमारतीत पंचविसाव्या मजल्यावर असलेले पेंट हाऊस.दारावर पाटी जिग्नेश शहा...म्हणजे प्रसिद्ध हिरे व्यापारी.शरदच्या मेंदूने नोंद घेतली.आत प्रवेश करतानाच गपकन उग्र वास आला....मानवी शरीर ...संपल्यावर पण दुर्गंधच मागे उरतो......"कदम दरवाजा उघडा,खिडक्या खोला."शरदने सूचना दिली.चार बेडरूमच्या आलिशान पेंट हाऊस मध्ये माणसं कशी नाहीत?शेफाली!येस सर ,मी सेक्रेटरीला बोलावलं आहे.समोर एक तिशीतला तरुण मृत अवस्थेत होता.अंगावर मारल्याची कोणतीही खून नाही.सगळं काही जिथल्या तिथे. फोटो घेतले जात होते."एवढ्या धडधाकट तरुणावर जागेपणी हल्ला झाला नसणार",समीर पुढे होत म्हणाला. शरदने प्रियाकडे पाहिले.प्रिया शांतपणे निरीक्षण करत होती,"लुक शरद!मृतदेहाचे डोळे गायब आहेत,हा सगळा काय प्रकार आहे?एवढ्यात सेक्रेटरी डिसुझा आला.शरदने रोखून पहात पहिला प्रश्न केला,"इथे रहाते कोण?डिसुझा हसला,"सर,मोठी लोक ,मोठे शौक!हा फ्लॅट जिग्नेश भाईंच्या मोठ्या मुलाच्या ताब्यात होता.खूप वेळा समजावलं.पण ....जाऊ द्या.

सगळी प्रोसिजर व्हायला दोन तास गेले.मृत तरुणाची ओळख पटेल असा एकही पुरावा सापडत नव्हता.शेवटी बॉडी पी एम ला पाठवून सगळे बाहेर पडले.शेफाली म्हणाली,"सर!भावेश शहा ला बोलवायचं का?आता तोच सांगू शकेल ,हा मेलेला तरुण कोण आहे? घाई नको शेफाली.वरून दबाव येईल.शहाच्या ऑफिसवर आपण जाऊ.प्रिया!रिपोर्ट कधीपर्यंत मिळतील.शरदच्या प्रश्नावर प्रिया शांतपणे म्हणाली,"किमान चोवीस तास तुला द्यावेच लागतील.सगळे दमले होते.बाकीच उद्या बघू.शरदला परत घरी यायला पहाटेचे तीन वाजले.आता बिछान्यावर अंग टाकून सरळ झोपायचे.असा विचार चालू असताना मोबाईल फ्लॅश झाला.आजच्या केसविषयी माहिती हवी असेल तर लगेच भेटा लोकेशन खाली दिले आहे.
मॅसेज वाचून शरद पुन्हा बाहेर पडला.दिलेले लोकेशन त्याच्या घरापासून अगदी जवळ होते.याचा अर्थ??माझ्या घरी यायची समोरची वयक्ती वाट पहात होती का?कोण असेल?शरदने हॉटेल ला मेरिदीनच्या लॉबीत प्रवेश केला.समोरून एक बुरखाधारी वयक्तीने हात हलवला.शरद सावधपणे त्या टेबलकडे सरकला.समोरून शांत आवाज आला,"बसा!तुम्हाला कोणीही पाहिलेलं नाही".तू कोण आहेस?मृत तरुणाशी तुझा काय संबंध?त्याने हळूच बुरखा उतरवला.तू?????शरद ओरडला.पेज थ्री पार्ट्या कव्हर करणारा बॉबी फर्नांडिझ.हो मी.आता शांतपणे ऎक.तुझ्याकडून??शरद उसळला.त्याला पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला.नोकरीच्या सुरुवातीला प्रसिद्ध सेलिब्रेटीला संरक्षक म्हणून नेमणूक होती शरदची.त्या पार्ट्या,ते सगळं सगळं आठवून तिडीक डोक्यात जात होती.बॉबी परत शांतपणे म्हणाला,"इन्स्पेक्टर सॉरी!पाच वर्षांपूर्वीच म्हणाल्या हवं होतं..पण त्यानंतर तुम्ही परत भेटला नाहीत".शरद मुठी आवळत ओरडला ,"नशीब समज ,भेटलो नाही ते".मला काय ऑफर केली होतीस तू?बॉबी परत शांतपणे म्हणाला,"शरद सॉरी,पण तो माझ्या कामाचा भाग होता तेव्हा!मी एस्कॉर्टच काम करत होतो.अरे but... you offer me to sleep with..... basterd. अजूनही शरदचे डोळे आग ओकत होते.बॉबी परत हसून म्हणाला,"इसी अदा ने तो ...शरद उठला तेवढ्यात बॉबी परत सॉरी म्हणाला.शरद प्लिज.पुढच मी काय सांगतो ते ऐक.ज्याचा खून झाला तो....कोण आहे तो?he is।my best friend .माझा खूप जवळचा मित्र,श्रेयस पाटील.एक अत्यंत उमदा,देखणा तरुण.मुंबईच्या मायानगरीच्या दलदलीत इच्छा नसताना अडकलेला एक अभागी जीव.म्हणजे???शरद अधीरतेने म्हणाला.बॉबी उदास होऊन सांगू लागला श्रेयस पाच वर्षांपूर्वी मुंबईत आला.एक मोठं स्वप्न घेऊन,कोणताही गॉडफादर नसताना. पण प्रत्येकजण काही नशीबवान नसतो ना...अतिशय देखणा,मेहनती असा श्रेयस.मला नेहमी तुझी आठवण यायची त्याला पाहिलं की.ऑडिशन देऊ लागला.तो फसू नये म्हणून मी खूप जपलं त्याला.अनेकदा माझ्या घरी ठेवलं.पण...अचानक मला एक महिन्यासाठी बाहेर जावं लागलं.आणि....आणि काय बॉबी ???शरद जोरात म्हणाला.तेच जे शंभरपैकी नव्वद जणांचं होत..त्याला गळाला लावणार नाव होतं...एवढं बोलून बॉबीने आवंढा गिळला.शरद उत्तेजित होत म्हणाला,"बोल,कोण होत ?बॉबी शांतपणे उत्तरला,"मिसेस कपूर".नाव ऐकताच शरदच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.काय?????हो शरद दॅट बीच कॅच हिम अँड यू नो...मिसेस कपूर..हे नाव ऐकलं की आजसुद्धा शरदच्या डोक्यात आग पेटते.त्या बाईने पाच वर्षांपूर्वी शरदला ऑफर केले होते...तिच्या नपुंसक मुलाबरोबर झोप आणि हवे तितके पैसे घे..तू माझ्या मुलाला आवडलायस. निर्लज्जपणे ती तोंडावर धूर सोडत उतरली होती.त्यानंतर शरदने ती ड्युटी बदलून घेतली ते आजतागायत परत ती समोर आली नव्हती.तिचे अनेक काळे धंदे होते.ड्रग्ज,सेक्स आणि पैसे ह्या जोरावर आपण काहीही करू शकतो ,हा माज त्या बाईत ठासून भरला होता.शरद हरवलेला होता विचारात एवढ्यात,"कॉफी घे,बॉबी म्हणाला".

चढलेले डोके शांत करण्यासाठी कॉफीचा मग ओठाला लावत शरद पुढे ऐकू लागला.बॉबी म्हणाला,"मी इथे नसताना त्या बाईने श्रेयस ला काही जाहिराती मिळवून दिल्या,फोटोशूट दिले.हळूहळू श्रेयाला तिने जाळ्यात ओढलं.पैसे दिसू लागले.सतत वर्षभर कडकी झेलत जगलेला श्रेया बहकला..ड्रग्ज,सेक्स आणि पार्ट्या सुरू झाल्या.सुरुवातीला सगळं याच्या मर्जीने होत पण....एक दिवस रात्री श्रेया माझ्या घरी आला.माझ्या गळ्यात पडून तो रडू लागला.मी ओळखलं ,अंदाज लावला पण तो चुकावा अस मनातून वाटत होतं.दुर्दैवानं अंदाज खरा ठरला. श्रेयाचे पॉर्न व्हिडिओ बनवले होते.आता ते सांगतील तस आणि सांगतील त्याच्याबरोबर..मी त्याला घेऊन दुसऱ्या दिवशी मिसेस कपूरकडे गेलो. ती हसत म्हणाली,"तू फुकट वापर त्याला,मला एवढा राग आला .तरी मी शांतपणे तिला म्हणालो,"प्लिज त्याला जाऊ दे".ती सरळ।म्हणाली,"बॉबी हा बिझनेस आहे,सध्या याला मागणी आहे.गेले चार वर्षे मी श्रेयाला वाचवायचे मार्ग शोधत होतो.कित्येक वेळा तुझ्या ऑफिसजवळ येऊन परत गेलो.तेव्हा हिंमत दाखवली असती तर श्रेया वाचला असता.बॉबी रडू लागला.

शरद उठला ,"बॉबी म्हणजे यातून श्रेया मारला गेला का?तस असेल तर त्याला अज्ञात जागी मारले असते ना?तेच तर,बॉबी म्हणाला.पण एक सांगतो या केस मध्ये तुला पाहिजे ती मदत करेल मी.माझ्या श्रेयाच्या खुन्याला पकडण्यासाठी.एवढे बोलून बॉबी उठला आणि शांतपणे निघून गेला.शरदला आता किमान मृत वयक्तीचे नाव माहीत झाले होते.तपासाची दिशा ठरली होती.कोण असेल श्रेयसचा खुनी?हा एकच खून की आणखी??जाणून घेऊ पुढच्या भागात.
0

🎭 Series Post

View all