Login

मायाजाल भाग 6

Is Murder Mistry goes on?can Inspector Sharad catch the murderer
मृदेहांवर कोरलेली चिन्हे प्राचीन भाषांतील आहेत,तसेच ओम कपूर,दर्शन आणि विनय शर्मा हे तीन संशयित आता ताब्यात होते.पण यातीलच कोणी खुनी असेल का?सूत्रधार नक्की कोण?पाहुयात आजच्या भागात.......
ओम कपूर ताब्यात आल्यामुळे सगळं मीडिया अटेन्शन या केसकडे वळले.जी गोष्ट शरदला आजिबात आवडत नव्हती.दर्शन पटेल समीरने सांगितल्याप्रमाणे चौकशीला हजर झाला.साधारण तिशीचा, गोरा,बांदेसुद,अतिशय देखणा चेहरा पण त्यावर मेकअपचा थर आतासुद्धा जाणवत होता.शरद आणि कदम समोर बसल्यावर दर्शन उगीचच चुळबुळ करत होता.बारवर अनेकदा रेड पडायची पण आजचा प्रसंग वेगळा होता.शिवाय समोर शरद सारखा अत्यंत कडक आणि प्रामाणिक अधिकारी असल्याने नकळत दर्शनवर दडपण आले होते.शरदच्या भेदक नजरेतील जरब पाहूनच दर्शन निम्मा गार झाला होता.सावरून बसलेल्या दर्शनला निरखत शरदने पहिला प्रश्न विचारला.क्षुधांशु आणि तुझा परिचय कसा झाला?दर्शन सावरून बसला.सर क्षुधा आणि माझा परिचय पाच वर्षांपूर्वी एका ऑडिशनच्या वेळी झाला.बुद्धिमान,देखणा आणि उत्तम अभिनेता असलेला हा मुलगा खूप पुढे जाईल असे मला वाटले होते.पण.....ह्या इंडस्ट्रीत नियम खूप वेगळे आहेत साहेब.इथे स्वतःच्या मेहनत आणि लायकीशिवाय आणखी काही गोष्टी लागतात.असो......त्यानंतर आमची अनेकदा अशीच ऑडिशनला भेट व्हायची.इथे येऊन दोघांनाही वर्ष होत आलं होतं.काहीही घडत नव्हतं.मग मी माझा मार्ग निवडला...जे शरीर पडद्यावर दाखवणार होतो..तेच........हा मार्ग त्या बंगाली बाबूला आवडला नाही आणि पटलाही नाही.आमचे यावरून अनेकदा वाद होत.तो छोटे मोठे रोल करत प्रसंगी उपाशी रहात होता.पण......एक दिवस मात्र संयम संपला. गरजेने बुद्धी आणि तत्वांवर मात केली.त्याला घरी पन्नास हजार पाठवायचे होते.घरी वडील प्रचंड आजारी होते.मी असाच स्टुडिओ मधून पार्टीला जायला बाहेर पडलो.तो गेटवर विमनस्क अवस्थेत बसला होता.मी हाक मारली,"बाबू मोशाय, कहा खोये हो?त्याने वर पाहिलं आणि खिन्नपणे हसला.मी त्याला म्हणालो,"चल गाडीत बस,तेवढाच फ्रेश होशील.जाताना मी गाडीतच तयार होत होतो.तेव्हा त्याने सरळ विचारलं,एक वेळी किती पैसे मिळतात?मी हसलो,ते समोरच्यावर आणि सेवेवर ठरत.तो काहीतरी ठरवून म्हणाला,"आज मी पण....."मला धक्का बसला.तसच त्याने वास्तव स्वीकारले म्हणून बरेसुद्धा वाटले.त्यारात्री एका बड्या उद्योगपतींच्या बरोबर त्याने......पैसे मिळाले पण....त्यानंतर अनेकदा तो पैशांची गरज असेल तरच या पार्ट्या अटेंड करत असे.एवढे बोलून दर्शन थांबला.शरदने दुसरा प्रश्न विचारला,"क्षुधांशुचे कोणाशी वैर वगैरे?किंवा रिलेशनशिप?दर्शन हसला,"सर ,वैर वगैरे नाही,आपल्या कोषात जगणारा माणूस होता तो.रिलेशनशिप म्हणाल तर नव्हती पण....पण काय?शरद प्रत्येक शब्दावर ठाम जोर देत बोलला.दर्शन थोडा वेळ थांबला,"सर!जय मेहता त्याच्या मागे होता खूप दिवस".शरदने दर्शनचा नाव पत्ता,संपर्क लिहून घ्यायला सांगितलं आणि जायला परवानगी दिली.

एवढ्यात फोनवर कमिशनर साहेब होते,"शरद ,ओम कपूर बाबत सावध रहा.त्याची चौकशी करतानासुद्धा ....शरद हसत म्हणाला,"आलं लक्षात सर".तेवढ्यात शेफाली आत आली.तिच्याबरोबर एक मुलगा होता .कदम याला कस्टडीत घ्या!शेफाली कदमांना सूचना देऊन शरदच्या केबिनकडे गेली.काही खबर?शरदने विचारल.सर प्रकरण गुंतागुंतीचं आहे खूप.लगेच ठाम निष्कर्ष नाही काढता येणार.ह्या विनयला फार काही माहिती असेल असे वाटत नाही.शरद हसत म्हणाला,"शेफाली अनेकदा प्यादेसुद्धा वजीराला मात देते".चला जरा ओम कपूरची खबरबात घेऊ.कदम व्हिडिओ कॅमेरा सुरू ठेवायला सांगा.शरद,कदम आणि शेफाली तिघे बराकीत आले.प्रचंड मग्रूर,बेफिकीर आणि मजोरड्या चेहऱ्याने ओम बसला होता.शरद समोरच्या खुर्चीवर बसला आणि सरळ विचारलं ,"श्रेयसला ओळ्खतोस का? समोरून तेवढ्याच बेफिकीरीत उत्तर आलं,"कोण हा?असे अनेक जण येतात मुंबईत, अनेकजण स्वतःला विकतात.नाही आठवत मला.शरदने अनेक प्रकारे प्रश्न विचारले.ओमने अजिबात दाद दिली नाही.एवढ्यात शरदला डॉ प्रियाचा फोन आला,"बोल प्रिया! वा!!!एकदम झक्कास".शरदने फोन ठेवला आणि म्हणाला,"प्रियाकडे काहीतरी आहे ज्यामुळे केस सुटायला मदत होईल".
थोड्याच वेळात प्रिया आणि स्वरा आले.प्रिया म्हणली,"मी ओळख करून देते".तेवढ्यात स्वरा बोलली,"तायडे,मी ओळखते या सर्वांना".प्रिया चिडली,"हो का!!शरद हसायला लागला. तेवढ्यात स्वरा बोलू लागली,"खर तर तुमच्या सगळ्यांबद्दल मीडियातून,तायडी कडून खूप ऐकलं आहे.तरीपण पोलीस म्हंटलं की....गप ग प्रिया ओरडली.शेफाली म्हणाली,"कदम एक कडक चहा सांगा,स्वरा तू काय खाणार".स्वरा हसत म्हणाली,"चहा!!हो मग?????तेवढ्यात कदम बाहेर गेले.प्रियाने लॅपटॉप काढला,तो प्रोजेक्टरला कनेक्ट केला.प्रत्येक अक्षर आणि मृतदेहावरील चित्र होते.स्वरा बोलू लागली,"गाईझ ही चिन्हे वेगवेगळ्या प्राचीन भाषांमधून घेतली आहेत.खुनी वयक्ती इतिहासाची जाणकार असणार आहे.तर आतापर्यंत तीन खून झाले,पहिल्या बॉडीवर असलेले चिन्ह लॅटिन मधून घेतले आहे.इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ होतो V ...पण पुढे ट्विस्ट आहे.दुसऱ्या बॉडीवर असलेले चिन्ह इजिप्तशियन लिपीतील आहे ज्याचा अर्थ आहे I आणि तिसरे शशांकच्या बॉडीवरील चिन्ह ब्राम्ही लिपीत आहे.ज्याचा अर्थ आहे R.म्हणजे हे सगळे जोडले तर vir असे अक्षर मिळत आहे.काय असू शकेल हे???तेव्हा प्रिया बोलू लागली,"काहीही असू शकते,एखादा मॅसेज,नाव किंवा काहीही.......पण हा शेवटचा खून असेल का?ते नाही सांगता येणार इतक्यात.एवढ्यात शेफाली म्हणाली,"सर मला सायबर सेल मधून मॅसेज आला आहे.शशांक सरांचं कॉल डिटेल्स घ्यायला जावे लागेल.ठीक आहे जा तू.प्रिया चल मी तुम्हाला घरी सोडतो.प्रिया,स्वरा आणि शरद बाहेर पडले.
इकडे समीर हॉस्पिटलमध्ये पोहचला होता. प्रसाद आता नॉर्मल होता.त्याला समीरने विचारलं ,"बोल???प्रसाद बोलू लागला,"सर,मी प्रसाद शेवरकर,रत्नागिरीचा.माझं शिक्षण तिकडेच झालं.मला.....तो थांबलेला पाहून समीर म्हणाला,"तू जे सांगशील ते आपल्यात राहील. सर मला पुरुषांबाबत खूप आकर्षण...म्हणजे....समजलं पुढे बोल.मुंबईत आल्यावर ते सगळं सहज मिळू लागलं. अनेकांशी ओळखी झाल्या.टी वी ऍक्टर शशांक माझं क्रश होता.एकदा एका मित्राने मला सांगितलं की तो शशांकबरोबर....मला आता काहीही करून शशांक हवा होता. मी अनेक महिन्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचलो.सुरुवातीला सगळं खूप छान होत.आमच्यात अनेकदा इंटरकोर्स व्हायचा..मला खूप छान वाटायच.एक दिवस त्याच्या फार्म हाऊसवर पार्टी होती.मलासुद्धा बोलावले होते.ड्रिंक्स घेऊन मी शशांक बरोबर बेडरूममध्ये गेलो.सकाळी मी उठलो तेव्हा...माझ्याबरोबर तीन अनोळखी तरुण विवस्त्र होते.मला उठताही येत नव्हते.that basterd raped me. मी कसाबसा उठून घरी पोहोचलो.त्यानंतर मला शशांकने विडिओ दाखवला.मी पुरता फसलो होतो.आता तो सांगेल ते करणे भाग होत.शशांक हा दलाल होता.अनेक तरुण-तरुणींना फसवून विकले होते.तुम्ही आला नसता तर मी सुद्धा....प्रसाद रडत होता.

शशांक स्वतः मास्टर माईंड असेल का?ओम कपूर सुटणार का?खून मालिका थांबणार का???वाचत रहा मायाजाल
0

🎭 Series Post

View all