विराट राजे!!!! सगळ्या प्रकरणात पहिल्यांदा समोर आलेलं वेगळं नाव.आता या प्रकरणात विराटच्या नावाचा काय संबंध आहे?तीन वर्षांपूर्वी आत्महत्त्या केलेल्या माणसासाठी आज इतक्या लोकांना कोण मारू शकेल??सगळ्या प्रश्नांची उत्तरे दोन नावांवर स्थिर होत होती.विजय आणि मीना!!!इतक्या सरळ हा गुंता सुटणार का????चला पाहूया.
वसंतकडून ऐकलेली हकीकत ऐकून शरदला आशेचा किरण दिसू लागला.शेफाली,विराट आत्महत्त्या केसचा तपास केलेल्या अधिकाऱ्यांना भेट, डिटेल्स काढ. कदम विजय आणि मीनाला शोधा. ते दोघे आणखी प्रकाश टाकू शकतात या प्रकरणावर.समीर तू ओम कपुरवर स्वतः जातीने लक्ष ठेव.आता खुनी त्याच्या मागावर असू शकतो.सगळ्या सूचना देत असताना शरदच्या फोन वर मॅसेज आला.बॉबी .....no more. खुद्द बॉबी फर्नांडिझ च्या फोनवरून असा मॅसेज कसा काय आला?? विचार करता करता शरदने फोन लावला.फोन फक्त वाजत होता पलीकडून प्रतिसाद शून्य....कदम!बॉबीच्या घराकडे वळवा गाडी.कदमांनी सफाईदार वळण घेतलं आणि वेगाने सगळी टीम लोखंडवाला परिसराकडे निघाली.बॉबी आज काय सांगणार होता??अर्ध्या तासात सगळी टीम बॉबीच्या फ्लॅटवर पोहोचली.एका आलिशान बिल्डिंगमधले पेंट हाउस.. कदमांनी वॉचमनला बोलावलं,"बॉबी फर्नांडिझ ??वॉचमन घाबरला,"बावीसवा मजला साहेब".कदम एन्ट्री रजिस्टर तपासा.खाली चौकशी करा.शरद आणि फोटोग्राफर ताबडतोब वर पोहोचले.बॉबी बेडरूममध्ये निर्वस्त्र पडला होता.गळा चिरला होता.ठिकठिकाणी चावल्याच्या खुना होत्या. अंगावर कोणतीही खूण दिसेना.एवढ्यात शरदने पायच्या तळवा पाहिला. त्यावर एक चिन्ह चाकूने कोरल होत.शरदने फोटो काढला.जर हे चिन्ह विराजच्या नावातील असेल तर त्याचा अर्थ J असा असायला हवा.हॅलो,पोलीस स्टेशन!इन्स्पेक्टर शरद हिअर.सगळे डिटेल्स सांगून शरद बाहेर पडणार एवढ्यात...त्यांची नजर ऐका डेस्ककडे गेली.त्यावर काहीतरी लिहिले होते.शरद जवळ गेला.बॉबीने अगदी घाईत एका कागदावर लिहिलं होतं.भूतकाळात केलेल्या पापाची शिक्षा भूतकाळ देतोच...शेजारी एक चावी होती.शरदने दोन्ही वस्तू ताब्यात घेतल्या.कदम खाली चौकशी करत असताना शरद परत आला,"चला कदम,गाडी हेड ऑफिसला घ्या.cctv फुटेज मागवा.कदम गाडीत बसले,"साहेब काल रात्री बॉबी उशिरा घरी आला.सोबत एक पोरगा होता.मास्क होता .वॉचमनला एवढंच माहीत आहे...कदम बोलत असताना शरद विचार करत होता.एवढ्यात.....
समीर फोनवर होता,"सर,एक भयावह बातमी आहे".शरद शांतपणे म्हणाला,"बोल!कोणाचा होता पुढचा नंबर.....इन्स्पेक्टर राणे.काय????शरद जोरात ओरडला.कुठे?समीर!हॉटेल लोटस परडाइझ!रम नंबर 303.शरदला रूम नंबर सांगताच त्याच्या डोक्यात आग गेली.पण..एका रात्री दोन खून की???एका मागोमाग???कदम गाडी फिल्मसिटीकडे घ्या.कदम हसले,"साहेब काहीतरी खाऊन घ्या!सकाळपासून फक्त चहा आणि स्नॅक्स वर आहे तुम्ही.एवढे बोलून कदम सरळ एका हॉटेलसमोर थांबले.जेवण चालू असताना शरदला राणे आठवत होता.एका तरुण, उमद्या पोलीस अधिकाऱ्याची अशी अखेर?पैसे,सेक्स आणि दारूची चटक माणसाला या थराला घेऊन जाते??समोर आलेले जेवत असताना शरदच्या डोक्यात विचारांची वादळ चालूच होती.जेवण करून बाहेर पडल्यावर गाडी वेगाने धावू लागली.हॉटेल लोटस परडाईझ !!शरद उदास होऊन म्हणाला.
गाडीने लॉबीत प्रवेश करायच्या आधी मीडिया हजर होता.समीर त्यांना कन्ट्रोल करत होता.शरद उतरून जात असताना एक पत्रकार म्हणाला,"तुम्हाला स्वतःची लोक सुद्धा वाचवता येत नाहीत का?हा राणे कोणाबरोबर झोपला होता रात्री इथे??पेज थ्री पार्ट्यात पडीक असायचा त्या×××च्या गळ्यात गळे घालून..शरदला संताप अनावर झाला.कदम शरदला लिफ्टकडे घेऊन गेले.रुम न 303...नुसतं नाव घेतलं तरी शरदला पुढे तो नागडा राणे आणि ओम कपूर दिसायचा निर्लज्ज हसताना...आणि ती मिसेस कपूर नावाची बाई.कदमांनी लॅचने दरवाजा उघडला.राणे समोर पडला होता.देखणं,बांदेसुद शरीर असलेला राणे पोलीस दलात फिटनेस आयकॉन म्हणून ओळखला जाई. पण त्या बांदेसुदपणाचे खरे कारण मोजक्या अधिकाऱयांना माहीत होते.राणेंचा गळा कापला होता.शेजारी दारूच्या बाटल्या होत्या.शरदने cctv फुटेज मागवलं.टेबलावर हात आपटत म्हणाला,"वाटलंच मला,बुरख्यात तरुण पोर आणायची सवय कायम असणार××××××ची.मृतदेहावर असलेल्या चिन्हाचा फोटो त्याने प्रियाला पाठवला.सगळी प्रक्रिया आटोपून घरी जायला रात्रीचे बारा वाजून गेले होते.शॉवरखाली उभं राहिल्यावर आंबलेलं अंग मोकळं होऊ लागल.मस्त अंघोळ करून शरद छान झोपी गेला.
सकाळी उठल्या उठल्या प्रियाचा मॅसेज आला ,पी एम रिपोर्टनुसार राणेंचा खून दिवसा आणि बॉबीचा रात्री झाला आहे.दोन्ही खुनात वापरलेले हत्यार सेम आहे.पण एक गोष्ट चक्रावणारी होती.यावेळी राणेंच्या बॉडीवर असणारे चिन्ह इंग्रजी S आणि बॉबीच्या अंगावरच्या चिन्हाचा अर्थ I असा आहे.म्हणजे अंदाज साफ चुकला होता.virasi याला कोणताच अर्थ लागत नव्हता.शरद अंघोळ करताना हाच विचार करत होता.तयार होऊन शरद बरोबर नऊ वाजता ऑफिसला आला,"शेफाली काही डिटेल्स मिळाले का? येस सर.विराट राजेने तीन वर्षांपूर्वी रेल्वे खाली आत्महत्त्या केली.खिशातील कागदपत्रांवरून ओळख पटली.त्याने मरण्यापूर्वी स्वतःच्या चेहऱ्यावर ऍसिड ओतले होते.व्हॉट????इट्स स्ट्रेनज!हो ना सर !!!कदम तुमच्याकडे काय माहिती???सर विजय आणि मीना सध्या रत्नागिरीत स्थायिक आहेत.विजयचा छान कापडाचा बिझनेस आहे.मिनाचे लग्न झालेय.एकंदर पाहता ते अशा प्रकारत पडतील असे वाटत नाही.शरद हसला,"कदम कोणतीही शक्यता नाकारून चालणार नाही.दोघांनाही चौकशीला बोलवा.समीर मात्र अस्वस्थ होता.समीर काय झाले??सर कालपासून दर्शन पटेल गायब आहे!त्याचा फोन घरीच आहे.याचा अर्थ काय???एवढ्यात प्रसादचा मॅसेज आला.सर मला शशांकच्या घरी आलेल्यापैकी एकाचे नाव आठवतंय.तो फोटोग्राफर आहे अशी ओळख त्याने करून दिली होती.समीर ने प्रसादला कॉल केला,"बोल प्रसाद,काय आठवलं आहे तुला?सर मला एक नाव आठवतंय सुधीर घोष.तो फोटोग्राफर आहे असे शशांक म्हणाला होता.प्रसाद अर्ध्या तासात दिलेल्या पत्त्यावर पोहोच.शरदची परवानगी घेऊन समीर बाहेर पडला.
इतक्यात शरदला आठवले.बॉबीच्या घरात सापडलेली चावी.शेफाली ही चावी कशाची असेल?सर ही बहुतेक बँक लॉकरची चावी असणार.पण कोणत्या बँकेची?बॉबीने ही चावी ठेवली म्हणजे लॉकरमध्ये काहीतरी असणार सर.शेफाली बॉबीचा फोन अनलॉक करा.find his all details. शेफालीने लगेच सायबर एक्सपर्टना बोलावले.किती वेळ लागेल?शरदने अधीरतेने विचारले.दहा मिनिटं सर.ते दहा मिनिटं शरदला दहा मिनिटांसारखे वाटत होते.yess ,सर हे पहा.सगळे डिटेल्स काढून त्यांनी दिले.शेफाली कोर्टात अर्ज सादर करा.बॉबीचा लॉकर त्याशिवाय बँक उघडू देणार नाही.शेफाली लगेच बाहेर पडली.आता पुढील रहस्य उलगडण्यासाठी लॉकर उघडणे आवश्यक होते.इकडे कदमांनी रत्नागिरी पोलीस स्टेशनला फोन लावून विजय आणि मिनाकडे चौकशी करायला सांगितले.
चिन्हांचा क्रम बदलला कसा?विजय आणि मीना यात सहभागी असतील का???बॉबीच्या लोकरमधून काय सापडेल?सुधीर घोषचा सहभाग काय???वाचत रहा मायाजाल....
चिन्हांचा क्रम बदलला कसा?विजय आणि मीना यात सहभागी असतील का???बॉबीच्या लोकरमधून काय सापडेल?सुधीर घोषचा सहभाग काय???वाचत रहा मायाजाल....
