Login

मायेच्या नात्याची ऊब भाग - 7

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
"मायेच्या नात्याची ऊब" भाग-7
मागच्या भागात आपण पाहिले राघवचे बॉस घरी डिनरला येणार होते त्याना भारतीय जेवण आवडत होते.
काय करू कसे करू या दंव्दात अडकलेली शार्वीचा पेच आईनं एका दमात सोडविला.
आता पुढे
उगाच नव्हती आईच्या केसात चांदी उगवायला लागली. अनुभवाचे बोल ते.कालचा प्रसंग आईला सांगताना शार्वीच्या तोंडात तीळ भिजत नव्हता.
आई कसं ग जमते हे सगळे. काही नाही शार्वी हा नजरेचा खेळ असतो सगळा. आज्जीच्या हाताखाली स्वयंपाक करत मी शिकले बरका!
आईकडे असताना अशीच तुझ्यासारखी बिनधास्त. वेळ आले कि, पाहून घेईल या तत्त्वाची.
माहेरची पध्दत वेगळी सासरची वेगळी माहेर कोकणस्थ सासर देशस्थ दोन टोकं एकिकडे खोबऱ्याचा मारा दुसरीकडे शेंगदाण्यावर जोर. विचारू नको.
माहेरचे पदार्थ कधी सासरी चाललेच नाही तुझ्या आज्जीला. भारी शिस्तीची होती.चल जाऊ दे नको त्या आठवणी. "झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे"
"आई कसं ग सगळे सहन केलेस तुझ्या जागी मी असते ना तर?"
पुरे पुरे सारखे तेच ते कळलं सगळे मला. आता जरा समंजस बना मॅडम आणि छान छान संसार करा. मग जिंकले.माझा सगळा झालेला त्रास विसरून जाईल.
फार नशीबवान आहेस सासूसासरे छानच मिळाले आहेत. बरं झालं आठवण झाली. आल्यापासून तुझ्या सासूबाईशी निटसं बोलणं झालं नाही. करेल उद्या त्यांना फोन. आणि हो तुझा फोन झाला तर सांग आई आठवण काढत होती म्हणून. हो नक्की म्हणत दोघींनीही एकमेंकींचा निरोप घेतला.
आई-बाबांना जाऊन आता महिना उलटला होता. घराला पुन्हा एक प्रकारची 'स्वदेशी' शांतता मिळाली होती.
शार्वी आणि राघव आपल्या रोजच्या धावपळीत रुळेल होते. पण या रुळण्यातही एक 'शिस्त' होती, जी आई-बाबांनी नकळत त्यांच्यात पेरली होती.
​राघवच्या ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या क्षणी कसोटी लागली.तो ज्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होता, त्यात क्लायंटकडून शेवटच्या क्षणी 'मागील सहा महिन्यांच्या डेटा व्हॅलिडेशन रिपोर्ट'ची मागणी आली.
हा डेटा अत्यंत तातडीने सादर करणे आवश्यक होते. अन्यथा संपूर्ण प्रोजेक्टचे काम एका आठवड्यासाठी थांबणार होते.
प्रोजेक्ट हेड संतापले होते. टीममध्ये एकच गोंधळ उडाला. सगळ्यांच्या फाईल्स वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. जुने कागद शोधणे म्हणजे 'गवत-गंजातून सुई शोधण्यासारखे' झाले होते.
​राघवने शांतपणे खुर्चीवर रेलून डोळे मिटले.
गोंधळलेल्या टीमकडे दुर्लक्ष करून त्याला त्याच्या बाबांची आठवण झाली 'तुझे टूल्स छान आवरून ठेवले आहेत', 'इन्शुरन्सचे पेपर्स मी फाईल करून त्या निळ्या फोल्डरमध्ये ठेवलेत.' बाबांच्या या शांत, पण कार्यक्षम वावराची आठवण झाली.
बाबांनी घरातल्या प्रत्येक वस्तूला 'जागेवर राहायची शिस्त' लावली होती. ती नुसती शिस्त नव्हती, तर ती 'वेळेची किंमत' होती.
राघवने स्वतःच्या कम्प्युटरवरचा 'प्रोजेक्ट डॉक्युमेंट्स' नावाचा फोल्डर उघडला. टीममधील इतर सदस्य डिजिटल फाईल्सच्या ढिगाऱ्यात हात मारत होते, तर राघवने 'बाबा सिस्टीम' आठवून काम सुरू केले. काय जादू झाली असेल राघवला काय आठवले असेल सगळे सगळे पाहूया पुढील भागात.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all