मायेच्या नात्याची ऊब: भाग २२
डोहाळे जेवणाचे मंगलमय क्षण संपले आणि आता सर्वांचे लक्ष लागले होते ते एकाच गोष्टीकडे—घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या पावलांकडे!
शार्वीचा आठवा महिना संपत आला होता, त्यामुळे घरातले वातावरण आता आनंदा सोबतच थोड्या 'अलर्ट' मोडवर होते.
शार्वीचे नियमित चेकअप चालू होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व ठीक होते.
एके दिवशी सकाळी राघव आणि शार्वी हॉस्पिटलमध्ये नियमित चेकअपसाठी गेले असताना डॉक्टरांनी हसून सांगितले, "शार्वी, बेबी एकदम हेल्दी आहे.
पण आता शेवटचे काही आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. हालचाल वाढव, पण जिने टाळ. आणि हो, तुमची हॉस्पिटल बॅग तयार ठेवा!"
घरी आल्यावर राघवने ही बातमी सांगताच अरुणा आणि विजया यांची जणू लगबगच सुरू झाली. दोघी मिळून बाळाचे मऊ सुती कपडे, दुपटी आणि शार्वीचे सामान याची आवराआवर करू लागल्या. हॉस्पिटलमध्ये घेऊन तर जाउ घालू दिले तर ठीक आहे. नाहीतर घरी आल्यावर वापरूच. त्यांचा हा उत्साह आणि धावपळ चालू होती.
इतक्यात भारतातून आज्जीचा व्हिडिओ कॉल आला. आजी म्हणाल्या, "काय ग अरू, विजया ... काय हा पोरखेळ लावलाय? अजून अवकाश आहे आणि तुम्ही आत्तापासूनच पोतडी बांधून बसलात? आमच्या काळी तर कळा सुरू झाल्या की मगच गाठोडं वळलं जायचं. उगीच अतिउत्साह दाखवून त्या पोरीला अजून घाबरवू नका!"
दृष्ट पण लागते समजतंय का? "
आजींच्या या अनपेक्षित बोलण्याने विजया आणि अरुणा थोड्या ओशाळल्या. पण शार्वीने परिस्थिती सावरून घेतली.
ती आजीला म्हणाली, "आजी, अगं इकडे अशी तयारी करून ठेवावीच लागते. घाबरवत नाहीत, उलट माझी चिंता कमी करतायत. तुमच्या काळी तुमची हिंमत मोठी होती, पण आताच्या काळात धावपळ नको म्हणून ही पूर्वतयारी. आणि खरं सांगू, या दोघींची ही धावपळ बघूनच मला आत्मविश्वास मिळतोय की माझ्या बाळासाठी इतकी माणसं सज्ज आहेत. ही मायेची ऊबच तर मला हवी आहे!"
शार्वीचे हे शब्द ऐकून आजींच्या चेहऱ्यावरही समाधान पसरले. तिनं फोनवरून शार्वीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.
राघवची मात्र मोठी फजिती होत होती. तो ऑफिसचं काम सांभाळत गुगलवर 'बेबी बॅग' आणि 'कार सीट'ची माहिती शोधत होता. त्याची ही धावपळ पाहून भारतातून बाबा फोनवर हसून विचारायचे, "अरे राघव, शांत हो! आम्ही येऊ का मदतीला?"
रात्रीचे दोन वाजले असतील. अचानक शार्वीला अस्वस्थ वाटू लागलं. तिने राघवला उठवलं. "राघव, मला वाटतंय आपल्याला आताच हॉस्पिटलला जावं लागेल..."
राघवची झोप एका क्षणात उडाली. तो गडबडीने उठला, उलटा टी-शर्ट घातला आणि गोंधळून ओरडू लागला,
"आई! बॅग कुठे आहे? गाडीची चावी कुठे आहे?"
विजया आणि अरुणा धावत बाहेर आल्या. "अरे राघव, शांत हो! बॅग गाडीत आधीच ठेवली आहे. तू फक्त गाडी बाहेर काढ," अरुणाने त्याला धीर दिला. पण सर्वांच्या मनात एकच धडधड होती. बाळाचे आगमन!...
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन" fevorite"आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा