माझ आत्म्याशी जुळलेलं चरित्र्य

कहाणी सुनिधची.


माझ आत्म्याशी जुळेललं चरित्र्य
..............
आत्मचरित्र्य म्हणजे...?
आपला आत्मा आणि आपलं चरित्र्य यांचा संगम म्हणजे आत्मचरित्र्य का...?
की आपण जगत असताना जे अनुभवतो त्या अनुभवाच गाठोड म्हणजे आत्मचरित्र्य..!
                           मला या दोन्ही बाबी वेगळ्या वाटतात कारण माझा आत्मा आणि मि आयुष्यात अनुभवलेले.. अनुभव हे दोन्ही खुपच भिन्न आहेत.. मि जगताना पुरुष म्हणून जगत आलो मात्र माझ्या आत असणारी ती स्त्रीची छवी..मला नेहमीच पुरुष भाव सोडून स्त्री भाव जवळ करायला परावर्तीत करते... मि 'सुनिध' म्हणून जरी वावरतो पण माझ्यात लपलेली 'सुनिधी' नेहमीच समोर येऊन.. मला तिला सोबत घेऊन चालायला सांगते.
                        तर ही गोष्ट आहे 2001 सालाची जेव्हा सोहमे घराण्यात माझा जन्म झाला..आई वडील तर मला पाहुन खूप खुश झाले कारण त्यांना त्त्यांच्या वंशाचा दिवा मिळाला.. मि लहानाचा मोठा होत गेलो.. आणि मोठा होत असताना... नेहमीच मला प्रश्न पडत असत.. मि जरी मुलगा आहे पण मला मुलीत खेळणं का आवडतं.. मला मुली सारख राहणं का आवडतं... बस फक्त प्रश्न आणि प्रश्न आणि या प्रश्नणाच्या बदल्यात न मिळणारी उत्तर... पण उत्तराच्या बदल्यात नेहमीच मिळणारे ताणे.. जे मला खूप दुःख द्यायचे.
                           मुलगा असून मुली सोबत का खेळतो..म्हणत मित्र चिडवायचे... बायल्या, हिजड्या आणि कित्येक नावे देऊन माझ्या चिमुकल्या हृदयावर ते शब्द खूप घाव घालायचे.. त्या सर्व मित्रांची तक्रार जरी घरी केली तरी फक्त एक उत्तर मिळायचे... बरोबर ना तू मुलगा आहेस मुला सोबत रहा.. मुली सोबत राहणार तर मुलं चिडवणारच...आणि बस्स हे उत्तर मला अजून निराश करायचं..ती निराशता वयाच्या आठ वर्षा पासून आता पर्यत मि अनुभवत आहे.
                            मि आज जरी एकवीस वर्षाचा झालो... पण माझ्यात असणार मन अजूनही पाच वर्षाच्या लहान मुला सारखं आहे...कारण बालपणात मला कधी मनसोक्त जगता आलं नाही..ती खेळणी सुद्धा समाजाने अशी वाटून का दिली असावी आजही प्रश्न पडतो.. लहान असताना वडिलां सोबत जत्रेत जाता ती डोळे मीचमीच करणारी बाहुली मला नेहमीच हवी असायची पण ती मला कधीच मिळाली नाही... मुलगा आहेस ना मुलांची खेळणी खेळ.. वडिलांनी सुद्धा हेच उत्तर दिलं.. आणि बस भावना लपवत जगणं तेव्हा पासून सुरु केलं.
                          माझ शालेय जीवन सुद्धा असच आहे.. क्लासमेट मला नेहमी चिडवायचे.. तू छक्का आहेस का म्हणत माझ्या वर हसायचे.. पण मि त्यांना इग्नोर करायचो..कारण मि त्यांच्या पेक्षा हुशार होतो..शाळेत नेहमीच अभ्यासात माझा पहिला दुसरा क्रमांक यायचा..या शिवाय मला नृत्य, वक्तृत्व करायला खूप आवडायचे..शाळेत कोणतीही स्पर्धा म्हणली की माझा नंबर विनर मध्ये असायचा..शाळेत जाणं मला खूप जास्त आवडायचं कारण..माझे सर्व शिक्षक माझा खूप खूप म्हणजे खूप जास्त लाड करायचे.. शालेय जीवनात कुणी जास्त मित्र जरी नव्हते.. पण मैत्रिणी खूप खंडीभर होत्या.. त्यातच वर्ग दहावीत जाता एका मैत्रिणीने मला प्रपोज केला.. त्यावेळी मला तिला काय उत्तर द्याव समजलं नाही.. कारण माझी लैंगिकता भिन्न आहे.. मि समलिंगी आहे या सर्व बाबी मला ठाऊक नव्हत्या.. मि तिला होकार देता आमच्या प्रेमाचा मळा फुलायला लागला.
                           पण मि इयत्ता बारावित जाता जेव्हा माझ्या लैंगिकतेचा अभ्यास केला तेव्हा मला समजलं.. मि समलिंगी आहे.. कदाचित म्हणूनच मला तिचा स्पर्श नेहमीच नकोसा वाटायचा.. तिला फक्त एक मैत्रिण ठेवावं असा विचार यायचा.. वेळे नुसार सगळ्या गोष्टी बदल्यात गेल्या.. मि तिला वेळ देत नसायचो आणि त्यातच आमचं ब्रेकअप झालं.. त्या नंतर डिग्रीला ऍडमिशन घेतलं.. आणि सुनिध नावाने लिहायला सुरवात केली..माझ्या मनात असणाऱ्या प्रत्येक उणीवेला... मि माझ्या लेखणीत उतरवायला लागलो आणि माझं चरित्र्य माझ्या आत्म्या नुसार रेखाटायला लागलो.
                         माझ्या जीवनाचा हा प्रवास आता शेवटी कोणत्या स्टॉप वर जाऊन थांबेल हे माहित नाही.. पण आता आयुष्य हसत जगायच ठरवलं आहे.. लोक आपल्याला काय म्हणतील हा विचार बाजूला सारून.. स्वतः साठी जगायच आणि एक आझाद पंछी होऊन आकाशात उडायचं..!
...
© सुनिध सोहमे.