मागील भागात आपण पाहिले की खुनी आता सरळ आव्हान देत होता.मोबाईल वरून ट्रेस होईल का?ओम कपूरचे पुढे काय होईल???वाचूया मायाजाल .
संपूर्ण टीम मुलुंड परिसर पिंजून काढत होती.शेवटी कमला सापडली.मुलुंड परिसरात भाजी विकणाऱ्या एका आजीबाईचा फोन होता.शेफाली आजीजवळ गेली.आजीला तिने विश्वासात घेऊन विचारलं ,"आजी काल तुमचा फोन कोणी घेतला होता?"आजी आठवत म्हणाली,"हा!काल संध्याकाळी एक माणूस आला होता,म्हणाला फोन हरवला,बायको आजारी हाय.मी दया येऊन त्याला फोन दिला.का ग बाय?काय झालं?आता मात्र शेफालीने ओळख उघड केली,"आजी मी पोलीस आहे".काय????पोलीस????मी काही न्हाई केलं !!आजी घाबरू नका.मला फक्त सांगा काल ज्या माणसाने तुमचा फोन घेतला त्याला तुम्ही ओळखु शकाल का??पोरी त्यानं मास्क लावला व्हता.मग कस ओळखणार???शेफाली निराश होऊन मागे वळली.एवढ्यात थांबा!!थांब ग पोरी...काल तो बाबा आला व्हता त्याच्या उजव्या हाताव गोंदण व्हत बग. गणपतीचं चित्र आन खाली विंचू होता.त्यामुळं माझ्या पक्क लक्षात हाये.शेफालीने स्केच आर्टिस्टला फोन केला.आजी माझ्याबरोबर या ?शेफालीने समीरला फोन वरून सगळा प्रकार सांगितला.
एवढ्यात स्वराचा फोन आला,"हॅलो,मी स्वरा बोलतेय.समीर हसला,"बोला ना!नंबर सेव्ह आहे तुमचा."स्वरा हसली,"निरजच्या अंगावर असलेल्या चिन्हाचा अर्थ इंग्लिशमधले A हे अक्षर.म्हणजे आता vira हा शब्द तयार होतोय.याचा अर्थ हे नक्कीच कोणाचे तरी नाव आहे.समीर म्हणाला,"माझाही तोच अंदाज आहे,पण खुनी स्वतःचे नाव लिहिलं का?बरं ठेवते ....स्वरा किती गोड आणि आवाजसुद्धा हे मनात म्हणताना समीरने जीभ चावली.समीर ऑफिसला पोहचला.इकडे शरद आणि शेफाली शशांकच्या लॅपटॉपवर आणखी तपशील पहात होते.एवढ्यात शरदला कमिशनर साहेबांचा फोन आला,"शरद ऐक, आता ओम कपूरला धमकीचा फोन आला आहे,त्याला भेट.त्याच्या प्रोटेक्शनची वयवस्था कर.फोन ठेवला आणि शरदचा पारा चढला,"या असल्या लोकांना संरक्षण द्यायचं आपण.....शरदने आलेला मॅसेज सांगितला.तेव्हा समीर म्हणाला,"सर,उलट ही संधी आहे,या निमित्ताने या आपल्याला खुन्याला ट्रेस करण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त होईल.येस!!चला ...ओम कपूरला भेटू या!!!जवळपास पाच वर्षांनी शरद परत त्या बंगल्यावर चालला होता.जुना प्रसंग आठवून त्याला अतिशय संताप येत होता.आपल्याला सुद्धा abuse करायचा प्रयत्न करणारे हे लोक आता कोणत्या थराला गेले असतील????विचाराच्या तंद्रीतच शरद बाहेर पडला.एवढ्यात बॉबीचा मॅसेज आला...एक बातमी आहे!!!शरदने फक्त भेटू!एवढाच रिप्लाय केला.पोलीस जीप कपूर विला मध्ये प्रवेश केला.ओम कपूर स्वतः समोर आला.शरदला पाहून मान खाली घातली.शरद सरळ म्हणाला,"बोला!मि.कपूर,कोणी आणि कशी धमकी दिली तुम्हाला???कपूरने कुरियर दाखवले...कुरियर मध्ये एक चिठ्ठी होती.टाइप केलेला मॅसेज होता..लवकरच तुझी वेळ येईल...त्या नंतर तुझा बॉस.... खाली विंचू होता.तुमचा कोणावर संशय !!ओम थांबला.शरद हसत म्हणाला,"असू द्या ,नाही आठवणार...इन्स्पेक्टर समीर आज पासून चार कॉन्स्टेबल द्या यांना आणि तुम्ही स्वतः रिपोर्टिंग घ्या.सगळ्या सूचना देऊन सगळे वेगाने बाहेर पडले.
कदम गाडी चालवताना म्हणाले,"सर ,आज भारत पाकिस्तान मॅच आहे".हो !!या वेळी विराट नीट खेळला पाहिजे.एवढ्यात शेफाली ओरडली,yessssssss!!!अरे विराट!!!सगळे एकदम पहायला लागले.शेफालीने पटकन लॅपटॉप काढला.सायबर सेलचा मेल ओपन केला..तिथे एक फोल्डर होता.s××× virat नावाचा.सर हा फोल्डर ओपन करून पहा.शरदने लॅपटॉप घेतला.पहिल्या फाईलमध्ये एका सुंदर तरुणाचा निर्वस्त्र फोटो आणि खाली प्रत्येक अंगाचे माप होते....त्यापुढे अनेक विडिओ होते.विराट राजे....असे त्या तरुणाचे नाव होते.शेफालीने विराट राजेचे उपलब्ध डिटेल्स पाठवले..तेवढ्यात कदम थांबले,"सर!समोर अतिशय छान पदार्थ मिळतात".शरद हसत म्हणाला,"चला कदम ....खाऊन घेऊ.असे निवांत क्षण दुर्मिळच असतात.सगळे गप्पा मारत होते.तेवढ्यात शेफालीला फोन आला.विराट राजे..एकेकाळी मॉडेलिंग इंडस्ट्रीत झपाट्याने मोठं होऊ घातलेलं नाव...प्रचंड मेहनती.परळ सारख्या मध्यमवर्गीय परिसरातून आलेला तरुण.त्याने अचानक तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली..स्वतःचा सगळा चेहरा विद्रुप केला.त्याचा पत्तासुद्धा पाठवला होता सेल वाल्यांनी.
चलो परळ!!शरद हसत म्हणाला.सगळे खाऊन निघाले.गिरणींच्या कामगार वस्तीत अजूनही अविकसित असलेल्या चाळी.. बेकार तरुण आणि बकाल वस्तीत असलेलं निराश वातावरण.शेफालीने मॅप लावला तेव्हा कुठे पत्ता सापडला.चाळीच्या प्रवेशद्वारापाशी एक महातारा माणूस होता.त्यांना शेफालीने विचारलं,"आजोबा इथे राजे कुठे राहतात??त्यांनी शेफालीकडे पाहिलं आणि वसकन ओरडले,"इथे राजेबीजे कोणी रहात नाही हो!कोणी दिला पत्ता ??शेफाली पुढे काही बोलणार एवढ्यात मागून एक तरुण म्हणाला,"मॅडम इथे राजे फॅमिलिबाबत कोणीही काहीच माहिती देणार नाही.तेव्हा शरद म्हणाला,"पोलिसांनी विचारली तरी???पोलीस म्हंटल्यावर तो म्हणाला,"साहेब,तुम्ही विराट राजेबाबत विचारत असाल तर मी सांगतो ....तुझं नाव काय???सांगतो साहेब.पण...इथे नको.जवळच माझे दुकान आहे.तिथे जाऊन बोलूया!
या! या!सर. बसा साहेब.छोटेसे सुंदर उपहारगृह होते.पराग साहेबाना चहा आण रे!!काही खाणार का??काही नकोय!कदम म्हणाले.तर साहेब मी वसंत परब.आम्ही कोकणातले पण गेल्या अनेक पिढ्या मुंबईत गेल्या.या चाळीचा उतरता काळ आणि आमचं बालपण दुर्दैवाने एकाच वेळी सूरु झालं.अनेक बालपण,स्वप्न करपून गेली.त्यातसुद्धा काहींनी फिनिक्स भरारी घेतली.विराट राजे!!!आमच्या शाळेची,चाळीची शान!!दिसायला अतिशय सुरेख,हुशार.विराट नक्की मोठा काहीतरी होणार अशी सगळ्यांना खात्री होती.पण.....पण काय?शेफाली सहजच म्हणाली.नशीब एवढं सरळ नसत ना मॅडम.आम्ही पाचवीत असताना विराटचे वडील वारले.तिघ भावंड आणि आई असे चौघे राहू लागले.विराटची आई अतिशय देखणी होती..एकट्या बाईला अनेक अनुभव यायचे.तरी सुद्धा सगळं सहन करत ती विराट,विजय आणि मीनाला वाढवत होती.दहावी आणि बारावीला विराट गुणवत्ता यादीत आला.त्याने कॉलेज आणि काम सुरू केलं.आता गाडी रुळावर येईल असे वाटत असतानाच...विराटची आई आजारी पडली.कॅन्सर सारख मोठं आव्हान उभे राहिले.घरात कमावते कोणी नाही...छोटी भावंड शिकत होती.विराटपुढे आता काय???हा प्रश्न आक्राळ रूप घेऊन उभा होता. त्यातच एक दिवस कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला बॉबी फर्नांडिझ उपस्थित होता.बॉबीच नाव येताच शरदला समजलं आपण योग्य मार्गावर आहोत.तो कार्यक्रम संपल्यावर बॉबीने विराटला मॉडेलिंगची ऑफर दिली.एका शोचे पाच हजार....रक्कम ऐकून कोणताही विचार न करता विराटने होकार दिला..आई आणि भावंडासाठी....त्याबरोबर सुरू झाला एक नवा प्रवास.
सुरुवातीला सगळं छान होत.विराटच नाव होतं होते.हळूहळू तो नावारूपाला येत होता.आईचे उपचार,मुलांची शिक्षणे.. सगळं नीट होईल.मला भेटला की तो खूप आनंदी दिसायचा.पण...हळूहळू हळूहळू विराट काहीतरी लपवतोय असे मला वाटायला लागले.मी अनेकदा त्याला विचारायचो.तो हसून टाळायचा. रात्री बेरात्री त्याला सोडायला आलिशान गाड्या यायच्या.विराट मॉडेल होता..त्यामुळं मला काही वेगळं वाटलं नाही..पण एक दिवस आमच्या चाळीतील एका तरुणाने बातमी आणली. त्याचा भाऊ वेटर असलेल्या हॉटेलात एका पार्टीत विराट नग्न डान्स करत होता आणि बरेच काही...तरीही लोक विश्वास ठेवत नव्हते.पण कुजबुज सुरू झाली.तेव्हा विराट दुसरीकडे रहायला गेला.तरी मला भेटत असे....भेटला की हसायचा पण मला त्या हसण्यात मला वेदना दिसायची.आणि एक दिवस...चाळीतल्या पोरांनी व्हिडिओ आणला...त्यात अनेक प्रकार होते..त्यात विराट दिसला एका दुसऱ्या तरुणाबरोबर....झपाट्याने बातमी पसरली..... तरीही विराटने कोणाला उत्तर दिले नाही.फक्त चाळीत येणे बंद केले.मात्र एक दिवस व्हायचं तेच झालं...एका पोलीस रेड मध्ये विराट सापडला.....सगळीकडे छि थु झाली...हे सगळं सहन झालं नाही .या धक्क्याने आई गेली.जवळपास तीन महिन्यांनी विराट बाहेर आला.पोरकी झालेली भावंड लहान होती.दादा दादा करून त्याला बिलगत होती..आता विराटवर वेगळा शिक्का लागला.त्याला कोणिही इतर कामे देईना... उलट त्याला धमकावून धंदा करायला लावला त्या ×××××ओम कपूरने.शेवटी हे सगळं असह्य होऊन विराटने आत्महत्या केली.त्यावेळी त्याचा भाऊ पदवीचा अभ्यास करत होता आणि बहीण लहानच होती .भाऊ सगळे विकून निघून गेला...त्यानंतर अनेकदा मी त्यांचा शोध घेतला पण...........वसंत थांबला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होत...शरदने हलकेच त्याच्या खांद्यावर थोपटले.
विजय आणि मीना राजे कुठे असतील??या खुनांचा आणि त्यांचा काही संबंध असेल का???वाचत रहा मायाजाल!!!!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा