Login

मायेच्या नात्याची ऊब भाग - 1

Jithe Mayechya Natyachi Oob as the Thithe Fakt Jivala Japala Jato
डिसेंबर - जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
"मायेच्या नात्याची ऊब"
भाग-1
​"बघ ना शार्वी बघता, बघता तीन महिने कसे गेले कळलेच नाही. यायचं, यायचं म्हणता म्हणता आलो पण आणि आता लांब आहे चांगले तीन महिने आहेत म्हणता म्हणता निघायचे दिवस जवळ आले पण!" आईनं हॉलमध्ये भरून ठेवलेल्या बॅंगांकडे बघत डोळ्यांच्या कडा पुसल्या.
राघवच्या हे लक्षात आले. त्यांने आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आई खरंच तुम्ही आलात आणि घर कसं घर झाले. सगळ्या वस्तूंना पण तुम्ही दोघांनी जागेवर राह्यची शिस्त आणि कार्यक्षमता लावली. घर कसं घरासारखे वाटू लागले होते.
आता पुन्हा आम्हाला सवय करून घ्यावी लागेल या सगळ्याची.
शार्वी कोपऱ्यात सोफ्यावर बसून हे सगळं बघत होती. तिचा कंठ दाटून आला.
"हो ना आई बघता, बघता तीन महिने कसे गेले समजलं नाही. तुम्हीं येणार म्हणून राघवनं आणि मी किती आधी पासून रजा आणि विकेंड्सचे प्लॅनिंग केले होते. तसे अटोक्यात आणलं सगळे पण दिवस भूरकन् उडून गेले. तुम्ही विश्रांतीसाठी, फिरण्यासाठी आलात पण आल्यापासून तुम्ही दोघे नुसते कामच करत अहात."
​तुम्ही येणार म्हणून खूप आनंदात होतो आम्ही, पण आता तुम्ही जाणार म्हटल्यानंतर उगाच आत्तापासूनच करमत नाही बघ!
​"असेच असते बाळा," बाबांनी चष्माच्या वरून राघवकडे पाहत म्हटले. "पाहुणं काय किंवा आपली प्रेमाची माणसं घरी आलेली चालतात पण गेलीं की घर खायला उठतं!
" आता तुम्ही दोघे अहातच एकमेकांना पण तरीही!".... बाबांचं हे वाक्य शार्वीच्या काळजात लख्खदिशी आरपार गेले.
शार्वी म्हणाली, "हो ना आई तू आल्यापासून स्वयंपाक घराचा तर सगळा कब्जाच घेतला होतास. खरं सांगू, सुरुवातीला मी थोडी वैतागले होते! माझ्या त्या 'फास्ट-फूड' पद्धतीला तुम्ही पूर्णपणे बदलून टाकलेत. राघवला मी ऑफिसला जायच्या गडबडीत कधी सॅंडविच तर कधी ओट्स देऊन बोळवण करायचे. पण तू आल्यापासून साहेब रोज गरमागरम जेवायला लंचमध्ये घरी येऊ लागले आहेत. तर रोज नवीन, नवीन पदार्थ, गरम गरम पोळी ताटात पडत आहेत." आई हसली, तिच्या चेहऱ्यार समाधानाची लकेर उमटली.
"अगं आई आहे मी, जावईबापूंना आणि तुला तीन महिने तर मिळाले खाऊ घालायला. तसे शनिवार-रविवार तर आरामच देतात ना आम्हाला. परत चालू होईल तुमचे ते डाएटच्या नावाखाली आपलं ते 'सॅलड आणि स्मूदीचे प्रकार'."
"म्हणूनच तुम्हाला नेहमी सांगायचो आई, अशा सवयी लावू नका आम्हाला, पण तुम्ही काही ऐकलं नाही. वजन देखील बघ आमचं किती वाढलंय, गाल बघ आमचे किती वर आले आहेत! आणि तुमचे मात्र कमी वजन कमी झाले. काय ती गोष्ट आहे ना, लेकीकडे जाईल तूप-रोटी खाईल, लठ्ठमुठ्ठ होईल मग परत येईल!"इथे मात्र तुमचे कमी झाले. राघवनं शार्वीला कोपरखळी मारली.
आई बघ हा कसा बोलतो म्हणत शार्वीने आईच्या कमरेला मिठी मारली. "पण हे मात्र खरंय, आता मला स्वयंपाक जमेल की नाही असं वाटायला लागले आहे," शार्वी म्हणाली.
​आई-बाबांचे भारतात जाण्याचे दिवस जसजसे जवळ येत होते तसं तसं लेकीचे मन कासावीस होत होतं.
कसं असतं ना आईचं मन पण शेवटी, आई ती आईच बरका! पण या कथेत बाबाही काही कमी नाहीत हो! बघूया पुढील भागात
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही "
0

🎭 Series Post

View all