मागील भागात इन्स्पेक्टर समीर दर्शनचा पाठलाग करत असताना,एक मुलगा त्याला धडकला.त्या मुलाने मित्राचा जीव धोक्यात असल्याचे सांगितले.समीरने वेळ न दवडता त्या मुलांबरोबर जायचे ठरवले.आता पाहूया पुढे.....
तो मुलगा आणि समीर गाडीत बसले. गाडी वेगाने मढ आयलंड या मुंबईतील उच्चभ्रू भागाकडे धावू लागली.मित्राचा फोटो आहे का? समीरने विचारलं. तो मुलगा म्हणाला,"हो सर!मोबाईलमध्ये फोटो आहे.समीरने गाडी थांबवली.सर हेच शेवटचं लोकेशन हेच दाखवत आहे.समीर सावधपणे गाडीतून खाली उतरला.एका निर्जन बंगल्यापाशी गाडी थांबली.समीर आणि तो मुलगा दोघेही सावधपणे आत शिरले.तेवढ्यात समीर खाली वाकला.गोळी समीरच्या खांद्याला चाटून गेली.समीरने रिव्हॉल्व्हर काढले.दुसऱ्या क्षणी मेलो!वाचवा!असा आवाज आला.समीर वेगाने आत गेला.खोलीत सगळा अंधार होता.समीरने अंदाजाने बटन शोधले.खोली संपूर्ण रिकामी होती.रिकामी खोली पाहून समीरला आश्चर्य वाटलं.रिकाम्या खोलीला राखणदार का ठेवला असेल.ते सुद्धा हत्यारबंद?तो मुलगा घाबरला,"सर!चला लवकर,इथे धोका आहे."पण समीरने खोलीचे नीट निरीक्षण सुरू केले.
सगळ्या भिंतीवर हात फिरवत असताना समीर एका ठिकाणी थांबला.त्या ठिकाणी भिंतीवर एक उंचवटा होता.हात दाबताच कर्रर्रर्रर्रर्र असा आवाज झाला आणि दरवाजा उघडला गेला.समोरच दृश्य पाहून समीर सारखा पोलीस अधिकारीसुद्धा घाबरला.जवळपास पंचवीस ते 30 तरुण तरुणींना त्या छोट्या खोलीत अक्षरशः कोंबले होते.बरेच जण बेशुद्ध होते.समीरने कंट्रोल रूमला फोन लावला.मदत येईपर्यंत समीरने एकेकाला त्या मुलाच्या मदतीने बाहेर काढायला सुरुवात केली.कित्येक दिवस खायला प्यायला नाही,कँडल मळलेले,घाणेरडा कुबट वास..सगळं हदरवणार होत.इतक्यात तो मुलगा ओरडला,प्रकाश!!प्रकाश!!सर हा पहा माझा मित्र प्रकाश.समीरने त्याला शांत रहायची खूण केली.थोड्यावेळातच मदत आली.सर्वांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या सगळ्या गडबडीत दर्शन पटेल कडून चौकशी करायची राहून गेली.संपूर्ण मीडिया या बातमीने हादरला.ह्यूमन ट्रॅफिकिंगचे अतिशय मोठे प्रकरण केवळ त्या प्रसादच्या मित्रामुळे बाहेर आले होते.ह्या सगळ्या तरुण तरुणींमध्ये काही कॉमन गोष्टी होत्या. त्यातील बरेच जण मुंबईला पळून आलेले होते. काही जण बॉलिवूड मध्ये स्ट्रगल करत होते.समीर सगळ्या मीडियात हिरो ठरला होता...
इकडे शरद आणि शेफाली एका आलिशान कॅफे हाउस मध्ये भावेश शहाची वाट पहात होते.जवळपास अर्ध्या तासाने भावेश आला.शरदने सरळ मुद्द्याला हात घातला.श्रेयस आणि तुमच नात काय?तुमच्या फ्लॅटमध्ये तो का रहात होता??तेव्हा भावेश सावरून बसला.इन्स्पेक्टर मला पुरुषांच आकर्षण आहे...त्यात गाठीला भरपूर पैसा, बॉलीवूड मध्ये चांगले कनेक्शन यामुळे अनेकदा तरुण आकर्षण पोर मिळायची. मी सुद्धा तरुण होतो,खुप वाहवत जायचो यात.पण तारुण्य आणि सौंदर्य चिरकाळ नसते ना..चाळीशी पार केल्यावर तरुण पोर खुशीने येईनात मग....वेगळे मार्ग सुरू झाले.कास्टिंग काऊच ,पैसे...नशा...हे सगळं सुरू असताना मला तीन वर्षांपूर्वी कपूरच्या पार्टीत श्रेयस भेटला.देखणा,आकर्षक..पण ओम कपूरचा पर्सनल.....त्याने मला नकार दिला.शेवटी दहा लाखात त्याने श्रेयसला माझ्या हवाली केलं.सुरुवातीला फक्त वासना होती.पण हळूहळू मला श्रेयस आवडू लागला.आम्ही एकमेकांत गुंतलो.माझ्या श्रेयसला कोणी मारलं?त्याला लवकर पकडा!भावेशने कोणताही आड पडदा न ठेवता सगळे सांगितले होते...भावेशला जाऊ दिल्यावर श्रेयसने शेफालीवर कामगिरी दिली ...ओम कपूर.इकडे समीर हेड ऑफिसवर पोहोचला.पत्रकार सतत समीरला संपर्क करत होते.शरद आणि शेफाली परत आले.समीर म्हणाला,"सर,मी ज्याच्यावर गोळी झाडली त्याला दवाखान्यात जावेच लागेल.आसपासच्या दवाखान्यावर नजर ठेवायला खबऱ्याना सांगितलं आहे.वेल डन.त्या दर्शनच काय?काही बोलला का?सर त्याला पकडत असताना....समीरने पुढचा सगळा घटनाक्रम सांगितला.
"ठीक आहे,त्याला कधीही उचलता येईल,उशीर झालाय.निघू या! सगळे घरी जायला बाहेर पडले.दुसऱ्या दिवशी शरद जरा उशिरा उठला.सुभद्राबाई म्हणजे शरदच्या कामवाली.शरद पुढे चहा आणि खायला देऊन म्हणाल्या,"आधी खाऊन घ्या,आन हे समद बगायला एक हक्काचं माणूस आणा.शरद हसत आंघोळीला गेला.चहा आणि थालीपीठ खाताना तो म्हणाला,"वा!काकू क्या बात!!आईची आठवण झाली.खात असताना त्याने बातम्या लावल्या.सगळीकडे एकच बातमी होती...सिरीयल किलर कडून तिसरा खून....मुंबई पोलीस करतय काय???तिसरा खून???कोणाचा ???हा विचार करत असताना मोबाईल वाजला.कदम होते.शरद ओरडला,"कदम,काय चाललंय हे?बातमी काय?तिसरं कोण??सायेब थोडं थांबा की!!बोला कदम लवकर..सायेब तिसरा खून काल रात्री झालाय...मृताचे नाव आहे..शशांक देशमुख.काय????कदम नाव बरोबर आहे ना?????शरद वेगाने बाहेर पडला.
कोण असेल शशांक???नाव ऐकून शरदला एवढा धक्का का बसला???मीडियात न्युज कशी??वाचत रहा मायाजाल....