जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय:- तिची बाजू
कथेचे शीर्षक- माझा आवाज
© अनुप्रिया
विषय:- तिची बाजू
कथेचे शीर्षक- माझा आवाज
© अनुप्रिया
‘सुप्रसिद्ध समुपदेशक डॉ. अवंती करंदीकर यांचा कौटुंबिक वाद न्यायालयात दाखल’, ‘नाव मोठं लक्षण खोटं - राष्ट्रीय पुरस्कार विजेती मानसोपचारतज्ज्ञ, महिला व बालहक्कांवर काम करणारी सामाजिक कार्यकर्ती डॉ. अवंती करंदीकर यांनी आपल्या चिमुरड्या मुलांसोबत आपले राहते घर सोडले.’ ‘माता नच वैरिणी- स्वतःला प्रतिष्ठित म्हणवणाऱ्या डॉ. अवंती करंदीकरांची दुसरी प्रतिमा लोकांसमोर.. आपल्या चिमुकल्यांना त्यांच्या जन्मदात्या पासून दूर केले. वडिलांच्या प्रेमापासून वंचित केलं. ‘मोठं घर पोकळ वासा- मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे घरातला वाद चव्हाट्यावर.’ अशा मथळ्यांच्या अनेक बातम्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर झळकत होत्या. कंटाळून तिने वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि टिव्ही सुरू केला. तिथेही तेच सुरू होतं. दिव्याने पटकन उठून टिव्हीही बंद केला. प्रसारमाध्यमातून अवंती करंदीकरांचा विषय फारच चर्चिला जात होता.
“हे तर होणारच होतं. प्रसारमाध्यमे या बातमीला डोक्यावर घेणार आणि मीठ मसाला लावून जनतेला सांगणारच हे घडणारच होतं. ‘डॉ. अवंती करंदीकर’ कोणी साधारण स्त्री नाहीये. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये शांत पण ठामपणे आपलं मत मांडणारी व्यक्ती आहे. लोकांच्या मनात तिच्याबद्दल आदर आहे. ते तिला आदर्श मानतात. त्यामुळे जशी ही बातमी फुटली, मिडियाला चघळायला विषय मिळाला. डॉ. अवंती करंदीकरांच्या वागण्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय.”
ती स्वतःशीच पुटपुटली. ‘दिव्या सरकार ’ फॅमिली कोर्टात एक नावाजलेली वकील.. डॉ. अवंती करंदीकरांची केस तिच्याचकडे होती. दिव्याच्या मनात अवंती करंदीकरांचेच विचार सुरू होते. इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईल स्क्रीनवर अवंतीचं नाव झळकलं. तिने हॅलो म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली.
“नमस्कार दिव्या मॅडम, दहा वाजता कोर्टात पोहचायचं आहे. तुम्ही निघालात ना?”
“हो.. हो.. मी पंधरा मिनिटात कोर्टात पोहचते. तुम्ही पण वेळेत हजर रहा.”
असं बोलून दिव्याने कॉल कट केला.
‘चला, आता जे समोर आलंय, त्याला तोंड देणं भागच आहे. केस घेतलीय म्हटल्यावर आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. आज कोर्टात काय होईल काही सांगता येत नाही. लवकर जाऊन अवंतीच्या पाठीशी राहायला हवं. नाहीतर गोंधळून जाईल ती.. मिडिया काही तिला सोडणार नाही.’
असं स्वतःशीच म्हणत दिव्या कॉफी संपवून सोफ्यावरून उठली आणि थोड्याच वेळात स्वतःचं आवरून ती कोर्टात पोहचली. सोमवारचा दिवस असल्याने तब्बल दोन दिवसांनी न्यायालयाचं कामकाज सुरू झालं होतं. त्यामुळे कोर्टाच्या खोलीत आज नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती. सर्वत्र काळे कोट घातलेलं वकील इकडून फेऱ्या घालत होते. अनेक चेहरे.. अनेक विवंचना.. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून न्यायासाठी जमलेली माणसं.. काही चिंताग्रस्त चेहरे.. तर काही गुन्हेगारीत मुरलेले चेहरे.. तिच्यासाठी हे काही नवीन नव्हतं. तिलाही याची सवय झालीच होती. पण आज तिच्या पोहोचण्याआधीच मिडिया तिथे पोहचली. न्यायालयाच्या बाहेर कॅमेरे होते. दिव्या गाडीतून खाली उतरली तसे फ्लॅश चमकले. पत्रकारांनी तिला घेराव घातला.
“ॲड. दिव्या, आज सुप्रसिद्ध प्रवक्ता डॉ. अवंती करंदीकर यांच्या केसचा निकाल लागेल का? त्या केस जिंकणार की हरणार?”
“ॲड. दिव्या, आज सुप्रसिद्ध प्रवक्ता डॉ. अवंती करंदीकर यांच्या केसचा निकाल लागेल का? त्या केस जिंकणार की हरणार?”
कुणीतरी दुसरा रिपोर्टर पुढे आला आणि त्याने विचारलं,
“ॲड. दिव्या, तुम्ही एवढ्या मोठ्या सुप्रसिद्ध वकील आहात. तुम्ही नेहमी न्यायाच्या बाजूने लढता.. मग अवंती करंदीकरांसारख्या बाईची केस घेतलीच कशी?”
पत्रकारांनी दिव्याभोवती चांगलाच घेराव घातला होता. तरीही दिव्या शांत होती. मोठ्या संयमाने तिने पत्रकारांना उत्तर दिलं.
“हे पहा, मी एक वकील आहे. कोणाची केस घ्यावी अथवा कोणाची घेऊ नये हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही त्यावर न बोललेलंच बरं. नाही का? आणि राहिला प्रश्न डॉ अवंती करंदीकरांच्या केसचा, तर मी इतकंच सांगेन, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ते आमची बाजू नक्कीच समजून घेतील कारण आमची बाजू सत्याची आहे. तेंव्हा आपण न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी. मला वाटतं, आता तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतीलच. मला कोर्टात जायला उशीर होतोय, तेंव्हा येऊ मी? थँक्यू..”
इतकं बोलून दिव्या कोर्टाच्या दिशेने चालू लागली. तरीही काही पत्रकार प्रश्न विचारण्यासाठी तिच्या मागे धावलेच.
इतक्याच एक पांढऱ्या रंगाची आलिशान गाडी कोर्टाच्या आवारात येऊन थांबली आणि गाडीचं दार उघडून अवंती खाली उतरली तसं दुसऱ्या क्षणाला कॅमेऱ्यांचे फ्लॅश अधिकच चमकले. काही क्षण ती तिथेच उभी राहिली. चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा होता, पण डोळ्यांत खोल थकवा दडलेला होता. गुलाबी रंगाची साधी कॉटनची साडी, केस नीट आवरलेले, गळ्यात मोत्यांची माळ, कानात मोत्यांचे एअरिंग्स, एका हातात तशीच मोत्यांची बांगडी आणि दुसऱ्या हातात नाजूकसं घड्याळ.. कोर्टातल्या कागदपत्रांची फाइल छातीशी घट्ट पकडून ती पुढे चालत येत होती. खरंतर ती नेहमीसारखीच दिसत होती; पण आज तिच्या प्रत्येक पावलाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं.
इतक्याच एक पांढऱ्या रंगाची आलिशान गाडी कोर्टाच्या आवारात येऊन थांबली आणि गाडीचं दार उघडून अवंती खाली उतरली तसं दुसऱ्या क्षणाला कॅमेऱ्यांचे फ्लॅश अधिकच चमकले. काही क्षण ती तिथेच उभी राहिली. चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा होता, पण डोळ्यांत खोल थकवा दडलेला होता. गुलाबी रंगाची साधी कॉटनची साडी, केस नीट आवरलेले, गळ्यात मोत्यांची माळ, कानात मोत्यांचे एअरिंग्स, एका हातात तशीच मोत्यांची बांगडी आणि दुसऱ्या हातात नाजूकसं घड्याळ.. कोर्टातल्या कागदपत्रांची फाइल छातीशी घट्ट पकडून ती पुढे चालत येत होती. खरंतर ती नेहमीसारखीच दिसत होती; पण आज तिच्या प्रत्येक पावलाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं.
“अवंती मॅडम… एक प्रश्न!”
“मुलांना वडिलांपासून दूर ठेवणं योग्य आहे का?”
“तुम्ही महिला हक्कांवर बोलता, मग स्वतःच्या संसारात हे काय?”
“मॅडम, तुम्ही इतक्या स्त्रियांना नात्यांवर मार्गदर्शन केलंत मग स्वतःचं लग्न वाचवू शकल्या नाहीत?”
त्यांचे प्रश्न उपरोधात्मक होते. ती पायऱ्या चढताना क्षणभर थांबली आणि डोळे मिटले. डोळ्यांपुढच्या अंधारातही तिला तिचा विचार लख्ख उजेडासारखा दिसत होता.
“कोर्टाच्या आवारात असे प्रश्न विचारू नका प्लीज.”
कोर्टाच्या आवारात जमलेल्या पत्रकार, समाजसेवक अनेक लोकांसमोर ती कडक शब्दात पण ठामपणे म्हणाली.
“पण मॅडम तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल.. ’लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण.’ असं झालंय तुमचं.. इतरांना तुम्ही मार्गदर्शन करता मग स्वतःच्याच बाबतीत हा असा वेगळा न्याय का?”
अवंती काहीच बोलली नाही. फक्त मान खाली घालून दिव्याबरोबर चालू लागली.
“आज न्यायालयात फक्त माझं नाव नाही.. तर आज माझं सारं आयुष्य मांडलं जाणार आहे. कदाचित या प्रतिष्ठित आयुष्याची राखरांगोळी होणार आहे. सारी प्रतिष्ठा..”
अवंती स्वतःशीच पुटपुटली. तिने मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं आणि ती दिव्यासोबत कोर्टरूममध्ये येऊन दाखल झाली.
कोर्टरूम माणसांनी खचाखच भरलेली होती. आत शिरताच बाहेरचा गोंगाट जणू अचानक थांबला. न्यायालयाची शांतता तिला क्षणभर बरी वाटली; पण ही शांतता फसवी आहे हे तिला माहीत होतं. कोर्टरूममध्ये बसताना तिच्या नजरा आपसूकच समोरच्या बाकाकडे वळल्या. तिथे तो, तिचा नवरा बसलेला होता. चेहऱ्यावर कसलाच अपराधीपणाचा भाव नव्हता. उलट एक विचित्र आत्मविश्वास होता. “मी पीडित आहे” असं सांगणारी त्याची देहबोली होती. जणू काही तीच गुन्हेगार होती आणि त्याचा नाहक बळी गेला होता असंच त्याच्या देहबोलीतून जाणवत होतं. अवंतीने नजर वळवली.
क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)
© निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा