Login

" मायेच्या नात्याची ऊब" - भाग - 17

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
मायेच्या ऊबचा दुहेरी डोस
शार्वी आणि राघवची 'गोड बातमी' कळताच दोन्हीही घरी आनंदाला पारावार उरला नाही. आधी मी जाणार आधी मी जाणार याचे गोड द्वंद्व दोन्हीही घरी चालू झाले.
मग एकमताने एक ठराव मंजूर झाला.
पहिले काही दिवस बायकांची जास्त गरज आहे. मग दोन्हीही आज्ज्या जाणार.
आजोबाचे नंतर पाहू!
अरुणा (शार्वीची आई) आणि विजया (राघवची आई) यांनी परदेश प्रवासाची तयारी सुरू केली.
त्यांची तयारी म्हणजे केवळ कपडे भरणे नव्हते, तर ती होती 'शिस्तबद्ध नियोजन'.
अरुणाने, नेहमीप्रमाणे, कोणतीही वस्तू 'अपेक्षितपेक्षा जास्त' भरली नव्हती, पण लागणारी प्रत्येक 'गरजेनुसार' वस्तू अगदी अचूकपणे वर्गीकृत करून ठेवली होती.
तिच्या बॅगेत किचनच्या कामांसाठी लागणाऱ्या आवश्यक, पण सहजासहजी न मिळणाऱ्या काही 'आजीच्या काळातील' वस्तू होत्या.
दुसरीकडे विजया,राघवची आई, यांची शिस्त वेगळी होती. त्यांची शिस्त 'आरोग्य आणि वेळेनुसार' ठरलेली होती. कारण ती working women होती. ति आयुर्वेदाचार्य होती.
मग काय त्यांच्या बॅगेत शार्वीच्या मॉर्निंग सिकनेससाठी लागणाऱ्या आयुर्वेदिक गोळ्या, भाजलेल्या धान्यांची खास पौष्टिक पावडर आणि राघवचे सांभाळून ठेवलेले मुलायम कपडे होते.चवणप्राश, अश्याच सगळ्या वस्तू होत्या.
दोघी विहिणी रोज तास् न तास एकमेकींशी फोनवर फोनवर संवाद साधून आपली तयारी करत होत्या.
दोघींचा प्रवास एकत्र होता.त्यामुळे विमानासाठी लागणारे त्यांनी 'कामाचे वर्गीकरण' त्यांनी केले.
अरुणाने प्रवासातील कागदपत्रे आणि व्हिसा संबंधित कामांची पुर्तता करण्याची जबाबदारी घेतली.एका एजंटच्या करवी सगळे ती करून घेत होती.
तर विजयाने शार्वीच्या आहाराच्या योजनांवर शार्वी शी चर्चा केली आणि काही जुन्या 'गर्भसंस्कारां'च्या गोष्टींची उजळणी केली. त्या नुसार ती आपली बॅग भरत होती.
आता दोन वेगवेगळ्या शिस्तीच्या स्त्रिया एकत्र आल्या होत्या, राघवला थोडं टेंशन आले होते.
पण त्यांचा उद्देश एकच होता आपल्या येणाऱ्या गोड पाव्हण्याचं छान स्वागत करणे.
घरी राघव आणि शार्वी दोन्हीही आईच्या स्वागतासाठी तयार होते.
राघव खूप तणावात होता. दोन वेगवेगळ्या 'शिस्तबद्ध' आया आणि त्यांची 'वेगवेगळी पद्धत' आता एकत्र येणार, म्हणजे घरात गोंधळ होणार. असे त्याला वाटत होते.
​ पण झाले उलटेच.
​दोघीही घरी येताना हसत खेळत प्रवासात एकमेंकीची काळजी घेत आल्या.
राघव आणि शार्वीला आनंदाचा धक्का बसला. दोघींनीही एकमेकींना मदत करत लगेच घरात पाऊल ठेवले.
एका क्षणात, राघवच्या घरात एक नवीन, शिस्त' तयार झाली.
दोघीही ठरवूनच आल्या होत्या. कोणते काम कोणी करायचे. दोघींनीही राघव व शार्वीला सांगितले.
आता आम्ही आलो आहोत. तेंव्हा राघव तु तुझे काम करायचे.आमच्यामध्ये बिलकुल लुडबुड नको.
शार्वी तु तुझं आॉफस सांभाळून आपली तब्येत सांभाळून राहायचं. काय खावेसे वाटते ते फक्त सांगायचे. औषधपाण्याची जबाबदारी माझी बरका शार्वी विजयानं म्हणजे सासुबाईनी सांगितले.
अरुणानं किचनचा ताबा घेतला. नुकतीच ती सगळे आवरून गेली होती. म्हणून एवढे विसरली नव्हती.
"आई ग थालिपिठं शार्वी लाडिकपणाने आईला म्हणाली!"
अग एवढेच चला विजया ताई लागू कामाला.मग हसत खेळत दोघींनीही स्वयंपाकघराचा ताबा घेतला.
एका गॅसवर गरमागरम थालीपीठ होत होती. तर एका गॅसवर आलेयुक्त चहा आपल्या वासांन चहाची तल्लभ वाढवत होता.
अरुणानं थालिपिठं केले तर विजयाताईंनी सर्वांच्या टिश तयार केल्या.
राघवच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी दोन्ही आयांच्या चेहऱ्याकडे पाहिले. खरच बाळाचे आगमन होणार या बातमीच्या मोहानं आपल्या मुलांसाठी ममतेचा आणि त्याबरोबरच शिस्तीचा डोस भरून आणला आहे या लबाडाने.
आता बघ ही मायेच्या नात्याची ऊब आधिक सक्षम आणि परिपूर्ण झाली आहे. राघव शार्वीला म्हणाला.
आता घरात शांतता, प्रेम, आणि शिस्त या तिन्हीचा समन्वय साधला जाणार बरका! येणार बाळ शिस्तबद्ध असणार. मग सगळे खदखदून हसले..
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all