प्रसादने सांगितलेले सत्य ऐकून समीरला सुद्धा धक्का बसला होता. शशांकच्या पडद्यावरील सोजवळ चेहऱ्यामागे इतकं भयानक सत्य असेल असं वाटलंच नव्हतं.हे सगळं लेखी नोंदवून समीर निघाला.आता पुढे या मायाजालात कोण कोण सापडणार????
समीर घरी येऊन जेवला.शांतपणे झोपला,दिवसभराच्या धावपळीत झोप कधी लागली समजलं नव्हतं.अचानक गर्रर्रर्रर्रर्रर्र गर्रर्रर्रर्रर्रर्र मोबाईल व्हायब्रेट होत होता.पहाटेचे तीन वाजले होते....नंबर अनोळखी होता.समीरने झोपेतच फोन उचलला.
हॅलो,कोण बोलतंय?
पलीकडून घाबरलेल्या आवाजात एक माणूस बोलत होता,"सर,इथे एक माणूस मरून पडला आहे".समीर खडबडून जागा झाला,"तुम्ही कोण बोलताय?कुठून बोलताय?पलीकडून फक्त त्या माणसाने एवढंच सांगितलं की,"वेस्टर्न हायवेवर एक माणूस मरून पडला आहे".फोन कट झाला.समीरने कंट्रोल रूम वर फोन लावला,सविस्तर माहिती दिली आणि झोपायचा प्रयत्न करू लागला एवढ्यात....शरद सरांचा फोन?एवढ्या पहाटे?हॅलो सर!पलीकडून शरदने एवढेच सांगितले,"तयार रहा आणि बातम्या पहा"

.समीरने टी व्ही ऑन केला.पहाटेचे चार वाजले होते आणि सगळीकडे एकच बातमी होती ...मीडिया टायकून ओम कपूरचा मॅनेजर,नीरज वर्मा याचा मृत्यू.... समीर हादरला.तेवढ्यात इन्स्पेक्टर शरद,शेफाली आणि कदम इमारतीजवळ पोहोचले होते.विचाराच्या तंद्रीतच समीर खाली उतरला.कदम म्हणाले,"सर,याचा अर्थ ओम कपूर पुढचे टार्गेट असेल का".मी सुद्धा तोच विचार करतेय सर.शेफाली बोलत होती.शरद मात्र शांत होता.हे सगळे खून एकमेकांशी संबंधित आहेत..आणि ह्या खून करणाऱ्याचा सुद्धा .कदम वेगात गाडी चालवत होते.लवकरच वेस्टर्न हायवेवरच्या पोलीस चौकीतील मदत घेऊन सगळे गुन्ह्याच्या जागी पोहोचले.विवस्त्र स्तिथीत मृतदेह होता.गळा आणि हाताची नस कापलेली,म्हणजे मृतदेहाचे नाक कापले होते.शरद मृतदेह बारकाईने पाहत होता.मृतदेहाच्या जांघेवर निशाण कोरलेले होते.सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे नीरजचा लॅपटॉप आणि फोन गायब होते.शरद शेफालीकडे वळत म्हणाला,"समीरला ज्या मोबाईलवरून फोन आला होता तो ट्रॅप कर.नंबर कोणाचा आहे तो शोधा.तेवढ्यात समीरने बॉडीवर कोरलेल्या चिन्हाचा फोटो डॉ प्रियाला पाठवला.सगळे परत यायला निघाले
समीर म्हणाला,"सर एक चहा घेऊ या का?जरा फ्रेश वाटेल.तेवढ्यात शेफालीला एक मेल आला.शेफाली जोरात ओरडली," एसस्स!!!समीर ओरडला,"येडचाप घाबरलो ना!शेफाली वेडावत म्हणाली,"डॅशिंग इंस्पेकटर समीर घाबरतो!!हा हा हा .मेल चेक करते थांब.शेफालीने मेल उघडला.आत अनेक क्षेत्रातील मोठ्या लोकांचे व्हिडिओ होते,काही नवीन लोकांचे सुद्धा विडिओ होते.काही परदेशातील तर काही स्वदेशातील कॉन्टॅक्ट होते.एवढ्यात समीरच लक्ष एका नावावर स्थिरावल..दर्शन पटेल!!
शरदच्या सुद्धा ते नाव लक्षात आले,"समीर दर्शनची चौकशी करायची वेळ आली आहे.आधी घरी जाऊन फ्रेश व्हा आणि सगळे ऑफिसला भेटा.इकडे ओम कपूरला जामीन मिळवण्यात मिसेस कपूर यशस्वी झाल्या होत्या.जमिनाची कागदपत्रे घेऊन ती बरोबर दहाच्या ठोक्याला हजर होती.तिने नोंदणी करणाऱ्याकडे कागद फेकले आणि ओरडली,"मेरे लडके को छोडो।तेवढ्यात शरद आत आला.काय आरडाओरड आहे?कोण आहे?मिसेस कपूर मागे वळली.कागद दाखवले.शरद शांतपणे कदमांना म्हणाला,"कदम त्याला बाहेर काढा".मिसेस कपूर विजयी मुद्रेने बाहेर पडली.
एवढ्यात शरदला फोन आला.तो इथून सुटला तरी वाचणार नाही!!!!फोन कट झाला.शरदने लगेच सायबर सेल कडे नंबर पाठवला.खुनी इसमाने शरदला स्वतः फोन केला होता.याचा अर्थ?एकतर खुन्याचा उद्देश पूर्ण होत आलाय किंवा अति आत्मविश्वास.... शरद विचार करत असतानाच समीर आणि शेफाली आले.सगळे मिळून दर्शनची चौकशी करायला आत शिरले.कदम कॅमेरा बंद करा.एवढे बोलून शरदने एक सणसणीत लाथ दर्शनला घातली.तो उठत असतानाच त्याच्या पोटात शेफालीचा पंच बसला.दर्शन ओरडत होता.कदम त्याला खुर्चीवर बसवा.शरद समोर बसत म्हणाला,"आता खरखर बोलायचं,शशांक देशमुखला ओळ्खतोस?त्याच्या धंद्याशी तुझा काय संबंध आहे?दर्शनला समजलं आता लपवून फायदा नाही.सांगतो सर.
मलासुद्धा शशांकने सुरुवातीला गोड बोलून जाळ्यात ओढलं.पैसे घेऊन मी हे सगळं आधीपासून करत होतो. पण ते माझ्या मर्जीने ,मला हवे तेव्हा.तो दिवस मला आजही लख्ख आठवतो...मला एक कॉल आला.समोरून डिमांड होती...पैसे भरपूर मिळणार होते.मी तयार होऊन गेलो.लोटस परडाईझ म्हणजे मोठी असामी असणार हे नक्की होत.मी बेल वाजवली.come in!!!मी आत गेलो.पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वासच बसला नाही....आतमध्ये शशांक देशमुख आणि त्याचा मित्र ....दर्शन थांबला आणि सनकन कानाखाली बसली.थांबू नकोस!!शरद गरजला.शशांक बरोबर अंशुमन नावाचा त्याचा मित्र होता.मी आत जाताच म्हणालो,"दोघे???शशांक हसला,"पैसे डबल देऊ की!!!मग ....त्यानंतर भरपूर पैसे घेऊन मी बाहेर पडलो.नंतर अनेकदा शशांक मला बोलवत असे.एक दिवस त्याने मला फोन केला...एका पत्त्यावर पार्टी आहे आणि तू तिथे जायचं आहेस!!मी पैशांचं विचारताच तो हसला,"फोन बघ".मी चॅट उघडले.माझे त्याच्या मित्राबरोबर विडिओ होते.परत फोन वाजला.शशांक होता...आता तू माझ्यासाठी काम करणार आहेस!!त्यानंतर मला त्याचे अनेक धंदे समजले.त्याला विरोध करणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर मी त्याला मुलं पुरवायला लागलो....एवढे बोलून तो थांबला.एवढंच मला माहित आहे सर.शशांकचा बॉस कोण?हे मला त्याने कधीच कळू दिले नाही.
तेवढ्यात शरदच्या मोबाईलवर मॅसेज आला.थोड्यावेळापूर्वी आलेला फोन सुंदर नावाच्या एका महिलेच्या नावावर होता आणि तो मुलुंड परिसरातून केला होता.शेफाली!ह्या बाईला शोध.यातून आपल्याला काहीतरी नक्की मिळेल.दर्शनने सांगितलेल्या लोकांकडे चौकशी सुरू करा.शरद सूचना देत असतानाच लँडलाईन वर फोन आला.कदम फोन ठेवत घाम पुसत म्हणाले,"सर!!!आरे कॉलनीच्या जंगलात पुढची शिकार आहे शक्य झालं तर वाचवा!!अस सांगितलं त्याने!!!शरद ओरडला,"be quick!समीर,शेफाली कदाचित हे सत्र संपवायची संधी असू शकेल ही!!दहा मिनिटांच्या आत पोलीस व्हॅन वेगाने रस्त्यावर धावू लागली.

कोण असेल पुढची शिकार??ही सुंदर कोण आहे??ओम कपूरचा बळी जाईल का??वाचत रहा मायाजाल!