"मायेच्या नात्याची ऊब" भाग - 8
मागच्या भागात आपण पाहिले शार्वी आणि आईचा भावनिक फोन, राघववर आॉफस च्या कामाचा लोड, राघव ज्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होता त्यात क्लायंटकडून शेवटच्या क्षणी मागील सहा महिन्यांच्या डेटा व्हॅलिडेशन रिपोर्टची मागणी.
तेंव्हा बाबांच्या शांत पण कार्यक्षम वावराची आठवण आली.
आता पुढे
हा डेटा अत्यंत तातडीने सादर करणे आवश्यक होते, अन्यथा संपूर्ण प्रोजेक्टचे काम एका आठवड्यासाठी थांबणार होते. प्रोजेक्ट हेड संतापले होते. टीममध्ये एकच गोंधळ उडाला. सगळ्यांच्या फाईल्स वेगवेगळ्या ठिकाणी होत्या, आणि जुने कागद शोधणे म्हणजे 'गवत-गंजातून सुई शोधण्यासारखे' झाले होते.
राघवने शांतपणे खुर्चीवर रेलून डोळे मिटले. गोंधळलेल्या टीमकडे दुर्लक्ष करून त्याला त्याच्या बाबांची आठवण झाली. 'तुझे टूल्स छान आवरून ठेवले आहेत', 'इन्शुरन्सचे पेपर्स मी फाईल करून त्या निळ्या फोल्डरमध्ये ठेवलेत.' बाबांच्या या शांत, पण कार्यक्षम वावराची आठवण झाली. बाबांनी घरातल्या प्रत्येक वस्तूला 'जागेवर राहायची शिस्त' लावली होती. ती नुसती शिस्त नव्हती, तर ती 'वेळेची किंमत' होती.राघवने स्वतःच्या कम्प्युटरवरचा 'प्रोजेक्ट डॉक्युमेंट्स' नावाचा फोल्डर उघडला. टीममधील इतर सदस्य डिजिटल फाईल्सच्या ढिगाऱ्यात हात मारत होते.
तर राघवने 'बाबा सिस्टीम' आठवून काम सुरू केले.
बाबांनी त्याला एकदा सांगितले होते, "राघव, वस्तू किंवा कागदपत्रे नेहमी 'कामाच्या गरजेनुसार' न ठेवता 'तारखेनुसार' ठेव, म्हणजे जुनी गोष्ट शोधणे सोपे जाते." राघवने त्याचे सर्व काम 'तारखेनुसार' आणि 'वर्गीकरणानुसार' फाईल केले होते. त्याने पटकन सहा महिन्यांपूर्वीच्या तारखेचा फोल्डर उघडला.
'व्हॅलिडेशन रिपोर्ट्स' उप-फोल्डरमध्ये त्याला आवश्यक असलेला डेटा 'एका क्लिकवर' मिळाला. तो डेटा केवळ मिनिटाभरात त्याने प्रोजेक्ट हेडसमोर सादर केला. प्रोजेक्ट हेड आणि टीममधील बाकीचे लोक अवाक् झाले.
"राघव, तू हे इतक्या पटकन कसं शोधलंस? इतका जुना डेटा इतक्या शांतपणे कसा मिळवलास?" प्रोजेक्ट हेडने विचारले.राघवने स्मित केले. "मी माझ्या सासऱ्यांकडून शिकलो. 'शिस्त' ही फक्त घरातल्या कपाटांसाठी नसते, तर ती मनातल्या कामाच्या फाईल्ससाठीही लागते. त्यांनी माझ्या कामाच्या फाईल्सला 'तारखेनुसार' वर्गीकरण करायला शिकवले."
राघवचे काम यशस्वी झाले. त्याच्या या 'शिस्तबद्ध वावरा'मुळे प्रोजेक्टचे मोठे नुकसान टळले आणि त्याचा 'प्रमोशन'चा मार्ग अधिक प्रशस्त झाला.त्या रात्री घरी आल्यावर त्याने शार्वीला सर्व हकीकत सांगितली.शार्वीने त्याला आई-बाबांनी दिलेली 'मायेची ऊब' आठवण करून दिली. "बाबांनी तुला गॅरेजमध्ये शिकवलेले 'टूल्स' सांभाळायचे तत्त्वज्ञान आज तुला ऑफिसमध्ये उपयोगी पडले. त्यांनी फक्त कागद नाही, तर 'कामाची पद्धत' फाईल करून दिली होती."राघव गार्डनमध्ये गेला. त्याने तिथे ठेवलेले जुने, पण बाबांनी ऑईल बदलून दुरुस्त केलेले लॉन मूव्हर पाहिले. 'कधी नवीन, कधी जुनं, दोन्हीही वापर बरं,' बाबांचे शब्द त्याला आठवले.
त्याने लॉन मूव्हर सुरू केले. ते अगदी नव्यासारखे काम करत होते. राघवच्या मनात एक विचार आला. आयुष्यातल्या 'जुन्या' शिकवणी, 'शिस्तीचे' नियम आणि 'मायेचा' आधार हे कधीही जुने होत नाहीत. ते नेहमीच कामाला येतात. बाबांनी दुरुस्त केलेले ते लॉन मूव्हर म्हणजे नुसते यंत्र नव्हते, तर 'जुन्या अनुभवाचे' प्रतीक होते, जे आजही नव्या उत्साहाने काम करत होते.
त्याला जाणवले की, आई-बाबांनी फक्त त्यांच्यासाठी जगण्याची सोय केली नव्हती, तर त्यांना 'यशाचा' आणि 'शांततेचा' एक मजबूत पाया दिला होता.
शेवटी काय हो जुनं ते सोनं खणखणीत शंभर नंबरी बरका!
बऱ्याच गोष्टी असतात ज्याची आपल्याला त्याक्षणी कटकट वाटते.पण प्रत्यक्ष वेळ येते तेंव्हा ......
पाहूया पुढील भागात .
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा