माझा होशील ना? भाग -73

माझा होशील ना
  मागील भागात आपण पाहिलं कि सावनी ला झटका येऊन ती पडते त्यातच तिला ब्लीडींग होऊ लागते ..डॉक्टर सतीश आपली परीने सगळे प्रयत्न करतात ..पण ती बेशुद्ध अवस्थेत जाते ..ह्यात हि अजिंक्य तिला च दोष देतो ..तो काहीही बोलतो त्यामुळे डॉक्टर सतीश त्याला घडलेल्या घटनांची आणि त्याच्या चुकीची जाणीव करून देतात आता पाहूया पुढे....., 


"बाबा.. तुम्ही काय बोलताय ते मला अजूनही समजत नाहिये.. विहंग ....आणि सावनी ? काय संबंध आहे..?
विहंग तर अनुराधा  आणि  माझा मुलगा आहे .....!!!!!!!!!! मग सावनी कुठे मध्ये येते इथे ....?? "

आता मात्र खरंच अजिंक्य ला कोडे उलगडत नव्हते.....

" नाही.. अनुराधा  मुलाला जन्म देऊ शकेल इतकी सक्षम कधीच नव्हती.. मूढ गर्भ होता तो... म्हणजे तिच्या ओव्हरी मधून गर्भ तयार झाला.. आणि तो गर्भाशयात वाढला देखील पण आतून तिचे शरीर पोखरत गेला..! तिचा आजार त्यात अजूनच वाढवत गेला..!

तिला जेव्हा लेबर पेन  सुरू झाल्या तेव्हा तिच्या गर्भाशयात संपूर्ण पाॅयझनिंग झाले होते.. तुला आठवत असेल तर सांगतो की मी तुला तिच्या पाचव्या महिन्या पासून तू वैयक्तिक लक्ष घाल म्हणून वारंवार सांगितले होते. पण तुझ्या हॉस्पिटलच्या व्यापा पुढे तुला बायकोचे आरोग्य पाहावेसे वाटले नाही...... तेव्हाही तिच्या कडे तु मी बजावून सुद्धा दुर्लक्ष केलेस.... आणि आता ही तु तेच करत आहेस.....असो........!!!!!

तर मुद्दा असा कि त्यात तू सावनी सोबत घालवलेली ती रात्र.. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती दिल्ली मधून थेट तिच्या आत्या कडे वाराणसी  मध्ये  गेली...!

तिथे एक अशी घटना घडली की त्यात तिला तेथील एका राजकिय व्यक्ती च्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
तेव्हा तिच्या घरच्यांनी प्रयत्न पूर्वक तिला त्यातून बाहेर काढले पण एका दुर्दैवी प्रसंगात तिच्या छोट्या मेंदूवर आणि  बॅक बोन वर खूप जबरदस्त आघात झाला..!

ज्यात ती कोमा मध्ये गेली होती जवळ जवळ  एक वर्ष .....! तिच्या वडीलांनी ती केस माझ्याकडे आणली.. तुला आठवत असेल की मी अनुराधा प्रेग्नंट असताना दोन वेळा वाराणसी मध्ये  गेलो होतो.. ते याच सावनी  साठी...!

पण अजिंक्य बेटा, मी ज्या सर्जरी करता गेलो होतो ती त्यावेळी होऊ शकली नाही.. कारण सावनी  प्रेग्नंट होती..! आणि ती किंवा  संबंधित मुलाची संमती असल्या शिवाय ती प्रेग्नंसी टर्मिनेट करणे शक्यच नव्हते..! आता  येणार आहेत त्या डॉ. गीतांजली या तिची आत्त्या..! त्यांच्या घरी बोलता बोलता सावनी  तिकडे कशी गेली, त्या आधी काय घडले हे सारे त्यानीच मला सांगितले.. तिने हे त्यांच्या सोबत बोलताना सांगितले होते की ती तुला विसरायचे म्हणून त्यांच्याकडे गेली होती..!

योगायोग असा कि त्यांनी मला हे सांगितलं त्याच्या आधी मी तुझ्याकडे सावनी चे फोटो पाहिले होते.... आठवत ना तुला.... तूच दाखवले होतेस..... नशिबाने सावनी ने त्यांना सांगितलं होत.... म्हणून हे समजलं तरी.... नाहीतर ही गोष्ट कधीच कुणालाच समजली नसती......

डॉक्टर गीतांजली स्वतः एक उत्तम स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत, तिकडे त्यांच्याच हॉस्पिटल मध्ये सावनी वर्षभर अ‍ॅडमिट होती., मागच्या वेळी त्यानीच तिची सर्जरी करून गुंतागुंत अजून वाढू नये म्हणून खूप प्रयत्न केला होता..!
आणि  त्याचसाठी आता ही एवढ्या तातडीने मी त्यांना बोलावून घेतले आहे.

तर परत एकदा मुद्दा हा आहे की विहंग .......ज्याच्या बद्दल तू मगाशी म्हणालास की सावनी  सतत त्याच्यावर चिडचिड करते.. रागावते सावत्र आई सारखे वागते... तर तो विहंग  हा अनुराधा नाही तर तूझा आणि सावनी  चा मुलगा आहे....! "


ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन हादरली.....

" बाबा... हे कस शक्य आहे....??"

अजिंक्य एकदम हतबल फील करत म्हणाला.....

"येस.... हे खरं आहे..... आणि का नाही शक्य..... तुम्ही इन्टीमेट झाला होतात ना......????. आणि हा अजून एक......त्याचा जन्माचा मी साक्षीदार आहे! सो खोटं असण्याचा प्रश्नच येत नाही आहे.....

चला तर राहिला विषय की सावनी  आता आहे ना तुझ्या आयुष्यात.. तुझी बायको म्हणून!
पण मला सांग.. तू खरेच तयार होतास तिच्याशी लग्न करायला?"

डॉक्टर सतीश अजिंक्य ला म्हणाले.... पण अजिंक्य कडे त्याचे उत्तर नव्हते..... तसे ते पुढे म्हणाले....

"नाही..... नव्हतास तयार....तुझे मन खात होते तुला... तुला लाज वाटत होती त्या रात्रीची... आणि  ती बिचारी पोर.. आपल्या मैत्रिणीचा संसार या एका गोष्टीने मोडू नये म्हणून सतत तुझ्या पासून लांब राहत होती. पण त्या रात्री मात्र सारे करून तू त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी काही मागमूस देखील ठेवला नाहीस...! उलट काहीच घडलेले आठवत नसल्याचे दाखवत राहिलास..!
ना तेव्हा ना आता आणि  त्यातून तिने पहिल्या प्रमाणे वागावे अशी तू अपेक्षा करतोस?"

टेबल वर ठेवलेले पाणी पीत ते म्हणाले.... थोडा वेळ तिथे शांतता पसरली होती.... कारण सतीश ह्यांचे सुद्धा डोळे भरून आले होते..... ते परत म्हणाले.....,

"अजिंक्य .. आज एक पिता म्हणून खूप दुःख झाले मला..! तुझ्या कडून मी अशी फसवणूक करण्याची कधीच अपेक्षा केली नव्हती.

वरून परत तिचे पहिलेच लग्न आहे तर तिला सगळे च मिळायला हवे हे हा बढावा करायला तू तिच्या घरी पोहोचलास.... त्यांच्या समोर चांगुलपणा दाखवलास..... अजिंक्य दिल्ली चे ते फोटो ग्राफ पाहताना तूच म्हणाला होतास ना कि सावनी तुझी पहिली चॉईस होती.... मग का स्वतःहून तिच्याशी लग्नाला तयार झाला नाहीस.... तु त्या रात्री जे वागलास त्याची जान ठेवून तर चांगल वागायचं.... पण नाही लग्न झाल्यावर पण काही दिवस तु तिच्याशी कसा वागलास आठव जरा....."


आता मात्र अजिंक्य च्या डोळ्यात सुद्धा पाणी होत... पण त्याची पर्वा न करता डॉक्टर सतीश बोलतच राहिले.... कारण कधी ना कधी त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देणे गरजेचे होते.....

"अरे त्या पोरीने किती काय काय भोगले आहे आजवर.. याची जाणीव नाहिये तुला!
आपल्या च मुला कडून मावशी हाक मारून घेणे, अनुराधा ची सारी उस्तवार करताना तू समोर असायचा.. त्यावेळी जरी तिला तुमच्या त्या प्रसंगातले काही आठवत नसले तरी प्रेम तर होतेच ना?
त्या प्रत्येक भावनिक क्षणात तुझी सावली सारखी साथ दिली तिने..!
काही वेळा अनुराधा कडे पाहून रडताना तुझा तोल सुटायचा त्यावेळी तिचाच मजबूत खांदा घ्यायचा तू..!
हे सगळं मी त्यावेळी समोर नव्हतो तरी मला माहित आहे....

आज तुला छातीठोक पणे सांगतो..!

तू आशावादी असलास तरी अनुराधा च्या बाबतीत मला तिच्या आजारा बद्दल पूर्ण माहिती होती. आणि म्हणुनच मीच त्यावेळी अनुराधा  च्या भावाच्या मदतीने तिला सावनी  कडून ट्रीटमेंट घ्यायचा सल्ला दिला होता.
मला माहित होते की अनुराधा  माझे ऐकणार नसली तरी तिच्या आई व भावाचे नक्की ऐकेल.

आणि हे देखील माहित होते की या निमित्ताने तू आणि विहंग  पुन्हा एकदा तिच्या जवळ जाऊ शकाल..! आणि तेच झाले ....देखील "

एवढे बोलून ते थोडे शांत झाले.....



सावनी ठीक होईल ना?
अजिंक्य ला त्याच्या चुकांची जाणीव होईल का??
क्रमश

🎭 Series Post

View all