मायेचा आधार
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
"आदित्य, उठ! रोज तुला का उठवावे लागते? आता लग्नाचे वय झाले तुझे "सुशीला म्हणाल्या.
"आई, रोज तुझा चेहरा बघायचा असतो गं, म्हणून मी लवकर उठत नाही," आदित्य सुशीलाला मिठी मारत म्हणाला.
"तुझे काही पण असते," सुशीला म्हणाल्या.
"आई, तू माझ्यासाठी सगळं जग आहे," आदित्य म्हणाला.सुशीला खूप प्रेमाने आदित्यकडे बघतात.
"आता नाश्ता तयार ठेवायला सांग ना, मला मिटिंग आहे. मी लवकर ऑफिसला जाणार आहे," आदित्य म्हणाला.
सुशीला किचनमध्ये गेल्या. नोकरांना लवकर नाश्ता बनवायला सांगितला आणि त्या बाहेर आल्या.
"हॅलो मॅडम," कुरकुरे म्हणाले.
"हॅलो कुरकुरे," सुशीला म्हणाल्या.
"सर तयार झाले का? मिटिंग आहे," कुरकुरे म्हणाले.
"आधी त्याला नाश्ता करू दे, तू पण कर, मग मीटिंगला जायचं," सुशीला म्हणाल्या.
"हो मॅडम," कुरकुरे म्हणाले.
आदित्य तयार होऊन आला.
"हॅलो कुरकुरे," आदित्य म्हणाला.
"हॅलो सर, गुड मॉर्निंग," कुरकुरे म्हणाले.
"गुड मॉर्निंग," आदित्य म्हणाला.
"आता लवकर नाश्ता करून घ्या," सुशीला म्हणाल्या.
दोघांनी नाश्ता करून घेतला. दोघेही ऑफिसला जायला निघाले.
"सर, तुमची आई खूप छान आहे," कुरकुरे म्हणाला.
"मायेचा झरा आहे. खूप प्रेम करते, खूप जीव लावते. आजारी पडल्यावर, रात्रंदिवस माझ्या उश्याजवळ बसलेली असायची ती," आदित्य म्हणाला.
"खरंच बोलत आहे मी तुमचा पिए असून, मला रोज नाश्ता केल्याशिवाय ऑफिसला जाऊ देत नाही," कुरकुरे म्हणाले.
ते ऑफिसमध्ये गेले. आदित्य लगेच त्यांच्या केबिनमध्ये निघून गेला. टेबलवर फाईल होत्या त्याने फाईल वाचून काढली. लगेच मीटिंगला निघून गेला.
त्यांची मीटिंग छान झाली. त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला. आदित्य खुश होता.
"काँग्रॅच्युलेशन्स आदित्य," प्रताप म्हणाले (आदित्यचे काका).
"थँक्यू काका! " आदित्य म्हणाला.
आदित्य त्याचे काम करायला, त्याच्या केबिनमध्ये निघून गेला.सुशीला बसल्या होत्या. त्यांना अचानक चक्कर आली. त्या खाली पडल्या तेव्हा एका नोकराला आवाज गेला . तो बाहेर आला. त्याने पाहिले—सुशीला पडल्या आहेत. त्याने लगेच आदित्यला कॉल केला.
आदित्यने पाहिले कोणाचा कॉल आहे. घरून कॉल आला होता. त्याने लगेच कॉल घेतला.
त्याने सगळं ऐकून घेतलं. तो लगेच ऑफिसमधून निघाला.आदित्यने कुरकुरेला पण काही सांगितलं नाही. गाडीत त्याने फास्ट चालवली. तो घरी पोहोचला.
नोकरांनी सुशीलाला सोफ्यावर झोपवलं होतं. सगळे तिथेच उभे होते.
"काका, डॉक्टरला कॉल केला का?" आदित्य म्हणाला.
तो सुशीला जवळ गेला. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होता
"आई… आई… आई… उठ ना. आई… उठ गं," आदित्य इमोशनल झाला होता. त्याच्या डोळ्यांत पण पाणी आलं होतं. इतक्यात डॉक्टर आले.
"आई… आई… आई… उठ ना. आई… उठ गं," आदित्य इमोशनल झाला होता. त्याच्या डोळ्यांत पण पाणी आलं होतं. इतक्यात डॉक्टर आले.
"आदित्य, मी बघतो," डॉक्टर म्हणाले.
"अंकल, बघा ना, आईला काय झालं आहे?" आदित्य म्हणाला.
"मी बघतो," डॉक्टर म्हणाले. त्यांनी सुशीलांना चेक केलं.
"डॉक्टर, काय झालं आहे? तिला चक्कर का आली होती?" आदित्य काळजीने विचारतो.
"त्यांचं बीपी वाढलं आहे. त्यांना आराम करू द्या. त्यांची काळजी घ्या," डॉक्टर एवढे बोलून जायला निघाले. नोकराने डॉक्टरांची बॅग घेतली. तो डॉक्टरांच्या मागे गेला.
आदित्य सुशीला जवळ बसला. त्यांना जाग येण्याची वाट बघू लागला.संध्याकाळ झाली. कुरकुरे ऑफिसमध्ये बसले होते. त्यांचं मन तिथे लागत नव्हतं.
"सर असे निघून का गेले? घरी काही झालं असेल का?" बरेच विचार त्यांच्या डोक्यात येत होते.
"मी त्यांच्या घरी जाऊन बघू का?" ते मनात विचार करत आदित्यच्या घरी येण्यासाठी निघाले.
"मी त्यांच्या घरी जाऊन बघू का?" ते मनात विचार करत आदित्यच्या घरी येण्यासाठी निघाले.
सुशीलांना जाग आली. त्या डोक्याला हात लावत म्हणाल्या, "तू लवकर का आलास?"
"तुला बरं वाटतं आहे का? तू तुझी काळजी घे ना. मी किती घाबरलो होतो," आदित्य म्हणाला.
"मलाच समजलं नाही कायं झालं? " सुशीला म्हणाल्या.
"सर, तुम्ही असे का निघून आलात?" कुरकुरे काळजीने म्हणाले.
आदित्य बोलेल की, कुरकुरेनी सुशीलांकडे बघितलं. "मॅडम, तुम्हाला कायं झालं?" कुरकुरे म्हणाले.
"ती चक्कर येऊन पडली. मला घरून कॉल आला. मी तसाच निघालो," आदित्य म्हणाला.
"आता मॅडम बरं वाटतं आहे ना? काळजी घ्या," कुरकुरे म्हणाले.
पुढचे काही दिवस आदित्य ऑफिसमध्ये जात नव्हता. सगळे कुरकुरे बघत होते.नवीन प्रोजेक्ट मिळाला होता. तो लवकर करायचा होता. आदित्य ऑफिसमध्ये येत नसल्याने, तो प्रोजेक्ट पूर्ण होत नव्हता. प्रताप चिडले होते. ते आदित्यच्या घरी गेले. त्यांनी रागातच आदित्यला हाक मारली.आदित्य रूममधून बाहेर आला.
"काका, तुम्ही बसा," आदित्य म्हणाला.
"तू ऑफिसला का येत नाही आहेस? नवीन प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. तुला बरं नाही आहे का?" प्रताप म्हणाले.
"मी मस्तच आहे. आईला बरं नाही आहे. तिच्यासाठी मी घरी होतो," आदित्य म्हणाला.
"ती तुझ्या घरात काम करत होती. कायं आई… आई… करत आहेस? ती तुझी आई थोडी आहे," प्रताप म्हणाले.
"तुम्ही मोठे आहात म्हणून मी केव्हाचं ऐकून घेत होतो पण ती माझी आई आहे. परत असं बोलायचं नाही. तिच्यासाठी असं किती प्रोजेक्ट मी रद्द करेन," आदित्य म्हणाला.
"तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? आपलं किती नुकसान होईल? " प्रताप म्हणाले.
"ते मी कमवेन पण मला आई नाही मिळणार," आदित्य म्हणाला.
"कायं आई आई करत आहेस? मी तुझा काका आहे. तुझ्या बाबांचा सख्खा भाऊ आहे," प्रताप म्हणाले.
आदित्य आधी तर हसला.
आदित्य आधी तर हसला.
"हो, तुम्ही माझे काका आहात ना? मी पंधरा वर्षांचा होतो तेव्हा माझे आई-बाबा गेले. तुम्ही मला सांभाळलं का? मायेने जवळ घेतलं का? माझे आजार बघितले का? फक्त पैसे देऊन जात होता. माणसाला फक्त पैशाची नाही, मायेची गरज असते. तेव्हा मला आईने जवळ केलं. मला सांभाळलं. मायेने घास भरवला. आजारी असताना माझ्याजवळ बसायची. रात्री जागी राहायची. तुम्ही माझे असून तेव्हा आलात का? तिनेच माझं सगळं केलं. मी तिच्यासाठी काही पण करेन. ती माझी आई आहे. उद्यापासून तुम्ही तुमचं दुसरं ऑफिस सुरू करा," आदित्य पण रागात बोलत होता.
सुशीला आदित्य जवळ आल्या होत्या. आदित्यने सुशीलांना मिठी मारली.
"तू माझी आई आहेस. कोणी काही पण बोलू दे," आदित्य म्हणाला.
"तू माझी आई आहेस. कोणी काही पण बोलू दे," आदित्य म्हणाला.
प्रताप तिथून रागात निघून गेले.
"आदित्य, ते मोठे आहेत. ते बोलले ते खरंच तर आहे. माझ्यासाठी असा किती दिवस तू घरी राहणार आहेस?" सुशीला म्हणाल्या.
"आई, आता बोललीस, परत असं बोलू नको. मला जेव्हा गरज होती तेव्हा तू माझ्यासोबत होतीस," आदित्य म्हणाला.
"आता मला सून पण घेऊन ये," सुशीला म्हणाल्या.
"तुला आवडेल तिच्यासोबतच मी लग्न करेन," आदित्य म्हणाला.
सुशीलाच्या डोळ्यातून ओघळणारा आसवांचा थेंब आदित्यने पुसला. सुशीलाने आदित्यच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवला.
"आई रक्ताने नव्हे तर मायेने होते. खरी आई तीच, जी आपल्याला आयुष्यभर प्रेमाने कवटाळते."
समाप्त
दिपाली चौधरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा