माझं घर कोणतं...
परकी भाग -2
परकी भाग -2
मिहीर तर सर्वांना सांगतच होताच, आता त्याची आई मिताची सासू वीणाही अभिमानाने सगळ्यांना सांगत सुटली होती," मिहीरने मिताच्या पै लाही हात लावला नाही.अगदी स्वतःच्या बळावर उभी केली त्याने वास्तु."
मिताच्ये हृदयातून आरपार गेलेत ते वाग्बाण.
तिला सासूला विचारावेसे वाटत होते," तुम्ही अन् सासरेबुवा अलग आहात का ?त्यांचं घर तुमचं कसं मानता तुम्ही?"
पण संस्कार आडवे येत होते. ती संयमी,शांत.तोंड दाबून बुक्क्यांचा मार ती सहन करत होती.आपणच आमंत्रित केलेल्या चार लोकांसमोर तमाशा नको आणि एवढ्या मोठ्या सोहळ्याचा बेरंग नको म्हणून ती निमूट सहन करत होती.
तरी तिचा उतरलेला चेहरा चार लोकांच्या नजरेतून सुटला नाही.
तेही आश्चर्यचकित होत होते मिहीरचे शब्द ऐकून.
शेवटी मिहीरचा मित्रच मिहीरला म्हणाला," काय बोलतोस तू ?तुझं तुला तरी समजतं कां ?अरे!आता वहिनी आणि तू वेगळे आहात का ?
त्यांच्या पैशाला तू हात लावला नाही ही चांगली गोष्ट आहे पण माझ्या पैशानी बांधलय 'मी' घर .

हा 'मी' जो आहे ना तो चांगल्या नात्यात विष घोळतो.हा इगो संसाराला सुरुंग लावतो.बघ असे बोलणे बरे नव्हे.
पण त्यावेळी मिहीर आपल्याच मस्तीत होता.
मिता विमनस्क मनाने सर्वांचे स्वागत करत होती.त्यांच्याशी बोलत होती पण तिला परकेपणाच्या भावनेने ग्रासले होते.
कार्यक्रम आटोपला.तिचे हात चालत नव्हते कसेबसे बळ आणून ती आवरसावर करत होती.आता मात्र ती एकटी होती सगळं आवरायला.
घर तर माझं नाही तरी मी का करतेय हे सगळं?माझं घर म्हणणारे फक्त चार लोकांसमोर गर्वाने मिरवत होते. मी माझ्या पैशांनी बांधलय घर...आता कुठे गेले माझे घर ?
मी जर उद्या म्हटले की माझं घर नाही मी कशाला करु कामं ज्याचं त्यानी बघावं तर...
घरात वादळ उठले.भूचाल येईल.
यांना जाणीव तर करून द्यायचीच ही मनाशी ठाम खूणगाठ बांधून ती
झोपायला निघून गेली.
तिचा डोळ्याला डोळा लागत नव्हता.आता एकांतात तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पण समजवायला कोण होतं ?नाना विचारांनी तिचा मेंदू पोखरला जात होता.

आज एवढे वर्ष झालीत लग्नाला तरी अजून ही हे लोकं मला आपली म्हणायला तयार नाहीत याचं शल्य तिच्या मनात खुपत होतं. तिचा त्रागा त्रागा झाला होता.मीच जन्म दिलेल्या मुलांना ते आपली म्हणतात फक्त मीच तेवढी.....परकी...मग माझे घर कोणते ?
क्रमशः
भाग-3अंतीम मधे वाचा माझे घर कोणते...
©®शरयू महाजन
क्रमशः
भाग-3अंतीम मधे वाचा माझे घर कोणते...
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा