माझा होशील ना? भाग -72

Maza होशील Na
मागील भागात आपण पाहिलं कि सावनी ला झटका येऊन ती बेशुद्ध पडली ह्या सगळ्याची आधीच कल्पना असणारे डॉक्टर सतीश ह्यांनी ताबोडतोब हालचाली करून त्यांनी तिला ऍडमिट केलं आणि तिच्या आत्याला कॉल करून EMERGENCY मध्ये बोलावून घेतलं ...ह्या सगळ्याची काहीच कल्पना नसल्यामुळे अजिंक्य फक्त पाहत राहिला होता ..सावनी थोडी स्टेबल झाल्यावर त्याने त्याच्या वडिलांना आणि डॉक्टर स्नेहा ह्यांना त्याला पडलेले काही प्रश्न विचारले ..आता पाहूया पुढे ...........,



"आणि बाबा... तुम्ही.....?? तुम्ही तर असे रिएक्ट करताय की तुम्ही तिला खूप आधीपासून ओळखता किंवा तिच्या या आजाराची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे...!

हे देवा काय चालू आहे हे माझ्या आयुष्यात...? सगळेच मला फसवत आहेत का???"


डॉक्टर स्नेहा कडे वळून ते म्हणाले....,

"डॉक्टर स्नेहा,   तुम्ही तरी सांगा, तुम्ही आणि सावनी  गेले दीड दोन  वर्ष एकत्र काम करत आहात... इव्हन अनुराधा  जाण्या आधी पासून..! मग तिला काही त्रास झाला होता का आधी..? ती या आधी तुमच्याशी काही बोलली होती का हे सगळं ? तिने का लपवलं हे सगळं ? तुम्हाला काही कल्पना असेल तर सांगा ...."

एवढं बोलून तो शांत झाला......

त्याचा वैतागलेला चेहरा आणि बदललेला सूर त्याची अगतिक स्थिती सांगून जात होता आणि आता काहीही झाले तरी सगळे सांगितल्या शिवाय पर्याय नाही हे डॉ. सतीश समजून पुढे झाले...! कारण तो इंडिरेक्टली सावनी ला दोष देत होता ..बिचारीची काहीही दोष नसताना सुद्धा .....डॉक्टर स्नेहा काही बोलणार तेवढ्यात डॉक्टर सतीश म्हणाले .....


" डॉक्टर स्नेहा ..., मी बोलतो त्याच्याशी ......"

.   असं  म्हणून त्यांनी आपल्या लेकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि परत वळून डॉक्टर स्नेहा ना म्हणाले ......,

".आणि स्नेहा अजून एक  तूम्ही  प्लीज सावनी  कडे लक्ष ठेवा..! कारण डॉ. गीतांजली मुंबईत पोहोचायला अजून तीन तास तरी लागतील.. तोपर्यंत तिला खूप जपावे लागेल...! तोपर्यंत मी अजिंक्य सोबत बोलतो.. माझ्या केबिन मध्ये आणि मध्ये  काहीही लागले तरी लगेच निरोप पाठवा...!
पण बाकी कोणत्या ही कारणासाठी कोणाला ही अगदी कोणाला ही आत प्रवेश देऊ नका...."

हे ऐकून डॉक्टर स्नेहा ने मान हलवली आणि त्या म्हणाल्या ...

"डॉक्टर , तुम्ही निश्चिंत राहा ..मी डॉक्टर सावनी ची काळजी घेईन ...."

" तर....चला डॉ. अजिंक्य .. मला तुमच्याशी खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत आता ..! आणि  वेळ खूपच कमी आहे आपल्याकडे त्यासाठी. ....चला....तुमच्या मनात खूप प्रश्न आहेत आहेत ना ...ते आपण दूर करूया ..."

असे म्हणून ते दोघेही डॉ. सतीश ह्यांच्या  केबिन मध्ये पोहोचले...!

आधी त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि त्याला बसायला सांगितले ...

कालच्या  रात्री सावनी  ला दाखवायला दिलेल्या फोटो मधील दोन फोटो डॉ. सतीश यांनी त्यावेळी त्यांच्या कोटाच्या खिशात ठेवले होते. ते बाहेर काढून त्यांनी त्याला विचारले .....

"अजिंक्य ..., तू हे च फोटो काल सावनी ला दाखवले ना ?"

"हो बाबा... ती बेशुद्ध होण्या आधी आम्ही या वरच बोलत होतो....सगळे फोटो तिला दाखवले .."


ते फोटो पाहत तो म्हणाला.....

"आम्ही बोलत होतो की तू एकटा बोलत होतास  ?"

डॉक्टर सतीश ह्यांनी प्रतिप्रश्न केला.....

"बाबा... म्हणजे? मी तिला ते किती गोड दिवस होते ते सांगितले....त्या आठवणी जागृत केल्या ....."

अजिंक्य पुन्हा त्या आठवणीत जात म्हणाला...

" हो का ...!!!!!!!!!   मग.. ती काय म्हणाली त्यावर ? "

पुन्हा डॉक्टर सतीश ह्यांनी प्रतिप्रश्न केला.....

" बाबा.. अहो तिला ते काहीही आठवत नाहीये असे म्हणाली ती चक्क...! मला तर समजलंच आहे ती असं कस म्हणू शकते .....आणि त्यानंतर घाम फुटला होता तिला..! मग ती खाली पडली .......त्यानंतरच, मी खाली हाक मारली होती सगळ्यांना...
तिला आठवत नाही असं कस होईल तुम्हीच सांगा ना ?"

डॉक्टर अजिंक्य नी त्यांना विचारले ....

" बरोबर आहे अजिंक्य तिचे...! तिला यातले काहीही आठवत नाहिये. कारण तिच्या आयुष्यात आलेली ती दीड दोन वर्ष तिच्या आठवणी  मधून कायमची पुसली गेली आहेत. ..आणि त्या मागे देखील कारण आहे .....
डॉक्टर अजिंक्य .... मी जे सांगतोय ते नीट ऐक...! त्यासाठी तुला एक अख्खे पर्व तिच्या नजरेतून पहावे लागेल... आहे तुझी तयारी  सर्व ऐकण्याची ?
ती असेल तर च मी पुढे बोलतो...."

डॉक्टर सतीश त्याला म्हणाले ...

" बाबा... म्हणजे मी सोडून देखील तिचा काही पास्ट असू शकतो हे मला मान्य आहे..मला त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही .... तुम्ही प्लीज सांगा.जे असेल ते .....माझी ऐकण्याची तयारी आहे .! "

अजिंक्य म्हणाला खरं पण त्याला खूप टेन्शन होत.....


"ऐका तर मग..डॉक्टर .! तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही आधी पुण्यात  भेटलात , मग दिल्लीतली भेट जी तुम्ही विसरू शकत नाही ...ज्यात तुमची मैत्री, जवळीक निर्माण करणारे काही प्रसंग घडवून गेली होती..! बरोबर....!!!"

डॉक्टर सतीश थोड्या वेगळ्या स्वरात म्हणाले .....

"म्हणजे .....काय बोलताय बाबा हे? मला काही कळलं नाही ? "

अजिंक्य त्याला काहीच समजलं नाही असं दाखवत होता ....

"अजिंक्य,   खोटे बोलू नकोस...! मला संपूर्ण सत्य माहित आहे. तुझा बाप म्हणून देखील आणि सावनी  साठी तिचा डॉक्टर आणि आता तिचा सासरा म्हणून देखील, मी तिच्यावर अन्याय होऊ देणार नाही.
ती पोर तिथे मृत्यू शी झुंज देत आहे..! किमान आता तरी खरे बोलायचे धाडस कर...! मला सांग तू दिल्लीत तीन रात्री तिच्या सोबत एका रूम मध्ये राहिला होतास की नाही?"

ते थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले ...

"हो... पण बाबा आता इतक्या वर्षांनी... त्याचे काय? आणि तुम्हाला कसे समजले ....? आणि तसे ही ती बायको आहे आता माझी लग्नाची! "

अजिंक्य थोडा अडखळत म्हणाला ...

"मला कसे समजले ते महत्वाचे नाही... पण त्यातील एक रात्र तुम्ही सर्वानी भांग पिऊन हॉटेल वर गेला होतात..बरोबर कि नाही?"

आपल्या आवाजातला स्वर तसाच ठेऊन ते म्हणाले ...

"हो बाबा...म्हणजे आम्ही तिन्ही मित्रानी भांग प्यायली होती. पण सावनी ने नव्हती घेतली....."

थोडं दबकून तो म्हणाला ..

"हो माहीत आहे..मला ....! आणि तू देखील जास्त नव्हती प्यायल्यास की रात्री काय कृत्य केले हे देखील तुला आठवू नये..? "

त्याचे बाबा रागात म्हणाले....

"बाबा...!"

आपली चोरी पकडल्याचे साफ अजिंक्य च्या चेहऱ्यावर होते...

" हो..खरं तर . मला ते सगळे तेव्हाच समजले होते.....पण त्यावेळी अनुराधा  वर अन्याय नको म्हणून गप्प बसून होतो.
पण या पोरीला आणि तुझ्या मुलाला मात्र नक्कीच योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले मी..! एक पिता एक आजोबा म्हणून मी मागे राहिलो नाही..! "

एक मोठा श्वास घेऊन डॉक्टर सतीश म्हणाले.....


अजिंक्य ला खरं काय ते समजेल का?
सावनी ठीक होईल ना??
क्रमश

🎭 Series Post

View all