Login

"मायेच्या नात्याची ऊब भाग - २३

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
​मायेच्या नात्याची ऊब: भाग २३ -
​हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पडलेली ती शांतता बाळाच्या पहिल्या रडण्याने भंग पावली.
त्या आवाजासोबतच बाहेर पडणाऱ्या बर्फाच्या कणांनी जणू आकाशातून फुलांची उधळण सुरू केली. नर्सने जेव्हा बाहेर येऊन "मुलगा झाला आहे!" असे सांगितले, तेव्हा अरुणा आणि विजया यांनी आनंदाने एकमेकींना मिठीच मारली.
​राघवने आत जाऊन शार्वीला आणि आपल्या लेकाला पाहिले. शार्वीचा चेहरा बाळंतपणाच्या कष्टांनंतरही विलक्षण तेजाने उधळला होता. तो चिमुकला जीव आपल्या इवल्याशा हातापायांची हालचाल करत होता.
काही वेळाने जेव्हा अरुणा आणि विजया आत आल्या, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
​अरूणानं (शार्वीची आई) नातवाला पाहताच त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले, तर विजयानं (राघवची आई) कौतुकाने शार्वीच्या डोक्यावरून हात फिरवला.
​बाळाचे ते रूप पाहून विजया म्हणाली, "शार्वी, अगं अगदी राघवच लहानपणीचा अवतार वाटतोय हा! आम्हाला वाटलं होतं की मुलगी होईल, पण बघा साक्षात गणपती बाप्पाच घरी आला!"
​हे ऐकून राघव आणि शार्वीने एकमेकांकडे पाहिले आणि हसले.
राघव हळूच म्हणाला, "आई, खरं सांगायचं तर एक छोटीशी माफी मागायची आहे. आम्हाला इथल्या चेकअपमध्ये 'मुलगा' कि मुलगी होणार हे आधीच समजते .
पण तुम्हा सगळ्यांना ते गोड सरप्राईज ऐनवेळी मिळावं आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर पाहावा, म्हणून आम्ही हे गुपित मुद्दाम लपवून ठेवलं होतं. क्षमा असावी हं!"
​विजया हसून म्हणाली, "अरे वेड्या, मुलगा असो वा मुलगी, आमच्यासाठी तो आनंदाचा ठेवाच आहे. पण तुम्ही हे जे सरप्राईज दिलंत ना, त्याने आनंद शतगुणित झाला!"
​इतक्यात राघवने शार्वीच्या आजींना आणि दोन्हीही बाबांना भारतात व्हिडिओ कॉल लावला.
स्क्रीनवर शार्वीच्या आजींचा चेहरा दिसताच शार्वी भावूक झाली.
​शार्वी म्हणाली, "आजी, बघ तुझा पणतू! मगाशी तू म्हणत होतीस ना की तयारी लवकर कशाला? बघ, तुझ्या या पणतूने वेळेआधीच यायचं ठरवलं. तुझा आशीर्वाद द्यायला हवा बरं का!"
​शार्वीची आजी भारावून गेल्या होत्या. त्या म्हणाल्या, "शार्वी ग, पोरी... खूप सुखी राहा! तो बर्फाचा देश असेल, पण माझ्या नातवाच्या मायेची ऊब त्या बाळाला सदैव उबदार ठेवेल. दोन्ही समया (अरुणा आणि विजया) तिथे आहेतच काळजी घ्यायला, आता मी निर्धास्त आहे!"
​आता तिन्हीही बाबांनी फोनवरूनच एकमेकांना शुभेच्छा दिल्या.कारण बाबाच्या भुमिकेत आता राघव पण add झाला होता.
राघवने बाळाला हातात घेतले तेव्हा त्याला जाणीव झाली की, आता खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्यातील 'बाबा' या भूमिकेचा प्रवास सुरू झाला आहे.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all