जलद कथा लेखन स्पर्धा
माझं घर कोणतं...
परकी भाग-1
परकी भाग-1
" मी हे घर स्वतःच्या पैशानी बांधलय.अगदी मिताच्याही पै ला हात न लावता. " मिहीर अगदी गर्वाने छाती फुगवून सांगत होता मित्रांना,नातेवाईकांना,येणाऱ्या प्रत्येकाला.
मिहीर ,मिताने घराचे वास्तुचा अगदी जंगी सोहळा आयोजित केला होता.
जवळचे दूरचे अगदी सर्वांनाच अगत्याचे आमंत्रण गेलेले.घरही तसंच झालं होतं सुंदर.आयुष्यातला हा आनंदाचा क्षण सगळ्यांसोबत शेअर करावा म्हणून हा मोठ्ठा,समारंभ.
जवळचे दूरचे अगदी सर्वांनाच अगत्याचे आमंत्रण गेलेले.घरही तसंच झालं होतं सुंदर.आयुष्यातला हा आनंदाचा क्षण सगळ्यांसोबत शेअर करावा म्हणून हा मोठ्ठा,समारंभ.
वास्तुचे सगळे नियोजन मिहीरचेच होते.मिहीर याबाबतीत फार परफेक्ट होता. बफेत पदार्थ कोणकोणते ठेवायचे याची सुद्धा निवड त्याचीच.
घर बांधण्यासाठी म्हणजे सुरवातीला नकाशा तयार करण्यापासून मिहीर मिताला सोबत घेऊन गेला तरी तो त्याच्या मनाप्रमाणेच सगळं ठरवत होता.नंतर फर्निचर पण त्याच्याच पसंतीचे.मिताने थोडं स्वयंपाकघरातील फर्निचरसाठी,कपाटांसाठी म्हटलं तर त्याने अगदी सफाईदारपणे तिला समजावत आपल्या मनाप्रमाणेच केलेलं.
पण तिला तेव्हा काहीच वाटले नाही. कारण तिलाही त्याचं सिलेक्शन आवडायचं.
आज लग्नाला वीस वर्ष झालीत. मुलगा,मुलगी खांद्याएवढे झालेत.तिने कधी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्षच दिले नाही.मुळात तिचा स्वभावच साधा.
हं तू म्हणतो तसं म्हणत पटकन माघार घेऊन मोकळी.

वास्तविक आज तिही महिन्याला लाख रुपये कमवत होती.तिही एका नावाजलेल्या काॅलेजमधे लेक्चरर होती.
मिहीर चांगल्या सरकारी नोकरीवर.त्यालाही चांगला पगार.त्याच्या पगारातच घरखर्च भागून शिल्लक उरायची.बाहेर फिरायला जाणे बाकी सगळी हौसमौज तो त्याच्याच पैशातून करायचा.मुलांची शिक्षण,इतर खर्चही तोच करायचा.
त्याला महागड्या ,ब्रॅन्डेड कपडे,परफ्यूम आणि अन्य वस्तूंची खूप आवड.तो दर महिन्याला काहीतरी नवीन घेऊन यायचा.स्वतःसाठी शर्ट तर नवीन दिसले की घेतले.
पण मितासाठी ड्रेस किंवा साडी कधीमधीच घ्यायचा.

मिता तिचे कपडे,ज्वेलरी अजून काही आवडीच्या गोष्टी तिच्या स्वतःच्या पैशातूनच घ्यायची.पण तिने कधी तक्रारीचा सूर लावला नाही.कारण तिने त्यादृष्टीने कधी बघितलेच नाही.
एखादवेळी नवरा म्हणून तिने सहज काही म्हटले की तू मला हे घेऊन दिले नाही किंवा तिच्या वाढदिवसाला तो तिला महागडी वस्तु घेऊन द्यायचा.तिही त्याच्या वाढदिवसाला असेच त्याला आवडणारी काहीतरी ब्रॅन्डेड वस्तु घेऊन यायची.
मुलं कधी आईकडे लाडीगोडी लावायची तर त्यांना हवे ते मिता घेऊन द्यायची.कधी घरात वेळेवर काही किरकोळ सामान लागले तर,कधी मार्केटमधे गेली काही नवीन शोभेची वस्तु दिसली नवीन काही दिसले तर ती घेऊन यायची.तिच्या मनाला कधी अशा विचाराने स्पर्शच केला नाही की मी कशाला आणु मिहीर घेऊन येईल.किंवा काही घेतले की मिहीरला पैसे मागायचे दूर दूर पर्यंत कधी असे विचार मनाला शिवले नाही.
कधी आपपरभावच आला नाही ना मनात.

पण आज मिहीरच्या तोंडून ती हे काय ऐकत होती,' मी बांधलय घर माझ्या पैशानी.वरतून पुस्ती जोडत होता अगदी मिताच्या पै लाही हात लावला नाही.' त्याला सुचवायचे काय होते त्यातून?
क्रमशः पुढील
भाग -2 मधे वाचा
©®शरयू महाजन
क्रमशः पुढील
भाग -2 मधे वाचा
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा