Login

"मायेच्या नात्याची ऊब" - २९

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
​मायेच्या नात्याची ऊब - भाग २९
​खसखशीची खीर आणि 'मिशन' इंडियन स्टोअर!
कालच्या बाळगुटीच्या यशस्वी प्रयोगानंतर आजचा दिवस खास होता, कारण आज आजींच्या *शार्वी आहार मिशन'**चा श्रीगणेशा होणार होता.
आजींनी पुण्यात असतानाच शार्वीच्या बाबांना जी सामानाची एक लांबलचक लिस्ट पाठवली होती.ज्याची आज्जीच्या अपेक्षे प्रमाणे पुण्यातच खरेदी झाली होती. तिच लिस्ट राघवनं गुपचूप शार्वीच्या बाबांकडून हस्तगत केली होती.
​पुण्यातून डबे तर आले होतेच, पण आजींच्या अटीनुसार काही ताजी जिन्नस देखिल हवी होती.
राघवनं विचार केला की, आजींना जर 'पुणेरी क्वालिटी' दाखवायची असेल, तर साध्या दुकानात जाऊन चालणार नाही. म्हणून तो दोन्ही आजोबांना सोबत घेऊन थेट 'इंडियन स्टोअर' मध्ये पोहोचला.
​राघव हसत दोघांनाही म्हणाला, "बाबा, इथे शंभर टक्के खात्री आहे की आपल्याला आजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मिळतील. अगदी बाळंत-शोपा सुद्धा मिळतील!" दोन्ही आजोबांनी चष्मे सावरत दुकानात प्रवेश केला.
परदेशात असूनही तिथे मिळणारा मेथीचा,ओव्याचा आणि मसाल्यांचा वास बघून आजोबांना क्षणभर पुण्यातल्या 'मंडई'चीच आठवण झाली.
​राघवनं लिस्टनुसार शोध सुरू केला. खसखस, बाळंत-शोपा, डिंक,अळीव आणि सुकं खोबरं! आजोबा तर चकितच झाले, "अरे वा राघव! इथे तर अगदी वाळवलेली मुरुडशेंग सुद्धा मिळतेय की!"उचल उचल जे आज्जीला खोटे खोटे दाखवले ते सगळे उचल.
सगळं सामान घेऊन घरी आल्यावर पुन्हा एकदा पुण्यात व्हिडिओ कॉल होण्याआधी राघवनं दोन्हीही आईच्या हातात पिशव्या दिल्या.
"हे बघा आई, सगळं सामान आणलंय. अगदी तुझ्या पुणेरी लिस्टप्रमाणे!"आत आज्जीला फोन लावायला हरकत नाही.
पुन्हा एकदा आज्जीला व्हीडीओ कॉल लावला. आज्जी स्र्किनवर चष्मा सावरत आल्या.
आजींनी सामान निरखून पाहिलं आणि म्हणाल्या,खरच ग जावई बापू लाखात एक माझा. मी सांगितले सगळे सामान काळजीपूर्वक पुण्यातून घेऊन आले बघ." शेवटी पुणे तिथे काय उणे
."बरं झालं, आता अरुणा, विजया. लक्ष देऊन ऐका!शार्वीला दूध नीट यायला हवं असेल, तर आता खसखशीची खीर करायला घ्या. खसखस नीट धुवून, वाटून तिची खीर दे शार्वीला. त्याने तिला शांत झोप लागेल आणि बाळालाही पुष्टी मिळेल."​विजया आणि अरुणाने मिळून खसखशीची खीर आणि बाळंत-काढा तयार केला.
शार्वीला तो आहार देताना आजींचे बारीक लक्ष होते. एकदा सगळं व्यवस्थित झाल्यावर अरुणा मनोमन सुखावली.
ती उत्साहात म्हणाली, "आई, आता आम्हाला सगळं नीट समजलंय! तू जसं सांगितलंस, अगदी तसंच मी व्यवस्थित करीन ग.
खरंच गं आई, तुझ्या देखरेखीखाली हे सगळं पुण्यातच व्हायला हवं होतं!"हे ऐकून राघवचे बाबा आणि शार्वीचे बाबा सुद्धा गहिवरले.
."हो ना आई, तिथे जो आधार मिळाला असता, तो इथे लाख रुपये खर्चूनही मिळत नाही," असं म्हणत सगळ्यांनी एकमेकांना दुजोरा दिला.
​इतका वेळ करारी आवाजात 'ऑर्डर' सोडणाऱ्या आजींचा स्वर आता मात्र हळवा झाला. त्यांचा आवाज थोडा कापरा झाला, "अरुणा, मी जरी पुण्यात असले ना, तरी माझं मन त्या पाळण्यापाशीच घुटमळत असतं ग! माझ्या पणतवंडाला नीट सांभाळा.
त्याला मायेच्या नात्याची ऊब कमी पडू देऊ नका. पुण्यात राहून सुद्धा मी तुमच्या सोबतच आहे असं समजा."
​आजींचे ते शब्द ऐकून सातासमुद्रापार असलेल्या त्या घराला खऱ्या अर्थाने मायेच्या नात्याची ऊब मिळाली.
​बाळ आता हळूहळू मोठं होऊ लागतं होते. नामकरण सोहळा बाकी होता. पाहूया पुढील भागात...
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all