"मायेच्या नात्याची ऊब ऊब" भाग-3
दिवस भर दोघांचेही काहींना काही उद्योग चालूच असायचे. भारतात असताना वेळ कसा घालवायचा ह्या विचारात दोघे एकमेकांची तोंड बघत बसत. इथे आल्यावर घड्याळ अजून कमी वेगाने धावेल का असं दोघांनाही वाटायचे.
दोघेही अगदी मनापासून सगळे करत होते.
आता भारतात परतीच्या प्रवासासाठी शेवटचे दोन दिवस उरले होते.
बाबांनी संध्याकाळी दोघेही आॉफस मधून परत आल्यावर राघवला बोलावले, "राघव इकडे ये. रागावू नको पण, तुझ्या गॅरेजमधले मी इकडचे तिकडचे सगळे आवरले आहे. तुझे टूल्स छान आवरून ठेवले आहे. प्रत्येकाला छान लेबल लावून ठेवले आहे. नवीन भाषेनुसार प्रत्येकाची फॅमिली बनवली आहे. आणि" बरका रे बाळा तुझे ते जुनं लॉन मूव्हर होते ना विदाऊट बॅटरीवालं, त्याचं ऑईल बदलले आहे. वापरून बघ, छान काम करते आहे. मागची गार्डन मी साफ केली बघ त्यांनी. कधी नवीन, कधी जुनं, दोन्हीही वापर बरं. आता अडकत पण नाही."
आणि हो, तुझ्या स्टडीरूममध्ये तुझ्या कारचे इन्शुरन्सचे पेपर्स मी फाईल करून त्या निळ्या फोल्डरमध्ये ठेवलेत. पुढच्या महिन्यात रिन्यू कर आठवणींने. आणि ते दोन Amazon पार्सल रिटर्नला टाक, विसरून जाशील, टेबलवर काढून ठेवले आहेत."
सध्या मोठ्या प्रोजेक्टवर काम चालू होते राघवचे, त्यात प्रमोशन झालेले, जबाबदारी वाढलेली.त्यात तो इतका व्यस्त असायचा की घरच्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे त्यांचे लक्षच जात नसे.
पण सांगता न सांगता बाबांनी या तीन महिन्यांत अशी काळजी घेतली होती. राघव हळवा झाला."बाबा, तुम्ही कशाला हे सगळं..." राघवनं म्हणायचा प्रयत्न केला.
"अरे आता मी रिटायर झालो असलो तरी या सगळ्या कामाची सवय आहेच की! आणि तुमची धावपळ बघवत नाही रे आम्हाला," बाबांनी मायेने राघवच्या पाठीवर थाप मारली.
जेवणाची वेळ झाली.आईने आज जावईबापूंच्या आणि लेकीच्या आवडीचं वरण-बटाट्याची भाजी, भजी आणि श्रीखंड-पुरीचा बेत केला होता.
जेवताना आई म्हणाली, "शार्वी, राघव, फ्रीजमध्ये बघा. वरच्या कप्प्यात मी चार डबे भरून ठेवलेत. राघव, तुला आवडते ती शेंगदाणे लसणाची चटणी आणि तुझ्यासाठी आळूवडी आणि शार्वी, तुझ्या आवडीचे लिंबाचे लोणचे छोट्या बरणीत डाव्या बाजूला ठेवले आहे ग!" आणि हो, भोपळ्याचे घारगे आणि पुरणपोळी, कटाची आमटी पण तुमच्यासाठी डीपफ्रीजमध्ये करून ठेवलीये. बाबांनी वरती तारीख पण लिहून ठेवली आहे. जेव्हा ऑफिसवरून थकून याल, तेव्हा फक्त गरम करा।"
शार्वीचा घास घशातच अडकला. राघवही मान खाली घालून जेवत होता. परदेशात एकटं राहताना आईच्या हातच्या अन्नाची किंमत काय असते, हे त्या दोघांनाही चांगलंच ठाऊक होतं.
राघव विचारातच जेवला. आईच्या मायेने करणाऱ्या सासूबाई तर नाहीच हि आईच आहे आपली. नशीबवान आहे मी मला दोन आई मिळाल्या.
आई इतकेच आपण त्यांची चेष्टा करतो "आई तू पुन्हा तुम्ही आमची सवय बिघडवून जाणार अहात!" राघवने सणाच्या प्रयत्न करत म्हटले खरे पण त्याचे देखिल डोळे पाणावले होते.
परतीचा प्रवास काही तासातच सुरू होणार होता. काय होणार पुढे परतीचा प्रवास सुखकर कि मनामनांचे ओझे घेऊन पाहूया पुढील भागात.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन fevorite आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा